माझा शेगावचा प्रवास
माझा शेगावचा प्रवास
एकदा माझ्या घरच्यांनी अचानक शेगावला जायचं ठरवलं आम्ही रात्री नऊच्या रेल्वेने शेगावला गेलो तिथे आम्ही सकाळी सहा वाजता पोहोचलो. आम्ही मग चालत चालत भक्तनिवासमध्ये गेलो तिथे रूम बुक केली मग आंघोळ करून गजानन महाराजांच्या दर्शनाला गेलो तिथे खूप मोठी लाईन होती. आम्ही मग त्या लाईनमध्ये लागलो मग मस्त उड्या मारल्या आणि गजानन महाराजांचे दर्शन केले आणि मग आम्ही फिरायला गेलो खूप खरेदी केली आणि तिथली प्रसिद्ध कचोरी खाल्ली. मस्त मजा केली आणि फिरलो मग रात्री आम्ही भक्तनिवासमध्ये जेवण केलं तिथलं जेवण मला खूप आवडलं होत. खूप छान होतं. तिथे स्वच्छता राखणे हा नियम खूप पाळला जातो. माझा खूप छान प्रवास होता.
