Chandrakant Dhangawhal

Others

1  

Chandrakant Dhangawhal

Others

म्हातारपण म्हणजे ओझ का?

म्हातारपण म्हणजे ओझ का?

4 mins
1.1K



पिता पुत्राच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना म्हणजे खुपचं वाईट आहे.मुलाला विदेशात पाठवण्याईतपत

आईवडीलानी काय कष्ट घेतले असतात या मुलाला काय माहीत किती मेहनत,किती परिश्रम करत असतात याचा मुलांना थांगपत्ताही लागु देत नाही पण याच्याशी त्या मुलांना काय देणेघेणे त्यांची व्यवस्था झाली म्हणजे संपला विषय असचं म्हणायचं. 

वडिलांच्या कर्तव्याची परतफेड अशाप्रकारे करावी म्हणजे मुलाचा जन्म त्याच्यासाठी शापच आहे.

अस का होत,का करतात मुलं असं,आपल्या आईवडीलाचं म्हातारपण का नको असतं यांना अशा मुलांना त्यांच ओझं का वाटतं,का विसरतात हे आपल्या आईवडीलाचे कष्ट,आईवडीलाच्या कष्टाचा जराही विचार मुलांनी करू नये का, त्या मुलाची पद प्रतिष्ठा वाढवण्यासाठी त्याला चांगल्या पगाराची नौकरी मिळण्यासाठी आईवडील किती हाल अपेष्टा भोगतात.

स्वतःच्या अपेक्षा हौशीना बाजुला ठेवून आधी मुलाच्या गरजा पुर्ण करतात पोटाला चिमट्या घेवून पैसे जमवतात प्रसंगी उधार उसनवारी करून मुलाच्या शिक्षणासाठी खर्च करतात याची जाणीव मुलं का करत नाही करतही असतील मग आपल्या जन्मदात्यांची अशी अवस्था होणे कितपत योग्य आहे.

म्हणजे आपल्या आईवडीलाना वाऱ्यावर सोडून स्वतः मात्र मजेत जगायचं या अशा जगण्या काही अर्थ नाही

म्हातारपण म्हणजे दिव्य अग्नीतला शेवटचा प्रवास असतो पण हे त्या मुलांना स्वतःम्हातारे झाल्याशिवाय कळणार नाही.

"म्हातारपण म्हणजे ओझं का?"*


१)काही दिवसांपूर्वी एक बातमी वाचण्यात आली की विदेशात राहणाऱ्या त्या मुलाच्या वडिलांचे निधन झाले आणि त्याला निरोप पाठवूनही तो अंत्यविधीस येवूशकला नाही,शेवटी अवतीभोवती जवळपास शेजारी राहणाऱ्यानी त्याच्या वडिलांचा अंत्यसंस्कार केला म्हणजे मुलगा असुनही तो बिचारा बाप एकटाच स्मशानभूमीत जळत होता.आणखी अशीच एक धक्कादायक घटना म्हणजे एका उच्चभ्रू सोसायटीत राहणारे नव्वद वर्षाचे ज्येष्ठ नागरीक यांचाही मुलगा विदेशात स्थाईक होता त्याला विडीलांच्या निधनाची बातमी कळवताच तो लगेच आला पण त्याने विडीलांचा मृतदेह घरात न ठेवता रात्रभर सोसायटीच्या ग्यालेरित ठेवला आणि दुसऱ्या दिवशी कोणालाही न कळवता अंत्यसंस्कार उरकून विदेशात निघून गेला.

का म्हणून त्यांना सांभाळत नाही किंबहुना का सांभाळून घेत नाही.

मुलगा म्हणजे म्हातारपणाची काठी या भ्रमात राहून आईवडील त्याच्याची मरमर करतात आणि कालांतराने मुलाकडून अशाप्रकारे वागणूक मिळत असेलत त्यांनी काय करावे.मुलगा पुठे कसा निघेल हे कुठल्याच आईवडीलाना माहीत नसते तरी ते मुलावर नितांत प्रेम करतात पण मुलगा असा नाकर्ता निघालातर त्या आईवडीलाना वृद्धाश्रमाशिवाय पर्याय नसतो.

आईवडीलाच्या चणात स्वर्ग असते असे म्हटले जाते पण मुलाकडून जर नरक यातना भोगाव्या लागत असतील तर असा मुलगा नसलेला बरा.

खरतर आईवडीलांमुळेत घराला घरपण असते आईवडील म्हणजे घराचा भक्कम आधार असतो कोणी कसेही असले तरी त्यांना आपल्या मुलाची काळजी असतेच परिस्थिती कशीही असुदे चांगली अथवा प्रतिकूल ते स्वतःच्या कष्टाने वैभव निर्माण करतात त्या वैभवाचा वारसदार म्हणून मुलाकडे पाहिले जाते आणि त्याच मुलाकडून आईवडीलाना जर वृद्धाश्रमात पाठवले जातं असेल तर तो वंशाचा दिवा कसला हवा

का म्हणून त्याला वारसाहक्क द्यायचा.

