Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Sushama Raut

Others

3  

Sushama Raut

Others

मैत्रिणींसोबतचा एक दिवस

मैत्रिणींसोबतचा एक दिवस

2 mins
845


व्हाट्सअँप वर आम्हा कॉलेज मैत्रिणींचा ९ (नऊ) जणींचा ग्रुप आहे. तसे कॉलेज मध्ये अनेक मित्र-मैत्रिणी होत्या पण आम्ही नऊ जणी खूपच जवळच्या, एकमेकींच्या सुख-दुःखात सतत पाठीशी उभ्या राहणाऱ्या. प्रत्येकजणी आपापल्या संसारात मग्न आहेत तरी फोन, व्हाट्सअँप यांच्या माध्यमातून आम्ही सतत एकमेकींच्या संपर्कात असतो. 

आमची एक मैत्रीण अमेरिकेत असते. ती मुंबईला येणार होती. त्यानिमित्ताने आम्ही सर्वानी एका मैत्रिणीच्या घरी भेटायचे ठरले. किती वाजता भेटायचे, काय मजा करायची, खायचा मेनू या सर्व गोष्टीची लिस्ट तयार झाली. आम्ही एकमेकींना भेटायला खूप उत्सुक होतो. कधी एकदा तो दिवस येतोय याची प्रतिक्षा करत होतो आणि तो सोनियाचा दिन उगवला. वेळेच्या आधीच सर्वजणी भेटलो.

अमेरिकेहून आलेल्या मैत्रिणीची गळाभेट झाली. तिने आणलेली चॉकलेट्स व भेटवस्तू आम्हाला दिल्या. आम्हीही तिच्यासाठी घेतलेली साडी तिला दिली. हे सर्व सोपस्कार पार पडल्यावर आमच्या गप्पांना सुरुवात झाली. कॉलेजच्या जुन्या आठवणींच्या विश्वात आम्ही रमलो. प्रत्येकीकडे बोलण्यासाठी एवढे विषय होते कि आम्ही सगळ्याजणी अगदी भरभरून बोलत होतो. जणू काही आपल्या मनातील अनेक चांगल्या- वाईट गोष्टींना वाट मोकळी करून देत होतो. खूप मोकळे व हलके वाटत होते सर्वांना. जेवण उरकल्यावर आम्ही थोडा वेळ अंताक्षरी खेळलो, गाणी गायलो, गाता गाता थोडे नाचलो हि. ज्यांना नाचायला जमत नाही त्यांनीही जमतील तसे हातपाय हलवले.

आतापर्यंत गप्पा मारून, खाऊन, खेळून सगळ्याजणी दमलो होतो. तेव्हा आम्ही एखादा विनोदी चित्रपट पाहायचे ठरविले. यू-ट्यूब चालू करून चित्रपट शोधायला सुरुवात केली व सर्वानुमते पडोसन या चित्रपटावर शिक्कामोर्तब झाले. चित्रपट चालू होताच आमचेही डायलॉग्स सुरु झाले. "मेरी प्यारी बिंदू..." या गाण्यावर तर हशा पिकला होता. आजही ते गाणे ऐकले किंवा पहिले तर आम्ही पाहिलेल्या त्या चित्रपटाच्या आठवणी जाग्या होतात. संपूर्ण चित्रपट पाहताना एवढे हसलो कि हसून-हसून पोटात दुखायला लागले. चित्रपट संपल्यावर सुद्धा अर्धा तास आम्ही त्यावर चर्चा करून हसत होतो. संध्याकाळ उलटून गेलेय व आम्हाला घरी जायचेय याचा जणू आम्हाला विसरच पडला होता.

जेव्हा भानावर आलो तेव्हा सगळ्यांनाच वाटत होते कि आजचा दिवस थोडा मोठा हवा होता. आम्ही सगळे आवरते घेतले व पुन्हा लवकरच भेटूया असे ठरवून जड अंतःकरणाने एकमेकींचा निरोप घेतला. आमची अमेरिकेतील मैत्रीण मात्र आम्हाला दोन वर्षानंतर भेटणार होती याचे जास्त वाईट वाटत होते. माहेराहून सासरी निघालो आहोत अशी सर्वांची अवस्था झाली होती. त्या एका दिवसात खूप सारी एनर्जी व आनंद मिळाला होता. खरंच मित्र-मैत्रिणींचे आयुष्यातील स्थान अढळ असते. मैत्रीचे नाते हे सर्वात सुंदर नाते असते. मैत्रीची श्रीमंती बरोबर घेऊन आम्ही घरी गेलो. वर्षांपूर्वीचा तो दिवस अजूनही माझ्या स्मरणात जसाच्या तसा आहे. पुन्हा सर्व एकत्र भेटेपर्यंत त्या आठवणी अविस्मरणीय आहेत.


Rate this content
Log in