Nilesh Bamne

Others

3  

Nilesh Bamne

Others

नियती ...

नियती ...

4 mins
2.1K


नियती ...

मी काहीतरी वाचण्यात दंग होतो इतक्यात माझी धाकटी बहीण दीपा माझ्या जवळ येऊन मला म्हणाली काकांचा फोन आलाय ! "काका म्हणजे कोणीतरी लग्न जुळवून देणारे गृहस्थ " ती पुढे म्हणाली, " ते विचारता आहेत ती जोगेश्वरीची १२वी शिकलेली मुलगी पाहायला येतोयस का म्हणून ? " मी लगेच म्हणालो," १२ वी शिकलेली मुलगी आहे ना ? नाही सांग ! त्यावर तिचा चेहरा उतरला ! ते पाहून मी तिला स्पष्ट म्हणालो ," तू या भानगडीत पडू नकोस ? काल जेव्हा तिने माझा फोटो मागितला तेव्हाच मला शंका आली की आता नुकतीच तुळशीची लग्ने पार पडली आहेत आता ही माझ्या लग्नाचा घाट घालणार ! पण तो इतक्या लगेच दुसऱ्याच दिवशी घालेल हे मला अपेक्षित नव्हते म्हणून मी दोन सुमार फोटो तिला व्हाट्स अँप वर पटवून दिले. बऱ्याच दिवसापासून एक मुलगी माझ्या मनात भरली होती नव्हे माझ्या मेंदूत शिरली होती पण बहुदा तिला माझ्यात तसा अजिबात रस नव्हता. प्रेमविवाह करण्याचा माझा किडा काही अजून कमी झाला नव्हता . माझ्या आयुष्यात खूप सुंदर मुली येऊन गेल्या होत्या अतिशय हुशार , कर्तबगार आणि कलाकार असणाऱ्या मुली येऊन गेल्या होत्या त्यांना मी फाट्यावर मारले . त्याचीच कदाचित ईश्वर मला शिक्षा देत होता. आता चाळीशीतही मुली माझ्याकडे आकर्षित होतात त्यामुळे कोणी ना कोणी माझ्या प्रेमात पडणार याची मला खात्री आहे. बहिणीला स्पष्ट नकार दिल्यामुळे आई भडकली आणि म्हणाली, मुलगी पाहायला काय जातंय ? त्यावर मी रागावून म्हणालो," मी मला आवडेल त्या मुलीशी आणि मला वाटेल तेव्हाच आणि वाटेल तसं लग्न करेन तुम्ही त्या भानगडीत पडू नका !" मुळात लग्न ही मला माझी गरजच वाटत नाही . ज्योतिष शास्त्र किती खरे आणि किती खोटे देव जाणे पण माझ्या एका ज्योतिषी मित्राने याच कारणामुळे मला लग्न न करण्याचा सल्ला दिला. लग्न ही माझी गरज नाही म्हणून मी ते फार गंभीरपणे घेतले नाही. नाहीतर मी कधीच लग्न करून मोकळा झालो असतो पण माझा विवाह होणे माझ्या बहिणीला वाटते तितक्या सहज होणे नव्हते कारण मी ती मुलगी पाहायला गेलो असतो तरी आमची पत्रिका जुळली नसती कारण माझ्या पत्रिकेत मंगळ होता. दुसरी गोष्ट आमच्या वयातील अंतर काकांनी दुर्लक्षित केलं होत त्यामुळे मला काही फरक पडला नसता पण त्या मुलींच्या घरच्यांना नक्की पडला असता हेच कारण होत म्हणून मला जी मुलगी खूप आवडत होती तिच्यासमोर मी स्वतःहून प्रेमाचा प्रस्ताव ठेवत नव्हतो. पत्रिका आणि मंगळ बाजूला ठेवला तरी मी अजून लग्न का केलं नाही ? या प्रश्नाच उत्तर मी खरं देईन पण ती मुलगी अजून अविवाहित का होती ? या प्रश्नाच उत्तर मला मिळणार नव्हतं ! पण मला ते आज ना उद्या कळणार होतच ! त्यानंतर होणाऱ्या संभाव्य गोष्टी टाळणे माझ्या हातात नव्हते. मी उच्चशिक्षित नसतानाही एक उत्तम साहित्यिक होतो मला वाचनाची प्रचंड आवाड होती जगातील अनेक विषयांचे