Sarita Kaldhone

Others

2  

Sarita Kaldhone

Others

माझा गाव

माझा गाव

1 min
63


इतिहासाच्या पानापानावर कोरलेले अस माझं गाव. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी .शिवरायांच्या जन्माने शिवनेरी किल्ला आणि त्यामुळे जुन्नर खूप इतिहासात प्रसिद्ध आहे.या गावात शिवजयंती खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका म्हणून जुन्नरला मान मिळाला आहे.

निसर्गाने नटलेला हा तालुका. या तालुक्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. अष्टविनायक गणपतीपैकी दोन गणपती तालुक्यात आहेत.लेण्याद्रीचा गिरिजात्मक आणि ओझरचा विघ्नहर गणपती सकल जनां ना आशीर्वाद देती.माळशेज घाटातील निसर्ग अनुपम सौंदर्य मनाला वेड लावणारे आहे. वडज ला असणारे खंडोबा मंदिर प्रसिद्ध आहे.

गावात शिवाई देवीची मोठी यात्रा भरते. यात्रेला आजूबाजूच्या परिसरातून अनेक लोक येत असतात.

यात्रेला अनेक वर्षांची परंपरा आहे. 

गणेशोत्सव, नवरात्री,दसरा,दिवाळी असेल अनेक सण एकत्रितपणे साजरे केले जातात.आनंदाची देवाणघेवाण केली जाते. असा माझा गाव .मला त्याचा अभिमान आहे


Rate this content
Log in