Nilesh Bamne

Others

3  

Nilesh Bamne

Others

माणूस

माणूस

7 mins
1.8K


बसमधून प्रवास करताना माझ्या शेजारी बसलेल्या तरुणीला मी सुट्टे पैसे दिल्यामुळे आमची ओळख झाली. फक्त इतकेच कारण नव्हते आमची ओळख व्हायला, मी वाचत असलेल्या कवितासंग्रहातील एक कविता तिला खूप आवडली होती कारण तिने ती माझ्या पुस्तकातून चोरून वाचली होती. ती वाचल्यावर ती मला म्हणाली, ‘ ही कविता किती छान आहे नाही ?’ त्यावर मी म्हणालो , ‘हो ! या कवितेतील प्रियकर आपल्या प्रेयसीवर किती जिवापाड प्रेम करताना दिसतोय ? त्यावर तिने प्रश्न केला, ‘असं प्रेम करणारा आज विरळच नाही का ? त्यावर मी म्हणालो, ‘ नाही तस काही नाही ! आजही आपल्या प्रेमासाठी जीव देणारे प्रसंगी आत्महत्या करणारे लोकही आहेतच की या जगात ! त्यावर ती म्हणाली, ‘ प्रेमासाठी आत्महत्या करणे हा तर मला मुर्खपणा वाटतो कारण प्रेम जीवापेक्षा महाग नक्कीच नाही. एकीकडे माणूस जीवासाठी स्वर्गही नाकारतो आणि तोच जीव प्रेमासारख्या तुच्छ गोष्टीसाठी गमावून बसतो किती हा विरोधाभास ! आता तर तू या कवितेची स्तुती करत होतीस आणि आता अचानक प्रेमाबाबतचा तुझा सुर बदलेला आहे हे कसं काय बुवा ? त्यावर ती म्हणाली, ‘ हे असं कविता करून कल्पना करून प्रेम व्यक्त करणं फार सोप्प असतं, आपल्या प्रेयसीच्या सौंदर्याची तुलना चंद्राच्या सौंदर्याशी, तिच्या डोळ्यांची तुलना हरणाच्या डोळ्यांशी, तिच्या हाताची तुलना फुलांशी, कमरेची कळीशी आणि दातांची मोत्याशी हे सारं फक्त कवितेत करणं शक्य असत प्रत्यक्षात प्रियकर प्रेयसीचा सर्वाधिक वेळ आपले प्रेम यशस्वी होईल की नाही ? या विषयावर चिंतन करण्यातच निघून जातो. प्रेयसीला आकाशातील चंद्र आणून दयायला चंद्र काय प्रियकराच्या बापाचा आहे ? अशी खोटी आश्वासने देऊनच आजचे प्रियकर प्रेयसीला भुलवितात आणि लग्न झाल्यावर आपल्या हातातील कटपुतली बनवितात. लग्नापूर्वी प्रियकराला तिने आकर्षक पोशाख परिधान केलेला विशेष आवडतो पण लग्नानंतर तिने सोज्वळ स्त्रीसारखाच पोशाख तिने परिधान करावा अशी त्याची अपेक्षा असते. त्यावर मी म्हणालो, ‘ मलाही नाही आवडणार माझ्या पत्नीने अंग उगडे ठेवणारे आणि नको तिकडे भोकं मारलेले कपडे परिधान केलेले. माझी संस्कृतीप्रियता म्हणा अथवा माझा परुषी अहंकार कारणीभूत असेलही मी असा विचार करण्याला. तुमच्या सारख्या पुरूषी अहंकार असणार्‍या पुरुषांच्या अहंकाराचा बुरखा फाडायला मला आवडेल पण ते करण्याची ही वेळही नाही आणि जागाही ! तिच बोलणं संपत न संपत तोच त्या पुस्तकातील दुसरी कविता तिच्या समोर धरत मी म्हणालो, ‘ या कवितेत कवी पुरुष लबाड असल्याचे मान्य करतोय आणि स्त्रियांनी पुरुषांवर आंधळा विश्वास ठेऊ नये असे सुचवितही आहे. ती कविता वाचल्यावर ती म्हणाली, ‘ पाहिलेत ! परुषांचे गुण पाहिलेत ? स्त्रियांनी तेवढे पुरुषांशी एकनिष्ठ राहून त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं आणि पुरुषांनी मात्र त्यांच्याशी लबाडी करावी त्यांच्या मागे रंग उधळावेत. त्यावर मी म्हणालो, ‘ रंग उधळ्ण्यात आता स्त्रियाही काही मागे नाहीत ! सध्याच्या मालिका त्याचे प्रतिबिंब आहेत एक नायिका चार - चार लग्ने करताना दिसते. त्यावर ती म्हणाली, ‘ त्याचा आणि वास्तवाचा काही संबंध नाही वास्तवात आमचे प्रियकर इतके श्रीमंत कोठे असतात आणि असले तरी आपल्या प्रेयसीला