The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

प्रा.डॉ.नरेश शंकरराव इंगळे

Others

2.5  

प्रा.डॉ.नरेश शंकरराव इंगळे

Others

प्राचीन शिवमंदिर

प्राचीन शिवमंदिर

2 mins
414


प्राचीनकालीन शिवमंदिर श्री क्षेत्र धामंत्री


अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे. येथे दरवर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य उत्सव साजरा केला जातो. या उत्सवादरम्यान हजारो शिवभक्त शिवजीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकण्यासाठी येतात.

   

नजीकच्या धामंत्री येथील शिव मंदिर हे प्राचीनकालीन हेमाडपंथी मंदिर असून द्वापार युगात या मंदिराची निर्मिती केल्याचा कयास आहे. मंदिरातील घंटा सर्वदूर प्रसिद्ध आहे.१९७४ ला पंजाबराव ढेपे यांनी देणगी स्वरूपात ही घंटा दान दिली आहे. चार क्विंटल दहा शेर वजनाची ही घंटा पूर्णपणे अष्टधातूची आहे.


नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार /सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. श्री नागेश्वर महाराजांनी १९७४ ला या मंदिराचे बांधकाम केले आहे. सदर बांधकाम हे पाषाण व गारगोटीचे(दगडाचे) कोरीव स्वरूपातील आहे. मंदिरासभोवती मंदिराच्या भिंतीवर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती दिसून येतात. दर्शनी भागांमध्ये दीड फूट उंच व दोन फूट रुंदीची नंदीबैलाची पाषाणाची मूर्ती आहे. तसेच पिंड बांधण्यात आली आहे.

   

प्राचीन काळात सहा महिन्याची रात्र व सहा महिन्याचा दिवस असे. राक्षसाकडून होणारा उपद्रव याचा सामना करण्यासाठी तसेच स्वतःच्या रक्षणासाठी ऋषीमुनींनी शिवजीना आराधना करण्यासाठी एका रात्रीत या मंदिराचे बांधकाम केले, अशी आख्यायिका आहे. तसेच येथे विठ्ठल रुख्मिणीचा अभिषेक होत असल्याचे शिव भक्तांनी सांगितले.


प्राचीनकालीन महत्त्व असलेल्या या ठिकाणी श्रावण मास, दत्त जयंती, श्री महाशिवरात्री महोत्सव असे तीन प्रमुख उत्सव साजरे केले जातात. यात महाशिवरात्री उत्सव हा सर्वात मोठा उत्सव असतो. या महोत्सवामध्ये हजारो शिवभक्त हजेरी लावतात.


प्राचीनकालीन महत्त्व असलेल्या या हेमाडपंथी मंदिराला महाराष्ट्र शासनाचा "क" दर्जा प्राप्त असून सध्या या मंदिराचे व्यवस्थापन नागेश्वर महादेव संस्थान ट्रस्ट धामंत्रीद्वार विश्वस्त विजय करडे आणि कैलास कुमार पनपालिया पाहतात.


Rate this content
Log in