Unveiling the Enchanting Journey of a 14-Year-Old & Discover Life's Secrets Through 'My Slice of Life'. Grab it NOW!!
Unveiling the Enchanting Journey of a 14-Year-Old & Discover Life's Secrets Through 'My Slice of Life'. Grab it NOW!!

Vasudev Patil

Others

2.5  

Vasudev Patil

Others

नानू भाग 2

नानू भाग 2

5 mins
609


 भाग :-- दुसरा


सनावदला बाणाई आक्का पोहोचली पण इकडे दुपार पावेतो सलवाडीत सखा दाजी तापानं फणफणला तो बडबडायला लागला. त्याची सुध हरपली. एकादशीच्या संध्याकाळी पावसानं सनावदला जोर धरला.सनावदमधून पिवळ्या मातकट पाण्याचे प्रचंड लोट तापी नदीकडं धावू लागले. शेतात पेरण्या आटोपल्यानं शेतकरी पाण्याची गंमत पाहत मस्त फराळ आटोपत गप्पा झोडायला मारतीच्या पारावर, शंकराच्या देवळावरील वडाच्या पारावर छत्र्या , घोंगड्या पांघरूण जमू लागले.तापीची पातळी वाढू लागली. बाणाईनं फराळ करत बऱ्याच महिन्यांपासून लेकीकडेच मुक्कामाला असलेल्या तात्यांना फराळाला बोलवलं.पण नानू जाऊन वर्ष उलटलं तरी तात्यांची दु:खाची सल काही जाईना.आज तर त्यांना बाणाई सलवाडीहून परतल्यापासून नानूची तिव्रतेने आठवण येत नानू जवळच बसलाय असाच भास होऊ लागला होता.तिसऱ्या प्रहरी दिवाणावर बसलं असतांना बंगळी वर नानूच बसून झोके घेतोय असं त्यांना भासलं पण लगेच पावसाळी हवेनं बंगळी झुलत असल्याचं समाधान करत त्यांनी तो विचार झटकला.


 बाणानं सारं झाकझूक करत वरच्या मजल्यावरील झुल्यावर बसली.तिथनं समोरची गल्ली सरळ दिसायची.गल्ली मंदिराच्या चौकात येऊन संपायची.चौकात दक्षिणमुखी मारुतीचं देऊळ,त्याच्या पुर्वेला असलेल्या रिकाम्या जागेत गावातील दोन तीन पिढ्या पाहिलेलं भलं मोठ वडाचं झाड.त्या शेजारी शिवालय.मग पुढे रस्ता जो नदीत उतरत होता.त्याच्या कडेलाच बाग.समोरचं सारं वरच्या मजल्यावरून पाहत राहण्यात बाणाला मजा वाटे.पण पडणाऱ्या पावसात खांब्यावरील लाईटाच्या उजेडातही तिला आज उदास वाटत होतं.रमेशराव वर येत शेजारी बसले.गावाच्या पश्चिमेला नव्यानेच उभारलेल्या विठ्ठल मंदिरात एकादशीचं भजन सुरू झालेलं होतं.भावडूबाने स्वर जुळवत 'सुंदर ते ध्यान' सुरू केलं होतं.ओल्या पावसात सुर चिंब भिजत कानावर येत होते पण तरी आतून काही तरी गमावल्याचे उदास भाव वरच उमटत होते.बाणाई समाधीत गेली.नानू आपल्या सोबत येण्यासाठी किती आटापिटा करत होता.पण आपण शाळेसाठी नाही आणलं सोबत.नी दोन दिवसात तर.....! 

"अगं मी जरा भजनाला जाऊन येतो!"म्हणत रमेशराव निघून गेले.बाणाई झुल्यातच शाल अंगावर घेत पहुडली.भजनाचे सुर ऐकत ,पारावर बसलेल्या माणसांना पाहत,पावसाचं नर्तन पाहत तिचा डोळा लागला. 


पारावरची माणसं पांगली. भजन आटोपून रमेशराव गोठ्याकडच्या मागच्या घरात झोपले. तात्या खालच्या खोलीत घोरू लागले.गल्ली सुनसान झाली.पाऊस मात्र कोसळतच होता. एकच्या सुमारास वडाच्या झाडावर दोन चार पक्ष्यांच्या पंखांची फडफड उमटली. पूर आलेल्या नदीकडनं टिटवीचा कर्कश आवाज निथंबला.शिवालयाजवळील मगन गुरवाच्या ओट्यावरील साखळीनं बांधलेलं त्यांचं पाळलेलं लाल कुत्रं जोरजोरानं वडाच्या झाडाकडं तोंड करत साखळीला हिसोटा मारत भुंकू लागलं.पक्षी वडावरून उठत बाणाईच्या घराकडं सरकू लागले.टिटव्या पण पाऊस अंगावर घेत 'टिटिव टीव,टिटिव टीव'करत गावातल्या अस्मानात घिरट्या घालू लागल्या.कुत्र्याचं भुंकणं जोर धरू लागलं.मगन गुरवाच्या दम लागलेला म्हातारा "भयताडा काय दिसलं रे बेण्या तुला!एवढं भुंकतोय!"म्हणत खाटेवर पडल्या पडल्या खोकत खेकसू लागला.