खऱ्याअर्थाने आईवडीलांमुळेच मुलाचे अस्तित्वात टिकुन असते

मुलाच्या भविष्याचा विचार करताना आईवडील त्यांचे दुःख,वेदना,यातनेचा लवलेश मुलाच्या चेहऱ्यावर जराही येवू देत नाही .

असे असतानाही मुलांकडुन आईवडीलांचे म्हातारपण जपले जात नाही.मुलांच्या बेजबाबदारपणामुळे आज कितीतरी आईवडील बेघर झालेत कितरी आईवडील अतिशय वाईट परिस्थितीत एकटेच राहतात,अनेकांनी वृद्धाश्रमाचा आश्रय घेतलाय.म्हणजे अशा मुलांबद्दल असं म्हणायला काहीच हरकत नाही की


*काय केले आम्ही पाप*

*झालो पोराचे बाप*

*केले नाही कधी आम्ही*

 *माझं माझं*

*तरिही मुलाला का वाटते*

*म्हाताऱ्या आईवडिलांच ओझं*


म्हातारपण म्हणजे बालपण ज्याप्रमाणे लहान बाळांना सांभाळावे लागते त्याप्रमाणे वय झालेल्या वृद्धांना सांभाळावे लागते पण मुळ बालपण आणि उतारवयात आलेले बालपण यांच्यात फरक असतो हे मुलांच्या लक्षात येत नाही म्हणून म्हातारपण यांना ओझ वाटू लागत.

खरतर उतारवयात यांना आपल्या मुलचा आधार हवा असतो पुढचं आयुष्य मुलाचा आधार घेवूनचं काढायच असतं  पण आजकालच्या नोकरदार मुलांना प्रायव्हसी हवी असते म्हणून आईवडीलाना कोणी जवळ ठेवत नाही.

म्हातारपण ही जीवनाची संध्याकाळ असते अशाच वेळी म्हाताऱ्या आईवडीलाना मुलाची गरज असते त्याना सहारा हवा असतो प्रत्येक आई वडिलांना वाटत असते कि उतारवयात मुलाने जवळ असावे किंवा त्याने जवळ ठेवावे.पण मुलाचं सारकाही असबेल असतानाही मुल आईवडीलाना सांभाळायला असमर्थता दाखवतात.


आपल्या लहापणी आपल्या चुका पदरात झाकुन ज्या आईवडीलानी वाढवलं, पोसलं, मोठ केल असतं त्या आईवडीलाना त्यांच्या उतारवयात समजून उमजून प्रसंगी थोड नमतं घेत त्यांच्याशी बोललात वागलात घटकाभर त्यांच्याजवळ बसुन विचारपुस केली तर आईवडील व मुलाच्या नात्यात कधीचं कटूता येणार नाही.मुलाच्या प्रेमळ वागण्याने त्यांच उरलेल आयुष्य आनंदात जावू शकतं पण असं होतं नाही उतारवयात त्यांनी जावतरी कुठे मुलाच्या आधाराशिवाय त्यांना कोणाचाच आधार नसतो.

पण काय असतं वयोमानानुसार थकलेल्या शरीराला आणि खचलेल्या मनाला पोटच्या मुलाकडून मिळालेला त्रास सहण होत नाही म्हणून नाईलाजाने त्यांना शोवटच्या श्वासाची प्रतिक्षा करावी लागते मग एकदिवस वेदनादायी श्वास थांबतो आणि या बदलेल्या जगाचा म्हातारा म्हातारी निरोप घेतात हेच आजच्या काळात वृद्धांच जगण्याचं भयानक वास्तव आहे आणि एकविसाव्या शतकातील सत्यता आहे.


आता सर्वच म्हातारे पेन्शनर असतात अस नाही काहीनातर अपल्या मुलावर अवलंबून रहावे लागते. आणि त्यांच्याच भरोशावर उरलेले दिवस काढाये असतात पण उतारवयात नकोत्या जीवघेण्या व्याथींमुळे सारेच मेटाकुटीला आले असतात म्हणून बहुतेक मुल आपल्या आई वडिलांना पैसे गेले तरी चालतील म्हणून त्यांना वृद्धाश्रमात दाखल करतात.किंबहुना घारात असले तरी त्यांच्याशी कोणी निट बोलत नाही उठताबसता अपमानास्पद वागणूक दिली जते.मुलाचा फ्लॅट बंगला एश्योआरामात जगण असतानाही आईवडीलाना वऱ्हांड्यात ठेवणाऱ्या मुलांची संख्या काही कमी नाही काय म्हणाव अशा मुलांना,अशांना माणूस म्हणवून घेण्याची शरम वाटते.


Rate this content
Log in