Sarita Kaldhone

Others

3  

Sarita Kaldhone

Others

निसर्ग माझा मित्र

निसर्ग माझा मित्र

4 mins
391


 झाडांना प्रकाशाची दिशा कोण दाखवतं ? पाखरांना उडायला कोण शिकवतं? नारळात पाणी कोण घालतं ? असे अनेक प्रश्न विचारता येतील आणि ज्याचे उत्तर असल एकच निसर्ग. निसर्ग हा तर सगळ्या जीवांचा पहिला गुरु .निसर्गाचे आणि मानवी जीवनाचे नाते अगदी अतूट आहे. निसर्गाचं आणि आपलं हे अतूट नातं सांभाळण्याचं काम निसर्ग सर्वतोपरी करतोय पण मानवाचं काय? निसर्गाने भरभरून वारेमाप दिलेलं दान मात्र मानव असच उधळू लागलाय.


 "काय सांगता व्यर्थ कथा

ही एकविसाव्या शतकाची

एकही विसावा न दिसावा

व्यथा ही आहे कलियुगाची" 


मित्रांनो, खरच एकविसाव्या शतकात कोणालाही कोणासाठी थांबायला वेळ नाही. या शतकात प्रत्येक जण स्वतःच्या स्वार्थापोटी, पैशांसाठी धावतच आहे. मानवाने स्वतःच्या बुद्धिचातुर्याने आकाशाला गवसणी घातली आहे. तर एकीकडे सागरतळाशी जाऊन त्याने विविध नैसर्गिक साधनसंपत्तीचा शोध लावला. एवढेच नव्हे तर मानवाने प्रगतीची अनेक शिखरे सर केली ती विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोरावरच. विज्ञानाच्या प्रगतीने मानवाला स्वर्ग दोन बोटच उरला आहे. पण निसर्गाशी स्पर्धा करण्याच्या नादात मानव स्वतःचेच नुकसान करतोय. परवा सहज टी. व्ही वरच्या बातम्या पाहिल्या. बातम्या शेवटच्या टप्प्यात आल्या होत्या .हवामानाचा अंदाज असे शीर्षक आले. मागे सुंदरशी निळीशार पृथ्वी स्वतः भोवती गर्रकन फिरणारी .पडद्यावरून सरकणारी. निळ्याशार पाण्याचे प्रचंड मोठे महासागर, खडीय बेटे, पर्वतरांगा, दऱ्याखोऱ्या, महानद्या, हिमाच्छादित शिखरे, किती विहंगम आमची वसुंधरा माता.

" धन्य धन्य हे वसुमती हिचा महिमा सांगू किती प्राणीमात्र तितुके राहती । तिच्या आधारे"

 आपल्या सभोवतीचा प्रदेश परिसरातील नैसर्गिक, सांस्कृतिक घटकांचे परस्परांशी असलेले नाते अगदी लहानपणापासून पहात आलोय. मानवी जीवनाचा निसर्गाशी असलेला पुरातन संबंध निसर्गातील गोष्टी एकमेकांवर अवलवून व परस्परांना पोषक असतात. जलचक्र, नायट्रोजन चक्र किंवा अन्नसाखळीच्या बाबतीतही हीच बाब लागू पडते . या निसर्गचक्रावरच पर्यावरण अवलंबून आहे . निसर्गातील सूर्य, तेज, वायू, जल या सर्व घटकांवर अवलंबून आहे मानवी जीवन. निसर्ग एखाद्या मित्राप्रमाणे आपल्याला साथ देतोय.


   गुहेत आयुष्य कंठणाच्या माणसाने मोठ्या वेगाने प्रगती साधली. त्याच्या आकांक्षा वाढल्या. हाव वाढली' घेता घेता किती घेशील ' दो कराने'ह्या भूमिकेतून त्याने पर्यावरण ओरबाडले .अक्षरश: प्रदूषित केले. निसर्गातील घटकांचा अमर्यादित उपभोग घेता घेता त्याचे भान सुटले आणि निसर्गाचा समतोल बिघडू लागला .पर्यायाने निसर्गाचा

आणि त्यानंतर संस्कृतीचाही -हास सुरू झाला.

  कवी टेनिसन म्हणतो 'एक फूल जाणणे म्हणजे विश्व जाणणे. निसर्ग एक जादूगार आहे, गुरू आहे, कलावंत आहे, संतश्रेष्ठींचा "परमेश्वर पाडुरंग आहे. शेतात काम करणाच्या बहिणाबाई हिरव्या रानात वावरताना म्हणतात .' टाळ्या वाजविती पानं, दंग देवाच्या भजनी.' सावता माळी म्हणतात कांदा, मुळा,भाजी अवघी विठाई माझी' ऋषीमुनींनी निसर्गसानिध्यात राहून मनाची एकाग्रता साधली .गुरुकुले बहराला आली. मानवी देह निरोगी,सुदृढ, प्रसन्न हवा असेल तर निसर्ग व्यापक, विपुल व विशुद्ध तर हवाच. माणसाला निर्भेळ जगण्यासाठी निसर्गाची साथ हवीच. पण मानवाने ही साथ निभावली का?