बाणाईचे डोळे उघडले.गच्चीवर काळी मांजर डोळे वटारत मियाॅव करत होती.उठल्या उठल्या बाणाईनं तिला हाकललं.गल्लीत पिवळ्या प्रकाशात पावसाचं पाणी मुकाट्यानं वाहत होतं.वारा त्याच्या धारांना नाचवत होता.बाणाईचं लक्ष शिवालयाकडं गेलं.वडाच्या पाराकडंनं गल्लीत पांढरी आकृती सरकत होती.डोक्यावर बादली उलटी घातलेली.पाराकडून मारूतीच्या देवळाजवळ व तेथून गल्लीतून पुढं पुढं सरकत होती.बाणाईच्या डोळ्यावर विश्वास बसेना.तिने डोळे पुन्हा पुन्हा चोळत पाहिलं.एवढ्या रात्री डोक्यावर उलटी बादली घालून हे काय असावं?तिला थंड हवेतही घाम सुटला.गुरवाचं कुत्रं जीव तोडून भुंकतच होतं.बाणाईनं सरळ गच्चीवरनं खाली जाणंच पसंद करत घाबरून ती खाली तात्या झोपले होते त्या खोलीत आली.तात्यांच्या पायाकडची शाल अंगावर टाकत मोठा लाईट बंद करत लहान लाईट सुरू करून ती झोपली.पण ती आकृती काय असावी या विचारानं घाम वाढू लागला,धकधक-धडधड होऊ लागली व झोप येईचना. तिला वाटलं आज नानूस जाऊन एक वर्ष झालं.त्याचीच दिवसभर आठवण करतोय आपण म्हणून भास झाला असावा आपणास.किती दुर्दैवी नानू! तरी तात्या त्याला बऱ्याच वेळा सांगायचे "नानू गाई-वासराचे दोर कमरेला गुंडाळत नको जाऊ!जनावर आहे ते सरतेशेवटी कितीही जीव लावला तरी उधाणलं तर!"पण नानू खळ्यातून बस स्टॅण्डवर दूध काढण्यासाठी गाई घेऊन जातांना बऱ्याच वेळी कमरेला दोर गुंडाळी.नेमकं तात्याच्या सांगण्याप्रमाणंच घडलं.मागच्या एकादशीला तात्या पायी वारीला गेलेले.नी वाघ्या गाईनं कमरेला दोर बांधलेल्या अवस्थेतच नानूला ओढत ओढत खळ्यातून रस्त्यानं थेट स्टॅण्डवर नेलं.तिथं ठोकलेल्या खुठ्यात पळत नानूला ओढत उधाणलेली काय पळतच राहिली.रस्त्यावरच्या दगडांना ,खुंट्यांना ठेचकाळत रक्तबंबाळ नानू बांधलेल्या अवस्थेत ओढला गेला.पण गाव झोपलेला.मापाडी पोपट्यानं गाय पकडत दोर सोडला पण तो पावेतो नानू.......

 

तात्यासोबत वारीला जाण्यासाठी किती हट्टाला पेटला होता! पण पायी प्रवास ,ऊन ,वारा यानं व शाळा म्हणून तात्यानं नेलं नाही.आपण सलवाडीत गेलो तेव्हा ही 'आक्का मला तात्या येईपर्यंत तुझ्या गावाला घेऊन चल ' म्हणून रडतच किती विनवत होता.पण शाळा बुडेल व आपणही सासु सासऱ्यांना घाबरून आणलं नाही.स्टॅण्डपर्यंत गाडी मागंनं पळत होता.तेच शेवटचं पाहणं ठरलं.नंतर तर रक्तबंबाळ अवस्थेतला नानूस पाहताच आपण बेशुद्ध पडलो होतो.

