आयुष्याच्या सहवासात
आयुष्याच्या सहवासात
"लख्ख सूर्यप्रकाशाप्रमाणे
आयुष्यदेखील उजळू दे
मातीच्या कणाकणात
सदैव चांगले गुण राहू दे"
ऊन-पावसाच्या खेळामध्ये थोडा वेळ जरी लख्ख सूर्य प्रकाश मिळाला तरी सारे काही उजळून निघते, तसेच आयुष्याच्या वाटेवर जीवन प्रवासात मनाला थोडी जरी लकाकी मिळाली तरी सारे आयुष्य उजळते.
प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी असा क्षण येतो जेव्हा मनाला उभारी येते त्याचवेळी पूर्ण ऊर्जेने आपण ती सत्कारणी लावली पाहिजे.
निसर्गाच्या खेळात भर उन्हात पाऊसदेखील पडतोच. त्याचप्रमाणे आयुष्यात चांगल्या गोष्टी करताना बऱ्याच गोष्टी आड येतात पण त्यावर मात करून आपण आपली लकाकी कायम ठेवली पाहिजे.
निसर्ग नेहमीच आपल्याला चांगली शिकवण देत असतो. त्याच्या प्रत्येक कृतीत एक धडा दडलेला असतो तो समजून घेऊन आपण आपले आयुष्य चांगले घडवू शकतो आणि निसर्गाला आपल्यात ताजेतवाने ठेवू शकतो.