मालक, सर्जा अन् लंपी
मालक, सर्जा अन् लंपी


ओळखलं का मालक मला! मी तुमचा सर्जा.तुम्ही म्हणाल मी कसा काय बोलाया लागलो.तो विषय महत्त्वाचा नाय.पण मला आज तुम्हाला मन भरून काही तरी बोलायचं हाय....मालक तुम्हाला आठवत काय ?जेव्हा तुम्ही बाजारातून माझी खरेदी करून घरी आणलं.तेव्हा मी थोडा लहान होतो आणि मला खूप भीती वाटत होती. कारण मला सगळं नवीन होत.नवीन जागा नवीन घर आणि बरंच काही! मी त्या भीतीने गेल्या तीन - चार दिवस चाराच खाल्ला नाही. अन् तुम्ही माझी नियमित काळजी घेत होता मला हवं नको ते रोज देत होतात.पण सगळ्यात महत्वाच म्हणजे मला गोंजारत होता .मायेनं हात फिरवत होता.तेव्हा मला समजलं माझा मालक किती चांगला आहे. अन् मी पण ऐक निर्णय घेऊन टाकला.माझ्या मालकाला माझी साथ शेवट पर्यंत देईल.मग तुम्ही माझी काळजी घेत राहिले आणि मी मी तुमच्या देखभालीची व्यवस्था करताना पाहून मी अधिक चांगला होत गेलो.माझी काही कसरच सोडली नाही.मला लागलं तेव्हा वैरण टाकणं ,मला रोज आंघोळ घालन,तुमच्या हाताने मला खाजवन मला ते खूपच आवडायचं.मग तुम्हाला पण कळलं मी आता मोठा झालोय अन् मला ऐक सोबती आणायला हवा.मग काय तुम्ही मला सोबती पण आणला त्याची पण काळजी घेतली माझ्यासारखीच अन् आमची एकदम भारी जोडी झाली सर्जा अन् राजाची.आता वेळ झाली होती आमच्या जोडीला कामाची सवय लावून घ्यायची.मग काय मालकाने नेलं की आपल्या शेतात.तुम्ही नांगर दिला खांद्यावर अन् झालो सुरू कामाला आम्ही दिवसभर तुम्ही आम्हाला हाकत होता .पण काय करू मालक कामाची सवय नव्हती न मग बसलो होतो .तुम्ही खूप चिडायला लागला. मला काठी पण हाणली.पण मी जरा जास्तच दमलो होतो त्या दिवशी तुमच्या कपाळाच्या रेषा पाहून मीच आंदाज काढला मी जर थकलो तर माझा मालक सगळं काम बंद करून दुःखी बसतो.म्हणून त्याच दिवशी रात्रीच्या वेळेला तुम्ही माझ्या आंगवरून हात फिरवला अन् म्हणाले.. सर्जा ss लेका असं दमून कसं चालेल ?तूच दमला ,तर माझं कसं होणार ?तू आता उद्या चांगला काम कर बर. तुझ्यामुळे मला खायला भेटेल.नाही तर उपाशी राहावं लागेल. अन् तुला पण वैरण मिळणं कठीण होईल बरं.लेका उद्या चांगल काम कर रे बाबा ! नंतर हात फिरवून मला वैरण टाकून तुम्ही जेवाया गेलास.मग काय मी पण तुमच्या कपाळाच्या रेषा कमी केल्या आणि मस्त चालायला लागलो.तुमचं पण काम झालं .तुम्ही पण मला लाड लावू लागले.मी पण खूप खुश होतो.कारणच तस होत ना प्रेरणी वेळेच्या आत आटोपली होती.फक्त वाट पाहत होते ती पावसाची .काही दिवसात ती पण इच्छा पूर्ण झाली त्या साली चांगल पीक झालं होत सगळा परिवार खूप खुश होता.सगळी सण चांगली झाली. अन् त्या सालचा आमचा सण बैलपोळा तर भारीच होता.तुम्ही छान अंघोळ घातली ,खांदे मळन ,मला काय भारी सजवल होत.माझी दुष्ट पण तुम्ही काढली होती चांगला नेवैद्य पण खायला दिला होता.ते साल माझ्या अजून लक्षात आहे.पाच - सहा वर्ष एकदम छान गेले पण मला आठवतंय तो दुष्काळ पडला होता.पेरणी झाली होती पण ऐन वेळी पावसानं जानू पाठ फिरवली त्या वेळी पाऊस आलाच नाही.तुम्ही अन् मी वावरत राहायचो.तुम्ही खूप दुःखी राहायचे .आमची चारा- पाणी पण मिळत नव्हती तुम्ही किती मैल दूर जाऊन चारा - पाणी घेऊन येत होता.आणि मला खायला देत होता.तुम्ही म्हणायचे आपलं काम तर झालं पण मेघराजा त्याच काम कर म्हणावं.पण त्यानं काय तुमचं बोलणं ऐकलंच नाही.तुमचं घराचं परिवारात लक्ष लागतच नव्हतं.नीट झोपत नव्हते ना नीट खात होते.सारखं सारखं माझ्या जवळ येऊन रडत होते.येईल का ?रे सर्जा पाऊस येईल का?मी पण ओरडायचो पण काय फायदा माझं पण नाही ऐकलं मेघराजानं.पोरांचं शिकणं ,सावकारंच कर्ज,त्यात नेहमी नेहमी तुमचं बीमार असणं.याला जणू तुम्ही कंटाळून अखेर माझ्या समोर तुम्ही हातात दोर घेऊन तुमचं आयुष्य संपवण्याच्या प्रयत्न मी फसवला नाही तर मला तुम्ही सोडून जाण्याचा प्रयत्न तुम्ही केला होताच.पण मालक मी तुम्हाला तस करू दिलं नाही.मला शेतात चारताना तुम्ही सांगितल्या गोष्टी काही अंभग मला खूप आवडायचे पण काय करणार देवानं मला बोलायल नाही न शिकवलं.मालकीण बाई ला कोणती साडी घेणार,पोरा - बाळांस काय देणार संमद्या गोष्टी तुम्ही माझ्या सोबत बसून तास अन् तास बोलायचे पण काय करावं मी हो म्हणायचे ते तुम्ही पण ओळखून घ्यायचे हे मला तेव्हा कळतच नव्हत.