   

बाणाई विचार करत पडली असतांनाच समोरच्या बंद खिडकीच्या काचांवर अस्पष्ट सावली जाणवली.झोपल्या जागी बाणाईच्या अंगाचा थरकाप झाला.शाल अंगावर घेत बाणाईनं श्वास रोखून धरत पडुन राहिली.बाहेर खिडकीतून सावल्या नाचत‌ होत्या व सारखे बादलीच्या कडीचे आवाज येऊ लागले. अचानक खिडकी हळूहळू उघडली जाऊ लागली. छोट्या बल्बच्या उजेडात जे काही दिसत होतं त्यानं बाणाई थरथरली.तिचा रोखलेला श्वास फुलू लागला. गजाआड तिच मघा पाहिलेली आकृती.दहा बारा वर्षाचं पोर डोक्यातन बादली वर खेचत बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतं.बाणाईनं त्याही स्थितीत पडूनच हळूच हात लांबवत जवळ झोपलेल्या तात्यांना उठवण्याचा प्रयत्न केला पण तिचा हात पुरेना व तोंडातून आवाज निघेना.पोरानं डोक्यातून बादली काढत जोरात मागं फेकली.लाईटच्या उजेडात चेहऱ्यावर रक्ताचे ओहोळ पसरलेले असल्यानं चेहरा ओळखू येईना पण डोक्यावरचे सोनेरी कुरळे केस... ओळख पटली.आपला लहानगा भाऊ!

"नानू...!" बाणाई जोरात किंचाळली.बादलीच्या व किंचाळण्याच्या

आवाजानं तात्या दचकून उठले.

"आक्का काय झालं गं?"तात्या जवळ येत विचारते झाले. बाणाईनं तात्याला गच्च बिलगत खाली मान करत खिडकीकडं बोट केलं.तात्यांची अर्धवट उघडल्या डोळ्यांनी खिडकीकडं पाहिलं नी पाहतच राहिले.

"ज्ञानू......! नानू....! माझ्या लेका ."

ते रडू लागले.

खिडकीबाहेर गजाजवळ उभ्या नानूनं चेहऱ्यावरील निथळणारं रक्त हातानं पुसत तात्या, आक्काकडं पाहिलं.

"तात्या का नेलं नाही सोबत वारीला!विनवत होतो ना मी! नाही ऐकलं तुम्ही! न आक्का तू तर माझी ताई ना!किती जीव ओवाळायची माझ्यावर ?सख्खा भाऊ विठा दादापेक्षाही जास्त ना? मग त्या दिवशी आणलं असतं सोबत सनावदला तर काय बिघडलं असतं तुझं?निदान मी वाचलो तरी असतो ना गं?"नानू खिडकीपलीकडून काळजाला घर करणारं बोलत होता.आक्का थरथर कापत तात्याला गच्च पकडत ऐकत होती.तात्या !, तात्या तर निष्प्राण दगडागत !

आक्का ,तात्या तुम्हाला काय वाटतंय ?मला गाईनं कमरेला बांधलेला दोर ओढत मारलं? नाही हो. वहिनी व तिचा भाऊ वसंता यांनी मारलं मला! काल नेमकी एकादशी होती नी आक्का भेटली.आलो गाडीतून तुम्हाला भेटायला.नी आता इथून जाणारच नाही तुम्हाला सोडून."

हे ऐकताच थरथरणारी आक्का सारा थरकाप कापरागत उडवत खिडकीकडं नानूकडं झेपावली.तिला सलवाडीतून परततांना बंद पडलेल्या गाडीचा मागचा दरवाजा त्याचा त्याचा उघडल्याचं व नंतर मागच्या सीटवर कुणी तरी असल्याच्या हालचालीचा उलगडा झाला. 

तात्यांना तर जोराचा धक्काच बसला.


"नानू पोरा? काय सांगतोय? तुला मारलं? वसंतानी वासंतीनं ?" तात्या जीव तोडून विचारू लागले.

"तात्या!विठा दादाच्या सांगण्यानुसार कमरेला दोर बांधल्या अवस्थेत जर गाईनं स्टॅण्डवर ओढत नेलं असतं तर मी जिवाच्या आकांताने ओरडलो असतो व गाव गोळा केला असता.पण त्या आधीच खळ्यात ...... वसंतानं गेम करून टाकला होता माझा!"

"नानू...! भावा...!काय सांगतोय?"बाणाई रडतच विचारू लागली.

 तोच म्हशी, गाईची धार काढण्यासाठी गोठ्याजवळच्या मागच्या घरातून येत बादल्या घेण्यासाठी रमेशरावांनी दार ठोठावलं. पहाट झाली. पूर्वेस प्राचीची लाली फुटू लागली. खिडकीजवळून नानू हलला. पक्ष्याच्या पंखाची फडफड‌ वडाकडं सरकत निमावली. टिटवीनं पुन्हा कर्कश आवाज करत नदीकाठाकडं सरकली. गुरवाचं कुत्रं पुन्हा एकवेळ साखळीला हिसाटा मारत जोरात भुंकलं नी मग बेसूर हेल काढत आरडू लागलं.सनावदला जाग आली. पण तात्या व बाणाईची झोप उडाली.


Rate this content
Log in