Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Rahul Gawai

Others


2  

Rahul Gawai

Others


प्रेम

प्रेम

4 mins 1.1K 4 mins 1.1K


प्रेम हा विषयी मुळातच सर्वांना प्रिय आहे. पण कधी आपण त्याचा विचार किंवा व्याख्या केली. तर काही म्हणतात प्रेम म्हणजे जिव्हाळा, प्रेम म्हणजे मैत्री, प्रेम म्हणजे आपुलकी, प्रेम म्हणजे मनातील भावना अशा विविध आणि सोप्या भाषेत आपल्या प्रमाणे सर्वांनी व्याख्या प्रेमाच्या केल्या आहेत .प्रेम हे कधी मित्र, नातेवाईक प्राणी-पक्षी इत्यादी जीवन सोबत होतच असते .पण तितकंच खरं आहे. प्रेमाला सोबती हवाच असतो त्याशिवाय ते पूर्णही होत नाही. आपण विचार करूयात ! जुन्य काळातल आणि आजच प्रेम पूर्वी चलन नव्हतेच. पण आपलं रखडलेले काम पडत असेल, तर बलुते पद्धत होती. त्या देवाणघेवाणीतून लोकांची आपुलकी वाढत गेली. आणि सुताराचे लाकडावर प्रेम, शेतकऱ्यांचा निसर्गावर, लोहाराचे लोखंडावर प्रेम अशानेच माणसं माणसावर प्रेम करत गेली. आणि खरी रक्ताचं नातं निर्माण करून प्रेमाच सुरुवात झाली असावी .असे मी मानतो .प्रेमाची भावना जागृत झाल्यानंतर लोकांना आपल्या कामात प्रेम दिसू लागले.... पण आजच्या युगात जर पाहिलं तर एका तरुणीने एका तरुणाशी नकळत आकर्षण निर्माण होऊन तेच पुढं मैत्री पर्यंत जाऊन प्रेमात गुंतून जातात. प्रेमाचे काही पैलू आहेत. प्रेम हे एका व्यक्ती पुरतं मर्यादित नसतात. दोन जीव एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण चांगली झाली आणि घट्ट मैत्री झाली .तर नकळत एकमेकांशी प्रेम वाढते आपणही तो प्रेम केल्याने प्रेम वाढते आणि खर आहे .महात्मा ज्योतिबा फुले यांचे शिक्षणावर प्रेम होतं, शाहू महाराजांचं व शिवाजी महाराजांचं त्यांच्या प्रजेवर प्रेम होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं त्यांच्या पुस्तकावर प्रेम होतं. अशा महामानवांनी जर का आपल्या कार्यावर कधीच प्रेम केलं नसतं तर कदाचित आजचे चित्र वेगळेच असत.प्रेम ते एकदाच होतं ते कुठं बाजारात, बस स्टँडवर, शहरात ,गावात विकत मिळतच नाही ती एक भावना आहे. त्यासाठी आपली भावनाही जागृत असली पाहिजे.


प्रत्येक श्वासांमध्ये, प्रत्येक कणांमध्ये, प्रत्येक सुगंधा मध्ये ,प्रेम हे दिसून येतं फक्त फरक इतकाच असतो .काही माणसं प्रेम हे नेहमीच लपत असतात .आणि काही माणसं ते खुलेआमपणे सांगत असतात. आपण कधीच विचार करत नाही, की आपली आई सर्वांनाच प्रिय आहे पण बाबा का नाही फरक इतकाच असतो .आई ही प्रेम दाखवते आणि बाबा कितीही दुःख कितीही सुख असले तरी त्यांच्या डोळ्यात नाही आपल्यासाठी प्रेम असतं आणि ते कधी दाखवत नाही नाही .त्यामुळे सगळेच आईला गुरु म्हणतात आणि म्हणतात ....

