Sarita Kaldhone

Others

2  

Sarita Kaldhone

Others

निरोप समारंभ

निरोप समारंभ

1 min
317


निरोप समारंभ म्हटलं की १०वी चे ते दिवस,आठवणी लगेच मनपटलावर रुंजी घालतात.माझी शाळा श्रीराम विद्यामंदिर ललगुण,जिल्हा सातारा. खेडेगावात शाळा होती पण शिक्षण चांगलं होतं. 

दहावीच्या निरोप समारंभाला साड्या नेसायचं ठरलं होतं.खूप उत्सुकता लागली होती कार्यक्रमाची .विशेष म्हणजे निरोप समारंभाच्या निमित्ताने मी भाषण करणार होते..आपल्या शाळेच्या आठवणी शब्दांतून मांडताना मला खूप आनंद होत होता.पण ज्या दिवशी कार्यक्रम होता त्या दिवशी अचानक काही अडचण आल्यामुळे तो कार्यक्रम रद्द करावा लागला..सगळ्यांचे चेहरे पडले.

  नंतर पुन्हा चार दिवसांनी तोच कार्यक्रम होणार होता.आम्ही सगळ्या मुलींनी पुन्हा खूप छान कार्यक्रमाची तयारी चालू केली.तोच उत्साह होता.प्रमुख पाहुण्यांनी शाळेचं,मुलांचं कौतुक केले ..खूप आनंद झाला होता.

अशी पाखरे येती अन स्मृती ठेवुनी जाती ,

दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती...

या ओळी आठवून रडायला येत होतं. शाळेचे आणि मुलांचे ऋणानुबंध मनाच्या कप्प्यात खोलवर जोडलेले असतात. त्यामुळे मुलं कितीही मोठी झाली तरी शाळेला, शाळेतील शिक्षकांना विसरत नाहीत.


Rate this content
Log in