Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".
Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".

Karuna Gurav

Others


2  

Karuna Gurav

Others


कोरोना योध्दा.. कर्तव्याचा सुगंध दरवळला

कोरोना योध्दा.. कर्तव्याचा सुगंध दरवळला

2 mins 120 2 mins 120

  स्त्री म्हणजे देवाने तयार केलेली त्यागाची, समर्पणाची, कर्तव्य धुरंदर, कर्तुत्ववान मूर्ती होय... स्त्री म्हणजे विश्वातील उत्कृष्टतेची सुंदर प्रतिकृती होय. म्हणूनच अनादिकालापासून स्त्रीचे महत्त्व जपले आहे. स्त्रीचे अस्तित्व मान्य केले आहे. पुरुषप्रधान संस्कृतीतही स्त्रीची उणीव- जाणीव मान्य आहे. मग पुरातन स्त्री असो किंवा आधुनिक स्त्री... सर्वच महिलावर्ग कर्तव्याचा सुगंध सतत दरवळत ठेवत असतात...


    आजची स्त्री शिकली, स्वतःच्या पायावर उभी राहिली, प्रत्येक क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटविला, कौटुंबिक-सामाजिक कर्तव्यात एकनिष्ठ राहिली आहे. याचेच उदाहरण म्हणजे कोरोनाच्या महामारी संकटात कर्तव्य बजावत ड्युटीवर असताना ही वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाला फेऱ्या मारणाऱ्या पोलीस महिला होय...


   वटपौर्णिमेनिमित्त सर्वसामान्य महिला भरजरी शालू, नाकात नाथ, हातभर बांगड्या, कपाळावर सिंदूर, पायात जोडवे -पैंजण, दागिने घालून पूजेची तयारी केली... कोणी घरात रांगोळी काढून तर कोणी चित्रातून वड, रेखाटून कोणी कुंडीत वडाचे रोप लावून तर कोणी प्रत्यक्ष वडाला पूजून वटपौर्णिमा साजरी केली. भारतीय संस्कृतीत वटपौर्णिमेचे महिलांना खूपच आकर्षण आहे. मग ती महिला कोणत्याही क्षेत्रात काम करत असो, ती आवर्जून वटपौर्णिमा करत असतेच. *याला माझ्या पोलीस भगिनी तरी अपवाद कशा असतील !* *शेवटी त्याही स्त्रियाच आहेत ना!*


   स्त्री कितीही शिकली, सुशिक्षित झाली तरी तिची श्रद्धा कमी होत नसते. ती भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण-समारंभ साजरा करतच असते. संस्कृतीची जपणूक तिच्या मनाच्या कप्प्यात दडलेली असते. मग ती डॉक्टर असो, पोलिस असो की एखादी अधिकारी असो... ती वेळात वेळ काढून संस्कृतीची जपणूक करतच असते. याचा अर्थ अंधश्रद्धा नाही तर आपल्या कुटुंबाच्या, पतीच्या, मुलाबाळांच्या आरोग्यासाठी, सुरक्षिततेसाठी, आनंदासाठी एक श्रद्धा म्हणून ती प्रत्येक सण-समारंभ साजरा करत असते. मातृत्वाची मूर्ती असल्याने तिलाही कुठेतरी अनामिक भीती असतेच ना! श्रध्देमध्येदेखील खूप सकारात्मक शक्ती दडलेली आहे. हीच तळमळ वटपौर्णिमेनिमित्त पोलीस भगिनीमध्ये दिसून आली.


त्यांची वटपौर्णिमा वेगळ्याच पद्धतीने साजरी झाली. त्यांनी भरजरी शालू न घालता *कर्तव्याचा गणवेश* चढवला... सामाजिक संकटांना लढणारा *मनगट थोटा केला* (म्हणजे मनगटाला कमजोर करणार्‍या बांगड्या उतरविल्या) नाकात नथ घालण्याएवजी कोरोना प्रसाराला व्यसन घालणारा *मास्क लावला*, जिथं सिंदूर लावलं जातं त्याच मस्तकावर *कर्तृत्वाची टोपी* चढवली, पायातील पैंजण घालण्याऐवजी जनसामान्याचे रक्षण करणारा *टपटप दहशती आवाजाचा बूट* परिधान केला, हातात आरतीचे ताट घेण्याऐवजी *ध्येयवादी शस्त्र असलेली काठी* हाती उचलली आणि आपली संस्कृती व सध्याचे कर्तव्य यांची उत्तम सांगड घातली. याच वेशात वटपौर्णिमेची पूजा मनोभावे पार पाडली.


     सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी सावित्रीने वटपौर्णिमेचा वसा घेतला. तर आमच्या या भगिनींनी साऱ्या देशातील बंधू - भगिनींचे प्राण वाचवण्यासाठी वडाला फेऱ्या घातल्या आणि कर्तव्याचा वटवृक्ष आणखी आणखी विस्तृत केला... वटपौर्णिमेनिमित्त सार्वजनिक वडाला आलेल्या भगिनीचे रक्षण करता करता स्वतःचे संसारीक कर्तव्यही पार पाडले. यालाच म्हणतात, *संकटांना न भिता संकटावर मात करत प्रत्येक क्षणाचा आनंद लुटता आला पाहिजे* या माझ्या सावित्रींना मानाचा मुजरा... 


*पोलीस, डॉक्टर्स, नर्स व कर्मचारी महिला वर्गाचा मला अभिमान वाटतो... सावित्रीच्या लेकींनों तुम्हाला शतशः प्रणाम!*


Rate this content
Log in