 लोकसंख्या अफाट वाढत आहे. मानवाला रहायला जागा पुरेना, शेतीला जमीन पुरेना मग या दुष्ट मानवाने निसर्गावर अतिक्रमण करायला सुरवात केली. मुंबई शहराचेच उदाहरण घ्या एकेकाळी सात बेटांवर वसलेली, नारळी फोफळींनी वेढलेली ही मुंबापुरीआता किती दैन्यावस्थेत आहे. कारण मुंबईतल्या मीठी नदीचे मुख्य पात्र बुजविले. तिचा प्रवाह बदलला. समुद्रात भराव घालून या भरावांवर सिमेंटची जंगले उभी केली, मानवी जीवन सुजलाम सुफलाम करणाऱ्या नद्यांना डिवचले तर त्या आपली शक्ती दाखविणारच ना! भवताप हरणाऱ्या नद्यांना मानवाने प्रदूषित केले. वारंवार पाणी तुंबणे, पुरांचे तडाखे बसणे ही त्याचीच उदाहरणे आहेत.

    आपला देश कृषिप्रधान देश, शेतीव्यवसाय, पशुधन हेही निसर्गावरच अवलंबून आहे ना?शेतात अन्नाची गरज भागवणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतात पिके घेताना वारेमाप खते, कीटकनाशके जंतूनाशके वापरायला सुरवात केली. बियाणे संकरीत केले. अमाप रासायनिक खतांच्या वापराने जमिनीचा कस कमी केली. मानवाला गाई म्हशी हव्यात पण त्या दूध देणाऱ्या यंत्र म्हणून !घोडे हवेत ते करमणूकीसाठी, शेळ्या मेंढ्या हव्यात त्या कापून खाण्यासाठी, जंगलं हवीत ती लाकडाच्या कच्चा मालासाठी, पृथ्वी हवी ती नैसर्गिक साधनसंपत्ती लुटण्यासाठी .मानवी जीवन निसर्गावर अवलंबून असलं तरी मानव फक्त निसर्गाकडून घेणार, लुटणार, मारून टाकणार, विध्वंस करणार? काय होईल निसर्गाचे अशा • मानवाच्या वागण्याने?

   निसर्गात पर्वतरांगाही येतात. या डोंगरकड्यांनी नटलेल्या हिवरवाईचीही माणसाला अडचण होवू लागली. शेती करण्यासाठी डोंगर पोखरायलाही मानवाने सुरवात केली. डोंगर पोखरण्याचे परिणाम मानवाने माळीण दुर्घटना, उत्तराखंड दुर्घटना या रूपाने आपण पाहिलेच आहे.      

     औदयोगिकरण व इतर कारणांपुढे निसर्गाचा ऱ्हास व त्याचा भीषण परिणाम आपण भोगतोच आहोत. तेव्हा ढासळत चाललेला हा तोल जागरूक होऊन आपण सावरायचा आहे. कारण,


 Nature is fragile, handle with care Once it's gone, it is impossible to repair 


 मानवाने स्वतःची प्रगती साधली पाहिजेच पण ती निसर्गाच्या साथीनं. शासनही आता जागरूक झाले आहे. सामाजिक वनीकरण, एक मूल एक झाड, 'झाडे लावा, देश वाचवा 'योजनेअंतर्गत अनेक उपक्रम राबवत आहे. पण भ्रष्टाचाराचा कीडा योजनांना पोखरतो. पैसा खाल्ला जातो. डोंगर उजाड होतात, माळराने पोरकीच राहतात हे दुःख आहेच .आता आशा आहे उद्याच्या नागरिकांकडून, 

प्रामाणिक शासनाकडून, म्हणून- शपथ घ्यायला 


"चला सोडवू दुष्काळाचे प्रदूषणाचे कोडे,

 चला लावूया वनसंपत्ती, चला लावूया झाडे

ही शपथ घेऊन नुसते चालणार नाही तर त्याच त्याची अंमलबजावणी व्हायला हवी आहे


Green earth and clean air are our prime care.

हा सकल्प सिद्धीस नेण्यासाठी पाणी, उर्जा, खजिने, सर्वांचे रक्षण करू, काटकसरीने वापरू इतिहासकालातील लोकांप्रमाणे निसर्गाला देवता मानून तिचे संवर्धन करण्यासाठी कटिबद्ध राहू.. म्हणूनच


 शपथ घेऊनी सारे मिळुनी

पर्यावरणाचे पूजन करू

नच माज या जलधारांचा ,वृक्षांचा सन्मान करू,

अजून आहे वेळ गड्या रे संकट समय जरी बिकट

ठाकला,

वने जगवू ,सृष्टी फुलवू आळवू मेघमल्हाराला...!


Rate this content
Log in