Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Siddhi Chavan

Others


5.0  

Siddhi Chavan

Others


"लव्ह इन क्युबेक - १"

"लव्ह इन क्युबेक - १"

3 mins 946 3 mins 946

ट्रिंग...ट्रिंग...ट्रिंग...

' फोन ची बेल वाजत होती. " एवढ्या सकाळी कोण असावे ? जाऊदे फोन बंद करून ठेवतो. आज तरी कोणाचा डिस्टर्ब नको.

ऐन डिसेंबर, बाहेर मस्त पाऊस ! आहाहा सोने को और क्या चाहिए. तसा पण विकेंड आहे. मस्त ताणून देण्याचा मुड."

पण फोन हातात घेऊन Switch off करण्याच्या आत डिस्प्ले वरती आलेला आयरा चां फोटो पाहून माझी इच्छा होईना.मी क्षणाचाही विलंब न करता फोन उचलून कानाला लावला.

" हैलो ब्युटी."


" सिद meet me, it's urgent ! "


"ए हैलो ! काय urgent ? आणि गुड मॉर्निंग वगैरे काही म्हणण्याची पद्धत आहे की नाही?"


"तु झोपलेला आहेस म्हणजे मॉर्निंग झाली का ? 

It's afternoon dear. आणि हो काहितरी सिरीअस आहे. एवढ समजू शकतो ना तु ? ये ! "


एकुणच काय ! तर तिचा आवाज थोडा चिडका वाटत होता. आणि लवकर ये ही माझ्यासाठी अज्ञाच होती. चार शब्द ऐकून घेण्यापेक्षा मी ही 'हो येतो'  म्हणालो

'आज तसही विकेंड असल्याने मेड येणार नाही. चला स्पॉन्सर मिळाली. पोटा-पाण्याचा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. मस्त इंडियन रेस्टॉरंट मध्ये जाऊन इंडियन फुड enjoy करायला मिळेल. बाकी urgent काय असेल ते नंतर बघू'. या विचारात मी झटपट तयार होऊन निघलो देखील. 

ओल्ड क्यूबेक मधील Spice of India नुसत नाव ऐकून तोंडाला पाणी सुटलं ? भजा सारखा नुसता आकार बाकी टेस्टचे काही गन नाही, चपट गोल आकाराचे वडे.... बेसनात बटाटा की बटाटया मध्ये बेसन काही थांग पत्ता लागायचा नाही. दिसायला पांढराशुभ्र रंग, म्हणून डोसे. आम्ही ते डोसे ढोसायचो. बाकी तांदळा मध्ये उडदाची डाळ घालतात की मूगाची, हे ज्ञान पाजळवत बसण्यात कोणाला वेळ नसायचा. तेवढच जरा नावात इंडियन म्हणून आम्ही बापडे उठ-सुठ पळायचो. दिसायला तरी इंडियन पदार्थांची रेलचेल होती. म्हणून तेवढ नेत्र सुख त्यामुळे माझं ही आवडत होटेल ? म्हणायला हरकत नाही.


'आईचा नेहमीचा उपदेश कुठेही हात हलवत जाऊ (रिकामे) नये,म्हणुन सोबत ऑर्किड ची पांढरीशुभ्र आणि ऑर्किड रंगाची फुल घेऊन मी होटेल मध्ये ईन्ट्री केली. पण आज माझा अंदाज मात्र चुकला होता. मला आयरा एकटीच अपेक्षित होती, पण तीच्या बरोबर माझी जाई,जुई,चाफा म्हणजेच माझं क्रश जाई होती. माझ्या वाढलेल्या दाढी वरून हात फिरवत मी स्वतःच्याच डोक्यात एक टपली मारली. काय वेंधळेट आहे मी ! ना परफ्यूम, ना प्रॉपर शेवींग आलो तसाच उठून. काश ! जाई येणार आहे, हे मला आधीच माहित झालं असतं तर .शिटट , स्वतःला कोसत मी टेबलाजवळ पोहोचलो. पण मी दिलेल्या स्माईल ला कोणाची काहीच रिॲक्शन आली नाही. खरंच काही तरी गंभीर प्रकरण आहे तर....'' ....मी स्वतःच्याच विचारात !