तुम्हाला वाटत असेल मी हे काय बोलत आहे.मला मालक माफ करा .मी तुमची वाट सोडतो की काय असं झालंय.कारण मला लंपी रोग झाला आहे.मला खूप ताप आला, नाका- तोंडांतून लाळ पडते,अंगावर मोठ्या गाठी झाल्यात त्याच्या खूप त्रास होतोय.माझी साथ काही जास्त दिवस नाही अस मालक मला वाटायला लागलंय.माझा सोबत बरा आहे.पण माझ्यापासून त्याला हा रोग होऊ शकतो म्हणून मी त्याच्या पासून लांबच रहातो.मी फक्त आता शेतातच राहीन.मला माहित नाही मी असेल नसेल पण तुम्ही मात्र खंबीर रहा.आपण दुष्काळात किती कष्ट घेतले तर कष्ट करा.मग अगदी पहिल्या सारखाच होऊन जाईल .हा काळ खूप वाईट आहे. माझं मतदान पण नाही न नाही तर मला खूप सुविधा पण मिळाल्या असत्या. मागे कोरोणा कसा आला होता.त्यात किती माणसं गेली.कोणाला भेटणं शक्य नव्हत.पण वाईट वेळ निघून गेली आणि आता चांगली वेळ घेऊन आली.तशी हीच वेळ आहे.लवकर निघून जाईल.
या रोगांवर रामबाण औषध प्रशासन देईल तेव्हा देईल.पण मालक तुम्ही लहान असताना ते मोठे होई पर्यंत चा सगळा प्रवास मी आठवीत बसतो आणि रडतो.तुम्ही पण माझ्यासाठी रडता हे पण मी पाहिलेलं आहे .मला प्रेमाने सर्जा ...अशी हाक पण देता.पण काय करणार माझं सध्या तरी हलण शक्य नाही.मी आयुष्यभर तुमचं ऐकलं तर शेवट पर्यंत पण तुमचंच ऐकणार आहे.मालक आपण खूप कष्ट करू पण तुम्ही कधीच आत्महत्या प्रयत्न करू नका.काय झालं सध्या तरी मी तुमची मदत नाही .करू शकणार.पण ही माझ्यावर आलेली वाईट वेळ कोणत्याच मालकाच्या आयुष्यात येऊ नये म्हणजे झाले.खूप जनावरांना या रोगाची लागणं झाली आहे.त्यावर सध्या संशोधन करून लस येईल आणि हा वाईट काळ पण लवकर निघूनजाईल.माझ्यासारखे अनेक सर्जा आपल्या मालकापासून दूर होतआहेत.त्याची काळजी योग्य घेतली तर हा काळ पण लवकर निघून जाईल आणि पहिल्या सारखा सोन्याचा दिवस येऊन जातील.परत नवीन जोमाने कामाला वेग येईल.तुमच्या मनात कोणी भीती घातली असेल ती पण काढून टाका.तुम्ही दुःखाला घाबरणारे नाही त्याच्याशी दोन हात करणारे आहात.यात लागणं झालेली दुधाळ जनावरे सुद्धा भरुपुर आहे.पण ही वाईट वेळ जाणारच आहे.मालक तुम्ही जास्त घाबरु नकाच .आपला देश कृषी प्रधान देश आहे.लवकरच यावर काही तरी तोडगा काढण्यात येईलच.पण मालक वर्गाने पण स्वच्छता चांगली ठेवावी.जेणेकरून हा रोग त्यानं होणार नाही.वाईट काळ हा आशेचा नवीन किरण असतो म्हणून खरचं मालक तुमचे लय अश्रू अनावर होताना मी पाहिले आहे.तूम्ही बिलकुल खचून जाऊ नका.आपण परत कष्ट करू आणि आपला गेलेला आनंद लवकरच उभा करू.