हॉटेलात घेऊन जायचे आहे म्ह्णून अक्के हॉटेल बुक करण्या इतके मुर्खतरी कोठे असतात ? त्यावर मी मनातल्या मनात म्हणालो, ‘ हे बाकी हिचे बरोबर आहे नाहीतर आंम्हाला प्रेयसीसोबत फाईव्ह स्टार हॉटेलात बसल्याचे स्वप्नातच पाहावे लागते. तिच्याशी चर्चा करत करता माझ्यातील लबाड पुरुष जागा झाला होता. मी तिला नीट निरखून पाहिले जे मी अगोदर केले नव्हते तिनेही बर्‍यापैकी अंग झाकणारे पण अंगाची मापे देणारा पोशाख परिधान केलेला होता. नखांना नेलपॉलिश लावलेले होते, डोळ्यात काजळ, गालाला लाली आणि ओठांना लिपस्टिक, कवीच्या भाषेत सांगायचे तर मेनका दिसत होती. यापूर्वी मी हे सारे पाहिले नव्हते कारण मला ज्या गावी जायचे नसते त्या गावचा रस्ता मी कधी कोणाला विचारत नाही. मी लहानाचा मोठा झालो कुडाच्या झोपडीत गरीबीचे फटके खात,मी माझे शाळेय शिक्षण अनवाणी फाटके कपडे शिवून पूर्ण केले, सभोवतालच्या दारुड्या, व्यसनी, झुगारी, गुंड आणि स्त्रिलंपट लोकांचा सहवास आम्हाला भरभरून लाभला होता. त्यामुळे माझ्यावर लहानपणापासून चांगले संस्कार झालेले आहेत असे म्हणे हाच मोठा विनोद ठरेल. माझ्या बोलण्याची सुरूवात च्या आयला...पासून होते. मी तिला बसमधे कवितासंग्रह वाचताना दिसलो तो ही मराठी म्ह्णून ती मला कदाचित सुसंस्कृत आणि सभ्य समजली असेल नाहीतर हल्ली लोक बसमधे डोळे फोडून मोबाईलवर चित्रपट पाहताना दिसतात कानाच्या भोकात हेअरफोन घुसवून ! माझ्या मनात काय चालले आहे हे बहुदा तिला कळले असावे म्ह्णून ती मला म्ह्णाली, ‘ तुंम्ही या कवितेत म्हटल्याप्रमाणे लबाड पुरुषच आहात ना ? मी मानेनेच हो म्ह्टल्यावर ती म्हणाली, ‘ म्हजे तुम्ही ही तुमच्या प्रेयसीशी अशीच लबाडी करता ? त्यावर मी स्वतःला सावरत म्हणालो, ‘ मला अशी लबाडी करावी लागत नाही कारण माझी कोणी प्रेयसीच नाही ! हा ! पण उद्या लग्नानंतर माझ्या बायकोने मला प्रश्न विचारला की लग्नापूर्वी तुमच कोणावर प्रम होत का ? तर मी खोटच बोलेण की नाही तू माझ्या आयुष्यात आलेली पहिली आणि शेवटची स्त्री आहेस जिच्यावर माझे प्रेम आहे. माझ्या मते बायकोने नवर्‍याला हा प्रश्न विचारणे हाच सर्वात मोठा मुर्खपणा आहे. माझ्या मते आपल्या देशातील बायकांनी आपल्या लग्नापूर्वी आपल्या नवर्‍याचे दुसर्‍या कोणा स्त्रीवर प्रेम होते हे गृहीत धरूनच वागल्या तर त्यांचे संसार सुखी होतील. नवर्‍याने ही तेच करावे कारण मध्यंतरी म्हणे कुटलीशी मालिका पाहून एका नवर्‍याने आपल्या बायकोला तिच्या पुर्वायुष्याबद्दल सारे खरे खरे सांगण्याचा ह्ट्ट केला तिने जे सांगितले ते ऐकुण दुसर्‍या दिवशी म्हणे त्या नवर्‍याने आत्महत्या केली. त्यावर तिने मला लगेच प्रश्न केला म्हणजे तुला असे म्हणायचे आहे का की नवरा- बायकोने एकमेकांना त्यांच्या पुर्वायुष्यबद्दल काहीच विचारू नये ? त्यावर मी म्हणालो ,’ विचारावे पण आपल्याला पचेल आणि रुचेल इतकेच ! भविष्यात तुझ्या बायकोने काही वेडेवाकडे केले तर तु काय करशील ? त्यावर मी म्हणालो, ‘ मी तिला मुक्त करेन ! पण मी तिला पुन्हा लग्न न करण्याचा सल्ला देईन कारण ज्यांना हे असे काही धंदे करायचे असतील त्यांनी लग्न करण्याच्या भानगडीतच पडू नये कारण हल्ली त्यामुळे ते स्वतःचा आणि विनाकारण समोरच्याचाही जीव धोक्यात घालताना दिसतात. त्यावर ती म्हणाली, ‘ मला वाटत या बाबतीतही स्त्रियांवरच अन्याय होतो पुरुषांनी