मामाचं पत्र हरवलं ... ते आठवणीत सापडलं
मामाचं पत्र हरवलं ... ते आठवणीत सापडलं


अजूनही आठवतंय लहान असताना आई पत्र लिहायची
तिचे लिहून झाले की पत्राचा शेवटचा मजकूर आमचा असायचा. तोडक्या-मोडक्या अक्षरांमध्ये आम्ही पत्राद्वारे आजी-आजोबांसोबत, मामासोबत बोलत होतो.
पाठवलेल्या पत्राचे उत्तर यायचे वाट बघत बसायचो.
पोस्टमन काका आले की धावत त्यांच्या सायकली जवळ जाऊन उभे राहायचे.
पत्राद्वारे मिळालेलं प्रेमाने आम्ही खुप खुश व्हायचं.
बालपणी मामाचं पत्र हरवलं खेळ खेळता खेळता माहीत नव्हते खरंच मामाचे पत्र हरवेल आणि ते आपल्याला सापडणार नाही.
पोस्टमन काकांची पत्र पोहोचवण्याची प्रामाणिक धडपड असायची.
आज काल पोस्टमन काका क्वचितच पाहायला मिळतात आणि जेव्हा त्यांना पाहतो तेव्हा बालपणीच्या आठवणी जाग्या होतात.
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी.