Sanjay Dhangawhal

Others

2  

Sanjay Dhangawhal

Others

मी

मी

4 mins
96


हा मी आहे ना फारच वाईट आहे बरं.खुप अहंकारी नी मग्रूर आहे,तो प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असाकाही चिकटलेला असतो की तो सहजासहजी कोणालाही सोडतं नाही.किंवा आयुष्यातून जातं नाही.हा मी म्हणजे माणसाला गर्विष्ठ करतो माणसात अहंमपणा ठाचूनठाचून भरतो अहंकारी करतो दुसऱ्याला कमी लेखण्यची द्रुष्टी देतो. माणसांच्या भावनांना दुखवून मनावर जखमा करणारा हा मी, ईतक्याकाही जखमा देतो की त्याच्या वेदनाच सहण होत नाही.

बघायला गेलेतर मी शब्द फारच छोटा आहे. मनातही भरत नाही ईतका लहान पण माणसाला माणसापासून दुरकरण्याची किंबहूना माणसा माणसात दुरावा निर्माण करण्याची ताकद या मी मध्ये खुप आहे.मी अस उच्चारतांच छाती कशी फुलून जाते मोठी होते.पण नातं जर कायम टिकवायच असेल किंवा नात्यात कसलाच वाईटपणा येवू द्यायचा नसेल तर या मी ला शक्यतितके स्वतःपासून दुर ठेवणे केंव्हाही चांगले.हा मी जर जवळ आला नाहीना तर मनामध्ये खुप गोडवा असणार आहे किंवा असेल.दोघांच्या नात्यात आपलेपणा राहील. आणि एकमेकांबद्दल आत्मीयता राहुशकते. हा मी जर दुर राहीला तर कसलाच दुरावा निर्माण होणार नाही.मनामनात कटूता निर्माण होणार नाही या मी मुळे कोणाचेही मनं अथवा भावना दुखावणार नाही.

   पण.... या मी ला...

 सहजासहजी ईतक्या सहजपणे कोणी दुर ठेवत नाही,स्वातःपासुन कायमचा काढत नाही. कारण हा मी जर दुर गेला तर माणसाची स्वताःची ओळख कायमची पुसली जाईल मग आपल्याला कोणीच ओळखणार नाही अशी भिती प्रत्येकाला असते. म्हणून माणूस कितीही चांगला किंवा वाईट असला तरी मी तथा् मीपणाला सोडुशकतं नाही.दुसऱ्या माणसाला अपल्या अवतीभोवती फिरवण्याच सामर्थ्य या मी मधे आहे. दुसऱ्याने जर आपल्या मागेपुढे नाही केलेतर स्वतःचं महत्व कसं वाढेलं स्वतःला जर मोठ करून घ्यायच असेल तर माणसाच्य अंगी थोडातरी मीपणा असला पाहीजे त्याशिवाय माणसाची प्रगती नाही किंवा चारचौघात त्याची मिरासदारी राहणार नाही.चारचौघात स्वतःच्या नावाचा दबदबा असावा म्हणून माणस् या मी ला स्वतःपासून दुर ठेवत नाही,किंवा त्या मी ला जरी सोडावस वाटत असल,दुर जावसं वाटतं असेल तरीही त्याला कोणी सोडतं नाही म्हणून या मी ची मक्तेदारी माणसाच्या अंगी असल्यामुळे हा मी प्रत्येक माणसाच्या आयुष्यातला कायमचा साथीदार आहे. 

