STORYMIRROR

Rahul Gawai

Others

3  

Rahul Gawai

Others

मोबाईल वेडा झाला !

मोबाईल वेडा झाला !

4 mins
4

मोबाईल वेडा झाला ! लेख वाचण्या अगोदर सदर घटना काल्पनिक आहे.आणि या लेखाचा उद्देश फक्त आनंद घेण्यासाठी व्हावा.हीच अपेक्षा आहे. मोबाईल वेडा झाला! असं म्हटलं तर लोक विचार करतील मोबाईल कसा वेडा होईल ?त्याला वापरणारा माणूस वेडा होऊ शकतो. ही गोष्ट काही पटण्यासारखी नाही .पण असच झालंय आज मोबाईल वेडा झाला आहे.सकाळी उठायला अलार्म लावला ,पण काही वाजला नाही .मग काय त्याला जोऱ्यात खाली आदळला. मग काय तेव्हा पासूनच तो वेडा झाला असावा अशी शंका आहे.रोज त्याची आणि माझी सकाळी भेट झाली नाही की जीव कसा घाबरायला होतो कोणतेच काम नीट होत नाही.पण काय करू वेड्या माणसाची कहाणी ऐकली आता वेड्या मोबाईल ची कहाणी सुरू ..नको त्या ठिकाणी वाजला सारे लोक माझ्याकडे बघून हसत होती.मग विचार केला बंदच करून ठेवू .बंद केला आणि मस्त त्या ठिकाणाहून समोर निघालो मित्र भेटला ..काय मित्रा सकाळी रिप्लाय दिला नाही.त्याला काय सांगू रिप्लाय द्यायचं सोडा नको त्या ठिकाणी वाजला आणि माझ्या हश्या पिकवला. स्वतः ला आवरल आणि म्हटलो अरे मित्रा लक्षच नाही .बघ तुझ्या मेसेज वर आपण भेटलो ना !ते चांगलं मित्राला राग आला ?अरे भावा भेटला नसता ते चांगलं झालं असतं पण माझा रिप्लाय नाही दिला तु जा.. मी निघालो ! असं म्हणून मित्र निघायला लागला.मी पण चकित झालो.निघताना मोबाईल जोरात आवाज केला.मग मित्र हे पाहताच परत म्हणाला जा तुझी आणि मैत्री आज पासून संपली मोबाईल सुरू असताना तू मला रिप्लाय नाही ?आता तर तू जा!मग काय माफी मागितली तरी काहीच फरक नाही पडला.मग मी रागाने परत ऐकदा मोबाईल जमिनीवर आदळला.मग काय बंद झाला .पुढे काय बाजारात चाललो जो तो मला तेच म्हणत होता काय सकाळी व्हिडिओ सेंड केला रिप्लाय नाही,स्टेटस ठेवलं रिप्लाय नाही,वाढदिवस होता रिप्लाय नाही हे ऐकत ऐकत तिथून निघालो तर परत वाजला म्हटलं आता काही खरं नाही आता लोक मारतील म्हणुन पळ काढला तिथून आणि घरी आलो आणि दरवाजा बंद केला थोड पाणी पिल आणि मोबाईल कडे बघत त्याला म्हटलो बघ तुझ्यामुळे मला आज खूप अडचण आणि आता मी तुला फोडून टाकील आणि विषय संपून टाकील.मग काय मोबाईल पण शांत झाला.मग मला बरं वाटलं आणि आठवण झाली माझ्या प्रिय व्यक्ती म्हणजे माझ्या गर्लफ्रेंड ची लगेच तिला फोन केला पण नशीब तिने उचलला नाही. मग काय निराशा अजून शांत पडलो आणि तिकडून फोन वाजला पण तिचा ना आवाज येत होता ना काही.तिचा नंबर दिसत नव्हता.लिस्ट मध्ये नाव होत पण लावून पाहायला गेलो तर काहीच फरक पडत नव्हता.