फुलांचा गुच्छ टेबलवर ठेवून मी बसणार तेवढ्यात जाई च्या हुंदक्यांची सुरुवात झाली. काय झालं ते कळेना! ती एकसारखी फुलांचा गुच्छ बघून रडत होती. आणि आयरा तीच सांत्वन करत होती, "जाई कुल डाऊन, काम डाऊन" वगैरे वगैरे. काय झालं विचारुन मी ही formality केली. पण काही समजेना. हि फुल तर जाईला आवडतात, तीला आवडतात म्हणून मलाही आवडला लागली आहेत. मग ही फुलांकडे बघुन का बर रडत असावी? माझे मलाच प्रश्न चालू होते. बिच्चारी फुल, मला त्यांची दया येत होती. हि आपली गळा काढून-काढुन एका सुरात रडत होती. एका क्षणासाठी तर मला असं वाटायला लागलं होतं की, 'जणू काय मी शोकसभेला आलो आहे'.


दोन वर्षांपूर्वी भारतात असतानाचा एक प्रसंग मला आठवला. 'एक दुरचे मामा वारले होते. मी आई बरोबर मामींना भेटायला गेलो होतो. आईचाच आग्रह. तेव्हा मामी मामांच्या फोटोकडे बघुन जसं रडत होती, तसं आता जाई या फुलांकडे बघुन रडतं होती'. काय बोलावं सुचेना. बाकी आजूबाजूला येणारे खमंग वास स्वस्थ बसू देत नव्हते. ही रडारड संपल्यावर काय काय ओर्डर करावी हाही विचार मनात येऊन गेला. तरीही जाई बद्दल माझ्या मनात आधी पासून सोफ्ट कोर्नर होताच. नक्की काय झालं असावं हे जाणून घेणे देखील तेवढेच गरजेचे होते. शेवटी कसनुस जाईच्या जवळ सरकत (तेवढीच जवळीक) मी प्रश्न केला. काय झालं जाई? मी काही मदत करु का? 

पण व्यर्थ ची माझी बडबड.

काही उत्तर नाही.


मी आयराकडे बघत नजरेनेच प्रश्न केला. ती देखील काही बोलायला तयार न्हवती.

"फूल आवडली नाही ना तुला? वेटरला सांगतो घेऊन जायला" ! म्हणत मी वेटरला हात केला.

आता मात्र माझा पारा चढला होता, आणि ते माझ्या चेहऱ्यावरील हावभाव स्पष्ट दाखवत होते.

वेटर आमच्या दिशेने येत होता. ईतक्यात जाईने, "नाही सिद्ध्या राहुदे ती फुल मला आवडतात." म्हणत ती फुल उचलुन स्वतः जवळ ठेवली.

कसेबसे स्वत:ला सावरुन तीने डोळे पुसले. 

' मी परत प्रश्नार्थक नजरेने एकदा जाई एकदा आयरा दोघीनकडे पाहु लागलो. '

आता काही खाण्याचा मुड तर अजीबात न्हवता . " अरे मला काहीच सांगायचे नाही तर बोलावल का ? " म्हणत मी उठणार एवढ्यात ऑर्डर आली. आयराने मला खुनेनेच बसायला सांगीतले . आणि जाईने घडला प्रकार सांगायला सुरुवात केली.


(हा पहिला भाग कसा वाटला हे नक्की कळवा..... तुमच्या सुचना देखील कळवा.)

(क्रमश)


©सर्व हक्क लेखिकेस्वाधीन


(माझे कोणतेही लिखाण इतरस्त्र कोठेही पोस्ट करताना या नावासकट टाकावे ही विनंती - सिद्धि चव्हाण - https://siddhic.blogspot.com)


Rate this content
Log in