 काय करतो हा मी,तर माणसाची खरी ओळख करून देतो. त्याच्यातला अहंकार,मीपणा दाखवतो.आता ते कसे तर अडल्यानडल्याला आयुष्य काहीना काही अडचण येतच असते कुठेतरी तो अडून राहीलेला असतो.या अडचणीचा गुंता सोडवण्यासाठी कुणाचीतरी मदत लागते.मदतीचा हात असल्याशिवाय अडकलेले काम पुढे सरकत नाही.अणि मग अडचणीतून बाहेर पडण्यासाठी व होत नसलेल काम करून घेण्यासाठी कोणाचा तरी शोध सुरू होता. अडचणीतून सोडवणारा व्यक्ती या माणसाच्या गर्दीत कुठेकुठेतरी असतोच.फक्त त्याला शोधाव लागतो मग तो आपल्या ओळखीचा असतो नाहीतर ओळख करून दिलेला असतो. पण कोणीतरी असतोच जो न होणार काम सहजपणे करूशकेलं मग ते कुठल्याही क्षेत्रातील असो. सामाजीक शैक्षणिक वैद्यकीय.जे काही असेल ते शासकीय निमशासकीय काहीना काही कार्यालयीन कामकाजात,व्यक्तीगत खुपच अडचणी असतात,प्रत्येकाला खुप मरमर करावी लागते रोजचा,मनस्ताप फिरफिर मुळे माणूस ईतका हैराण झालेला असतो की त्याचा जिव अगदी मेटाकुटीला येतो. काहीवेळेस वैतागून जातो.मग अशा वेळी त्याला कोणाची तरी मदत अपेक्षीत असते की त्याच्यामुळे मार्ग सुकर होवून अडचणीच्या कचाट्यातून काम सुटेल व काम झाल्याच समाधान वाटेलं. अशावेळी एखादा देवमाणूस भेटतो आणि सर्व अडचणीतून संकटातून, भांडणातून,चुकीच्या कामातून,उपद्व्यापातून सहीसलामत बाहेर काढतो.पण या वरिल व्यापातून बाहेर काढायला संबदीत व्यक्ती जरी कारणीभूत असला तरी ज्याचे काम आहे,जो अडचणीत आहे,ज्याला काम करून घ्यायचे आहे त्याचेही थोडेफार तरी प्रयत्न असतातच ना.दोघांचा हातभार लावल्याशिवाय कुठलच काम होणे शक्य नाही.पण हा मी संबधीत माणसाच्या स्वाभिमानाला जराही धक्का लावत नाही.किंवा लागू देत नाही,सारे श्रेय स्वतःच घेतो.नव्वद टक्के कामा करून देण्याऱ्याची मदत असेल तर दहा टक्के तरी काम करून घेणाऱ्याचा हातभार असतोच ना!पण नाही.कोणाचं काही हो हे काम माझ्यामुळे झाले.मी केले ते काम,मी नसतो तर ते काम झालचं नसतं,साहेब तर नाहीच म्हणायचे पण मी शब्द टाकला,हात जोडून विनंती केली त्यांना थोड देणघेण्याच बोललो तेव्हा कुठे साहेब तयार झाले.असा खोटा अविर्भाव अणून कदाचीत खोटी सहानुभूती दाखवून सदरच्या व्यक्तीचा भोळेपणाचा फायदा घेवून नाहीतर दिशाभूल करून आपली प्रतिष्ठा त्याच्या नजरेत वाढवण्यात यशस्वी होतोच.शिवाय चारचौघातही त्याचे काम मीच केले म्हणून डंका वाजवतो.असे मी पणाची मिजासखोरी मिरवणारे या जगात खुप आहे.पण हा मीपणा जास्त दिवस टिकत नाही केव्हाना केव्हा तरी त्याचा 

पायउतार होतोच आमच्या दोघांच्या प्रयत्नाने हे काम सहज झाले असे कदाचित एखाददुसरा म्हणत असेल बाकी मात्र स्वतःचा मी पणालाच जास्त महत्व देतात. खरतर हा अहंकारच माणसाला खाऊन जातो मग तो कितीही मोठा असलातरी त्याच्यातला अहंमपणा पद,प्रतिष्ठा, अधिकार आणि अधिकारी असेपर्यंत असतो.पण अधिकाराची खुर्ची सोडल्यानंतर कोणी विचारत नाही.त्या वेळी आपण केलेल्या मी पणाचा खुप त्रास होतो.एखाद्याचकाम करत असताना त्याच्या चांगुलपणाच फायदा घेवून गुर्मीत वागणारे सरतेशेवटी स्वतःलाच दोष देत असतात.तेव्हा काम चांगल कले तर नाव चांगलचं निघते आणि कळतनकळतपणे कोठेही भेट झालीतर नतमस्तक तर होतोच पण अहंमपणा आणि अहंकारात वागणारे, जगणारे,आपल्याच गुर्मीत वा स्वतःचाच ताठा मिरवणारे शुन्य होवून जगत असतात.ते त्यांच्या त्यांच्या कर्माचे फळ भोगत असतात.लपून काहीच राहत नाही तुम्ही केलेल चांगल वाईट काम एकना ऐक दिवस उघड होतेच त्यावेळी मात्र मनस्तापाशिवाय काहीच नसते.तेव्हा आपल्याबद्दल केंव्हाही चांगलच बोलल जाईल असच माणसाने जगाव. आपल्याला बघताना थांबून आदराने आपली विचारपूस केली जाईल

असच माणसाने वागावं

तेव्हाकुठे आपल आयुष्य सार्थकी लागेल आणि जगण्याचा सुखद आनंद मिळेलं.आपल्या चांगल्या वागण्याचा निरपेक्षपणे मदत करण्याचा आदर्श कोणीतरी घेईल अशीच माणस कायमस्वरूपी स्मरणात असतात काय....! 


Rate this content
Log in