आता काय करावं सुचेना ऐकी कडे रिप्लाय नाही दिला म्हणून मित्र लांब गेले आणि आता हीच काही झाल तर नसेल म्हणून चिंतेत धावत पळत तिच्याकडे गेलो आणि समोरच ती आली आणि तिला सगळ सांगून मोकळा झालो तिन फक्त मान हलवली आणि ती बोलायला लागली .तुझ्या सोबत जे घडलं तसच माझं पण घडलं आहे.माझ्या मोबाईल मध्ये तुझा नंबर आहे पण तो आता लागणार नाही .तुझा फोन मला येईल पण उचलला येणार नाही.तुला कॉल पण लागेल पण तो कधीच उचलणार नाही. असं तिचं सांगणं ऐकून मन तुटून चाललं होत,श्वासाची गती कमी झाली.आणि हळू- हळू मला समजू लागलं की हीच लग्न ठरलं आणि आता मला ही सोडून जाणार ..गळ्याला कोरडेपणा आला आणि थोड पाणी पिऊन तिला विचारलं तुझं लग्न ठरलं काय? तिनं मान खाली घातली, पापण्या झुकवल्या आणि थोडी नजर वर करून म्हणाली हो असच काही तरी होणार याची चाहूल लागली बघं.मी कुणाच्या तरी बंधनात जाणार असतं वाटत आहे. मग मी म्हणालो अग इतकच ना नको टेन्शन घेऊस मी आहे ना! सगळं ठीक होईल आपण मस्त राहू .तिन उत्तर दिलं हे फक्त बोलायचं सोप्प वाटतं.करायला खूप अवघड आहे.मला स्वतः चा खूप राग येत होता.अगोदर त्या मोबाईल ला कुठं तरी फेकून द्यावं.अस वाटत होत मग वाटलं थोड मन धरून बोलावं.पण तीच म्हणाली मी बोलू का? मी लगेच म्हटलो बोल..ती म्हणाली सकाळी तुझा फोन लागत नव्हता मी खूप प्रयत्न केले.मग मला इतका राग आला की मी माझा मोबाईल जोऱ्यात जमिनीवर आदळला आणि तो आता वेड्यावानी करत आहे. मग काय दोघं हसू लागलो.खूप हसलो आणि हसता हसता दोघांच्या मनात डोळ्यात पाणी आलं. खरचं असं झालं तर हे दोघांच्या चेहऱ्यावर दिसत होते.कधी कधी आयुष्यात खूप छोट्या गोष्टी घडतात.पण त्या खुप वेदना देणाऱ्या असतात. ऐका मोबाईल मुळे माणसं इतकी वेडी होतील. याचा विचार खूप अडचण देऊ शकतो.म्हणून मी आणि तिने मोबाईल ला वेड केलं आणि स्वतः ऐकमेकांत वेडे झालो आणि चांगल आयुष्य जगू लागलो.आणि तितक्यात माझ्या मोबाईल चा अलार्म वाजला.आणि जाग आली.लगेच विचार न करता मोबाईल घेतला .सगळ्यांना रिप्लाय दिले.आणि गर्लफ्रेंड कॉल करून विचारपूस केली सगळं नॉर्मल होत.पण हे स्वप्न खूप मोठी शिकवण घडून देणार होत. खरचं मला मोबाईल च वेड लागलं की मोबाईल वेडा झाला याच उत्तर मी अजून शोधत आहे?पण मोबाईल हे ऐक कारण झालं.पण खरंच तुम्ही सुध्दा अशाच परिस्थितीतून जात असाल तर !लढायची तयारी ठेवा. असं झाल्यास मैत्री,प्रेम संपून जाईल असं जर वाटत असेल तर चुकीचं आहे.कुठलीही मशीन तुमचं चांगलं आयुष्य हिरावून घेऊ शकत नाही.माणूस वेडा आहे तो काहीही करू शकतो. कसंलाही शोध लावू शकतो.म्हणून माणूस वेडा हा शब्द उत्तम शोभतो.म्हणून मार्ग निवडा आणि आपली प्रगती करून परिस्थितीशी संघर्ष करून नाव मिळावा.. -

राहुल विजय गवई देऊळगाव माळी तालुका :मेहकर जिल्हा बुलढाणा मो. न.:९९६०३६६४१८


Rate this content
Log in