"स्वामी तिन्ही जगाचा,

आईविना भिकारी"

ही ओवी एकदम खरी आहे. परंतु आपल्या आई विषयी जेवढं प्रेम आहे तेवढं बापाविषयी जर आपण दाखवत नसेल, तर त्या तुमचं प्रेम हे व्यर्थ आहे आणि प्रेम हे नेहमीच समतोल पाहिजे.पण काही व्यक्ती प्रेम व्यक्त करतात व काही व्यक्त करू शकत नाही .याचा अर्थ दुसरा होत नाही, की प्रेम व्यक्त करणारी व्यक्ती आपल्यावर जास्त प्रेम करते व प्रेम व्यक्त करणारी व्यक्ती कमी प्रेम करते ते अवलंबून असेल तुमच्या विश्वासावर जर का तुमचा एकमेकावर विश्वास नसेल तर प्रेम हे काहीच कामाचे नाही. ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांचा आपल्या मावळ्यांवर विश्वास होता .तशाच पद्धतीचा विश्वास तुम्हाला निर्माण करावाच लागेल. त्याच पद्धतीनं विश्वास जिंकून मन जिंकल्यावर प्रेमाची नाती ही जास्त वाढते. या संपूर्ण विश्वात जितके विद्वान पुरुष होऊन गेले असतील त्या सर्व विद्वान लोकांनी कोणत्या ना कोणत्या कार्यावर प्रेम करून आपलं नाव अजरामर केले आहे. म्हणून प्रेम हे कधीही गरीबी- श्रीमंती, वर्णभेद, जातीव्यवस्था, अशा कोणत्याच गोष्टीला मानत नाही. ज्यांचे मन स्वच्छ आहे. तीच माणसं आपल्या दोघांचा समन्वय घालून प्रेमात अगदी स्वतःला ओढवून घेतात. प्रेमामुळेच नवीन ऊर्जा मिळवून त्यावर चालत आहे काहीच हरकत नाही. प्रेमाची इतकी फार जादू आहे की मी लिहिलेला प्रत्येक शब्द आणि शब्द या ओळीमध्ये "प्रेम" या शब्दाचा वापर बहुतांश झालेला दिसतो, इतकी ताकत या प्रेमात आहे. आज बहुतांश प्रेम लोप पावत चालला आहे. लोकांनी आपल्या कामाचा थोडावेळ काढून सुद्धा दोन शब्द प्रेमाचे बोलण्यासाठी लोकांकडे थोडाही वेळ नाही .काम काम आणि फक्त काम असतं. पूर्ण जीवन हे घड्याळ्याच्या काट्यावर चालत आहे. घरात सर्व असतात आई -वडील ,बहिण -भाऊ सगळे कामाला निघून जातात आणि एका वेळेचं जेवणही सुद्धा सोबत करत नाही .आपण माणसं कामांमध्ये गुंग झालो आहोत प्रेमाचे दोन शब्द बोलण्यासाठी आपल्याकडे कधीच वेळ नसतो .आजचा चित्र खूप वाईट आहे. आपले स्वतः स्वतःचे आई-वडील यांना रस्त्यावर सोडून देतात मुलंही आरामात आपल्या मुलाबाळांसह राहतात. पण त्यांना कधीही त्यांच्या आई-वडिलांची आठवण येत नाही .कुठ गेलं हे प्रेम?

 

गाडगे महाराज आपल्या कीर्तनातून नेहमी सांगायचे llकधी येशील रे मोहना, पाहण्या भारत आमचा पुन्हा

ll


आजचे चित्र वेगळेच आहे

ll तू येऊच नको मोहना ,प्रेमाचे दोन शब्द निघणार नाही पुन्हा ll


असं चित्र या संपूर्ण विश्वामध्ये सध्या चालू आहे .दोन प्रेमाचे शब्द ही एकमेकांना विचारू शकत नाही. यामुळे कुठेतरी प्रेमाच्या बाहेर जाऊन वेगळं विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न आजच्या या क ल यु गा त आहे. कुठेतरी आजच्या या कलियुगात "दोन शब्द प्रेमाचे" असा उपक्रम सुरु करण्याची वेळ येणारच आहे. आज हल्ली माणसं स्वतःचाच स्वार्थ बघत असतात. यामुळे खरंच प्रेम हे धोक्यात आले आहे .आणि प्रेम हे लुप्त पावत चाललेल आहे .असच दिसत आहे. रखडलेला हे प्रेम पुन्हा परत येऊ आमच्या माणसांना एकमेकांबद्दल आदर लवकरात लवकर येऊ" प्रेमाचे दोन" शब्द असा उपक्रम सुरू करता लोक प्रेमाने एकत्र येवो अशा त्या देवाच्या चरणी आपण सर्व प्रेमाने प्रार्थना करू या आणि लोकांवर सदैव प्रेम करूया ......Rate this content
Log in

More marathi story from Rahul Gawai