विवाहबाह्य संबंध ठेवले तर ती त्यांची मर्दानगी मानली जाते आणि स्त्रियांनी ठेवले तर त्या चारित्र्यहीन ठरविल्या जातात हा विरोधाभास का ? त्यावर म्हणालो , ‘ आता तू जो हा पोशाख परिधान केलेला आहेस तो कदाचित तुझ्या नवर्‍याला आवडेलही पण तुझ्या नवर्‍याला आवडते म्ह्णून त्याने साडी नेसलेली तुला आवडेल का ? एकांतातही ! क्षणभर विचार करून ती म्हणाली, पण तुम्हा पुरुषानाच आवडते ना आम्हाला अशा पोशाखात पाहायला ? त्यावर मी म्हणालो,’ आम्हाला आवडते म्ह्णून जर तुंम्ही असे पोशाख परिधान करीत असाल तर तुम्ही आमच्या आवडीच्या गुलाम झालेल्या आहात ! मला तर स्त्रियांची ही गुलामीही मान्य नाही ! जोपर्यत ही गुलामी दूर होत नाही तोपर्यंत स्त्रियांनी स्त्री – पुरुष समानतेच्या वल्गना करू नयेत असं मला वाटत. आज स्त्री - परुष समानता अट्टहास स्त्रिया करीत आहेत पण ती समानता ही कधीच प्रत्यक्षात येत नाही आणि येणारही नाही. त्यावर ती म्ह्णाली, ‘ तुम्ही तर आता एखादया लेखकासारखे बोलायला लागलात ! बर ! मला एक सांगा आजचे काही पुरुष स्त्रियांवर जे अन्याय करतात त्याचे तुम्ही समर्थन करता का ? त्यावर मी म्ह्णालो, ‘ अजिबात नाही ! एखादा नवरा दारू पिऊन बायकोला मारझोड करत असेल तर तिने ही त्याला दोन लाथा हाणाव्यात, एखादा मुलगा लग्नात हुंडा मागत असेल तर अशा मुलाशी लग्न करायला मुलींनी स्पष्ट नकार दयावा, नवरा बाहेर ख्याली असेल तर त्याला मागचा- पुढचा विचार न करता सोडून तरी द्यावे नाहीतर असे काही तरी करावे ज्यामुळे त्याला जन्माची अद्दल घडेल. सर्व स्त्रियांनी स्वावलंबी असायलाच हवे ! नवरा मेला तरी त्यांच्यावर रडण्याची वेळ येता कामा नये कारण नवरा हा त्यांच्या जगण्याचा भाग असतो त्यांचे जीवन नसतो. नैतिकतेचे जे नियम स्त्रियांना लागु आहेत ते सर्व पुरुषांनाही लागू आहेत. आपला जोडीदार निवडण्याचा अधिकार पुरुषांसारखा स्त्रियांनाही असावा त्यात आई - बाबानेही ह्स्तक्षेप करू नये. पण तरीही स्त्रियांनी स्त्री म्ह्णून असणारी त्यांची भुमिका नाकारणे मला मान्य नाही. याचा अर्थ असा नाही की पुरूषांनी स्वयंपाक ,धुणीभांडी व घरातील इतर कामे करू नयेत कारण ती कामे पुरुषांना येत असतील तरच आपल्या देशातील स्त्रियांचे आरोग्य जपले जाईल असे मला प्रामाणिकपणे वाटते. इतक्यात तिचा बसस्टॉप जवळ आल्यावर माझा निरोप घेऊन ती बसमधून खाली उतरली माझ्यासारख्या विश्वामित्राची तपश्चर्या भंग करून ! ती बसमधून उतरल्यावर दुसर्‍याच मिनिटाला माझा मोबाईल वाजला, पलिकडून एक तरुणी म्हणाली, हॅलो ! मी नयना बोलतेय ! आताच आपली बसमधे ओळख झाली होती, मला तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जे मगाशी बोलता - बोलता म्ह्णालात की स्त्री-पुरूष समानता कधीच अस्तित्वात येणार नाही ! ते का ? त्यावर मी म्हणालो, कारण ते ईश्वराला मान्य नाही म्ह्णूनच त्याने प्रथम स्त्रीला आई आणि पुरूषाला मुलगा केला... त्यावर नयना म्हणाली,’ आता तू शोभतोस खरा माझा आवडता लेखक आणि कवी ! आपलाच कवितासंग्रह इतक्या आवडीने वाचणार्‍या कवीलाही मी आज पहिल्यांदाच भेटले... मी तुझ्यातील पुरुष शोधण्याचा प्रयत्न केला पण मला सापडला एक चांगला माणूस जो या जगात विरळ होत चालला आहे. तू लेखक अथवा कवी म्ह्णून मला आवडला होतासच पण त्याही पेक्षा तू मला आज माणूस म्ह्णून आवडलास.Rate this content
Log in