मला ज्ञान होते त्या मुलीशी लग्न करून काय मी स्वयंपाक आणि धुणी-भांडी या विषयांवर चर्चा करणार होतो. माझ्या पत्रिकेत संतान सुख नव्हते कदाचित लग्नानंतर आम्हाला मुलं नाही झाली म्हणजे ती न होण्याची शक्यता अधिक असताना मुलांची आवड असणाऱ्या स्त्रीशी लग्न करून मी तिचे आणि माझे आयुष्य का बरबाद करू ? मला व्यक्तीश: देशाची लोकसंख्या वाढविण्यात अजिबात रस नव्हता. लेखक म्हणून मी एकवीस - बावीस वर्षांचा असताना ऐन तारुण्यात खूप विचार मांडले उदा. नोंदणी पद्धतीने विवाह करून लोकांनी लग्नकार्यावर होणारा अवास्तव खर्च टाळावा, लग्नांनतर मुलीचे मूळनाव बदलू नये, म्हणजे एकूणच हुंडा पद्धत वगैरे आणि जाती - भेदालाही तडा देणारे माझे विचार होते. जन्म पत्रिका , कुंडली आणि ज्योतिष यावर माझा फार विश्वास नव्हता पण मला आजही वाटते ज्योतिष शास्त्र हा फक्त आधार आहे तुमचे भूत भविष्य आणि वर्तमानकाळ कोणालाही बदलता येत नाही. ज्योतिष शास्त्राप्रमाणे माझा विवाह माझ्यापेक्षा वयाने दहा वर्षांपेक्षा अधिक लहान असणाऱ्या उच्चंशिक्षित, श्रीमंत, माझ्या जातीतीलच, अंत्यत धाडसी, रागीट ,पुरुषाकृती, कर्कश आवाज असणाऱ्या आणि माझ्या जन्म स्थळा पासून जवळ जन्म झालेल्या स्त्रीशी व्हायला हवा ! तरच तो विवाह टिकेल नाहीतर माझा घटस्फोट अथवा तिचा मृत्यू निश्चित ! माझ्या आयुष्यात आलेल्या डझनभर मुलींपैकी कोणाशीच माझा विवाह न होण्याची ही कारणे होती जी मला हल्लीच कळली ज्योतिष्याचा सल्ला घेतल्यावर. शनीची साडेसाती ...खरी की खोटी पण मी भोगली ...ती आता संपली तेव्हा माझा आत्मविश्वास पुन्हा वाढला पण साडेसातीत ज्यांनी मला त्रास दिला त्यांची साडेसाती मात्र सुरु झाली. ज्योतिष्य शास्त्राची परीक्षा घेण्याची एक संधी मला चालून आली आहे. मी अविवाहित राहिलो तर त्यांच्यातही काही नवल असणार नाही कारण माझा जन्म ज्या नक्षत्रात झाला आहे त्यानुसार जीवनाच्या कोणत्याच टप्प्यात स्त्रिया माझ्या आयुष्यात येणे थांबणार नाही. माझ्या पत्रिकेत राजयोग असल्यामुळे यश कीर्ती आणि प्रसिद्धी माझ्या पायाशी लोळण घेणारच ... किती सुखद चित्र आहे नाही ज्योतिष्य शास्त्रा प्रमाणे माझ्या भविष्याच...महत्वाचं म्हणजे भविष्यातील माझी पत्नी माझ्या कार्यात सहाय्य करणारी असणार आहे हे महत्वाचे आणि ते कार्य निश्चित जगाच्या कल्याणासाठीच असणार आहे. माझे जिच्यावर सध्या प्रेम आहे ती माझी होणे मला अपेक्षित आहे पण तसे नाही झाले तरी जे होणार आहे ते अटळ आहे. माझ्या होणाऱ्या पत्नीची भविष्यात जग दखल घेणार आहे ती इतक्या सहज माझ्या आयुष्यात कशी येईल ? मी ही आता आत्मचिंतन करून त्या मुलीला जिच्या मी सध्या प्रेमात पडलो होतो तिचा नाद सोडून देण्याचा निर्णय घेतला कारण कदाचित ती ती नसावी ! पण ती जी कोणी आहे म्हणजे असेल तर आता माझ्या आयुष्यात लवकर यायला हवी कारण मला खूप मोठं कार्य करायचं आहे तिच्या साथीने आणि नियतीच्या साक्षीने !


Rate this content
Log in