suvidha undirwade

Others classics abstract

3  

suvidha undirwade

Others classics abstract

प्रॉडक्शन बग

प्रॉडक्शन बग

2 mins
522


कधी कधी अगदी साधी आणि सहज बोललेली वाक्य सुद्धा मनाला लागतात. वार करतात. खोल जखम नसली तरी ओरखडे देतात.


आज कंपनीत त्याच्या नावाने तिसऱ्यांदा production bug आलेला. आणि ती बिचारी दिवसभर मायग्रेन अटॅक ने त्रस्त. तसा तिचा त्रास नेहमीचाच. पण आज का कुणास ठाऊक, तिला तो हवा होता जवळ. फार नाही पण साधारण दुपारी चार नंतर वगैरे तिने त्याला मेसेज केले असावेत. " आठवण येतेय, ये ना रे. तू हवा होतास आज जवळ. एकटं एकटं वाटतयं. " वगैरे वगैरे. 

बरं, ये ना म्हणजे काय, लगेच त्याला ही जाणं शक्य नव्हतं कारण त्यांच्यात जवळपास साडे तीनशे किलोमिटर अंतर ! 

पण ती फक्त त्याला मेसेज करून स्वतःच्या मनाला समजावत होती.


संध्याकाळी तिला जरा बरं वाटलं म्हणून तिने त्याला मेसेज केला, " आता जरा बरं वाटतंय. काही वेळ गेला की होईल अगदी ठणठणीत. " 

हे एवढ्यासाठीच की त्याचे " कशी आहेस ? बरं वाटतंय का ? " हे विचारायला सकाळपासून येणारे फोन आणि मेसेज. तो निश्चिंत व्हावा एवढाच तिचा हेतू.

पण ......

त्या " बरं वाटतंय आता. " या मेसेज नंतर त्याचा साधारण पाऊण तासाने मेसेज येतो.

" हो ग. पण काय करू आज production bug आलाय. तिसऱ्यांदा ! टीम लीडर ओरडली मला. "


यावर तिने काळजीने, प्रेमाने आपुलकीने विचारलं, " का रे ? तुझं लक्ष लागत नाहीये का कामात ? मी त्रास दिला का ? disturb केलं का तुला ? माझ्या आजच्या आजारामुळे तुझं लक्ष लागत नव्हतं का ?" 


खरंतर तिने नव्हतेच केले दिवसभर त्याला मेसेज आणि फोन. फक्त सकाळी डोकं दुखतंय एवढं सांगून ती दिवसभर एकटीच सहन करतेय तो " मायग्रेन ".

तरीही..... तरीही त्याचा मेसेज, " खूप काय काय सुरू असतं ग डोक्यात. " 


ती - " नको ना विचार करुस. आता सगळं ठरवलं आहे. आणि थोडा वेळ गेला की होईल सगळं नीट. तू कामात लक्ष दे. "


समोरून मेसेज येतो, " गेल्या एक वर्षात नाही झालं असं कधी. आणि कितीही ठरवलं तरी येतात विचार. 

त्यात तुझ्याकडे ही लक्ष द्यावं लागतं ना. पण ठीक आहे चालायचं. काय करणार."

त्याची ही वाक्य अगदी साधी असली तरी तिच्या जिव्हारी लागली होती ती.

तिच्याकडे लक्ष द्यावं लागतं, हे तिला अगदीच न पटणार होतं. ती त्याच्यावर भार आहे, किंवा तो तिच्यामुळे गोंधळलेला आहे. या विचाराचा वारा तिच्या मनाला अलगद स्पर्शून गेला. 


आणि तिथून तिने ठरवलं, पुन्हा एकदा ! " स्वतःला कितीही त्रास झाला तरी तो सांगायचा नाही, दाखवायचा नाही. त्याने कितीही विचारलं तरी. " 

तो सोबत असतानाही तिला आज एकाकीपणाची जाणीव झाली, पुन्हा एकदा !


तिला त्याच्या कामात अडथळा नव्हतं व्हायचं, कधीच.


त्याची वाक्य अगदी साधी होती, पण त्यावेळी ती नको होती. 

दिवसभर मायग्रेन ने लोळत असलेली, तडफडत असलेली ती, आता त्रास असतानाही उठून बसली, काम करू लागली, हसू लागली. आणि अगदी ठणठणीत असल्याचा आव आणू लागली.


प्रेमापोटी खोट्याचा मुखवटासुद्धा सहज पचवला जातो, आणि तो कळला तरी त्याचा त्रास होत नाही. नाही का?


Rate this content
Log in