Rahul Gawai

Others

4  

Rahul Gawai

Others

बाप ऐक आशेच झाकण

बाप ऐक आशेच झाकण

3 mins
396


बाप हा शब्द जरी आपण उच्चारला तर आपल्या शरीराला ऊर्जा निर्माण करावी लागते.इतकी ताकद या महान शब्दात आहे.पण आता त्याच शब्दाचा अपभ्रंश पडला आहे जन्मास आले इंग्रजी मधले चोचले.वडील म्हटलं तर एक चटकन चित्र उभ राहतं. स्वच्छ,सुंदर मन ,कपाळावर पडणाऱ्या त्या सुरुकुत्या,प्रेमळ डोळे आणि जोऱ्यात बोलणारा ऐक आवाज.

अस म्हणतात बाप हे झाकण असतं सोबत जरी असलं ना तरी कसलाही संकट येऊ देत त्याला सामोरी जाण्याची ताकद ही त्यांच्या कडून आपोआप आपल्याला येत असते.आपल्या पाल्याना योग्य ती सगळी सुविधा मिळावी अशी त्याची नेहमी धडापड असते.नेहमी दुःखाच्या भोवऱ्यात तो अडकलेला असतो.पण तो कधीच आपलं दुःख व्यक्त करतच नाही अस म्हणतात जन्माला आई घालते देखभाल आई करते पण बोटाने धरून आपल्या पायावर आपल्याला चालायला आपला बाप शिकवतो.आई दुःख व्यक्त करायचं असल की रडून मोकळी होते,पण बाप मात्र ते दुःख लपवून नेहमी झुरत राहतो.मी तर म्हणेन "बाप हा रडत नाही ,नेहमी लढत राहतो".खूप काव्य झालेत पण अजून बापाची खरी व्यथा पूर्णपणे कोणी मांडू शकला नाही .माझा अडाणी बाप जरी असला ना नाही त्याला सगळा अभ्यास माहीत असतो.सगळी दुनियादारी त्याला पुरे -पुर माहिती असते. त्याची अभिलाषा ही वेगळीच आहे.त्याचा स्पर्श ,त्याचा सानिध्य आणि त्याच्या सोबत घातलेला वेळ खूप महत्त्वाचा आहे .येणार प्रत्येक संकट त्याच्या जवळून गेलेलं असतं त्याच्यासोबत ती आपल्यालाही त्याला कसं लढायच याची प्रेरणा देत असतो.त्याची प्रेरणा जणू आपल्यासाठी संजीवनीच.स्वार्थी ,कपटी असा स्वभाव बापाचा कधीच नसतो.आपल्या वडिलांना सगळी लेकरं हीच आपलं सर्वस्व असतात याच कुठलीही शंका नाही. चुकणारा प्रत्येक व्यक्ती हा चुकीचाच असेल अस तर मुळीच नाही.आपल्याला येणारे अनुभव ,आपल्या सोबत घडणाऱ्या गोष्टी यावर ते अवलंबून असते.ज्यांनी आपल्याला बनवलं त्याच्या पासून लांब राहणं हे कितपत योग्य आहे.वडील जो पर्यंत आहे तो पर्यंत नेहमी चांगल्याच गोष्टी सांगत राहतो.पण दुर्भाग्य आपलंच जी गोष्ट पहायची नाही,तीच मोठ्या प्रमाणात घडत आहे .जो मुलगा मान्य करेल मला तुमची साथ नको.त्याला वडील पाहिले सांगतील तू आमचं काहीच बघू नको तू खुश असला म्हणजे झालं.पण जेव्हा मुलगा बापाची भूमिका बजावत असेल तेव्हा मात्र त्याचं माणसाची गोष्ट वारंवार आठवीत राहते.वेळ वाईट आहे .दिवस वाईट आहे पण बाप वाईट नाही हीच गोष्ट कधीच विसरायची नाही.आपल्यावर जे संस्कार झाले.ते पुढच्या पिठी पर्यंत पोचवले तर यापेक्षा अजून काय हवं.ज्याला मेहनत घेण्याची तयारी आहे तोच यशस्वी आहे .आणि जो सगळ्या जगाला जगवतो तो माझा शेतकरी बाप आहे.जगाला सांभाळायची ज्याच्यामध्ये ताकद आहे तो किती महान आणि मोठा असेल याचा विचार नक्की करावा.म्हणून त्या बापाची किमया तुमच्या समोर लेखणीने सांगणं कठीणच आहे. प्रत्येक बाप आपल्या पिठीला चांगले विचार प्रदान करण्याच काम करत असतो.तुम्हाला जागवणारा बाप जर कधीच निराश नाही झालं पाहिजे ही काळजी प्रत्येकानी जर घेतली तर चांगलं होईल.दुसऱ्यासाठी जगणे हा त्याचा मुल - मंत्र आहे . येणारा प्रत्येक दिवस हा त्याचा असावा.कोणताच मुलगा हा आपल्या आई - बाबाला घरा बाहेर काढणार नाही.अस चित्र लवकरच बघायला मिळावे.पण या जगाचा बाप जगला तर देश जगला असच म्हणावं लागेल.कधी रात्री थकलेल्या बापाचे पाय दाबून पहा.त्या पायाच्या भेगा बघा.तेव्हा तुम्हाला समजेन बाप किती मोठा आणि महान आहे. तुम्हाला सुध्दा वेगळाच आनंद,अनुभव मिळेल.चांगलं बोला,हसा ,काळजी करा त्याला बरं वाटेल आणि तुमचा अभिप्राय त्याच्या जवळ सांगत चला.अशा गोष्टी रोज केल्यावर तुम्ही ऐक दिवस बाप व्हाल.त्याचं आशेवर तुम्ही नवीन पिठी घडवासाल हेच खूप मोठं पुण्य आहे अस वागा आणि जीवनाचा आनंद घेत रहा.


Rate this content
Log in