Nilesh Bamne

Others

3  

Nilesh Bamne

Others

जगावेगळा पुरुष

जगावेगळा पुरुष

9 mins
784


विजय संगणकावर एक डिझाईन करण्यात गुंतलेला होता त्याच्या शेजारी बसून जुई नावाची एक सुंदर तरुणी त्याच्याकडे काही धडे घेत होती . इतक्यात त्या कंपनीचे मालक तेथे आल्यावर त्याला म्हणाले , " "विजय सर ! डिझाईन हुआ क्या ? " त्यावर विजय म्हणाला , हा हो गया है फिरभी कोई करेक्शन आया तो जुई कर लेगी ! त्यावेळी विजय छान इस्त्री केलेल्या कपड्यात अप टू डेट म्हणजे राजबिंडा दिसत होता. दुपारचा एक वाजताच विजय त्या ऑफिस मधून निघून गेला. तो तेथे डिझाईनर दोन तास पार्ट टाईम कामाला येत असे. जुई त्या ऑफिसमध्ये नव्यानेच कामाला राहिली होती. जुई दिसायला खूपच सुंदर होती यात शंकाच नव्हती पण स्वच्छतेच्या बाबतीत ती फारच म्हणजे फारच अती होती. विजय त्या बाबतीत फारच ढ ! होता याची जुईला कल्पना नव्हती. जुईची आणि त्याची बऱ्यापैकी गट्टी जमु लागली होती. पण एक दिवस अचानक जुईने विजयच एक वेगळंच तिला अपेक्षित नसणार रूप पाहिलं. एक दिवस तिच्या मालकांना संगणकात काहीतरी मोठा बिघाड झाल्याचे लक्षात येताच त्यांनी जुईला दोन कारखाने सोडून असलेल्या कारखान्यातून विजयला बोलावून आणायला सांगितले . म्हणून ती त्या कारखान्यात गेली. पाहते तर काय ? तेथे विजय मळके कपडे अंगावर चढवून एकटाच लेथ मशिनवर तितक्याच उत्साहाने काम करत करत होता जितक्या उत्साहाने तो संगणकावर काम करतो. विजयचे हे ओंघलवाणे रूप पाहून जुईचा चेहरा पडला कारण ती विजयच्या त्या राजबिंड्या रूपाच्या प्रेमात पडू पाहात होती. 

      

जुईची स्वच्छतेच्या बाबतीत अवास्तव कल्पना होत्या. ती कशानेही खराब झालेले तिचे हात धुण्यापूर्वीही कोणी वापरलेल्या फडक्याने पुसत नसे. तिला आजूबाजूला सर्व चकाचक हवं असायचं आणि येथे विजय ग्रीसने माखलेले कळकट कपडे अंगावर चढवून त्याच्या दिवसातील जास्तीत जास्त वेळ त्या धुळीने माखलेल्या अस्वच्छ जागेत काढत होता. त्याच्या या मळकट कपड्यांना कसा वास येत असेल या कल्पनेने जुईने नाकाला रुमाल लावला. जुई या आत्ताच्या ऑफिसमध्ये नुकतीच रुजू झाल्यामुळे तिला वाटत होते की विजय येथे पार्टटाइम डिझाईनर आहे म्हणजे फुलटाईमही तो हेच काम करत असेल ! पण सध्याचे हे चित्र पाहून तिचा अपेक्षाभंग झाला. तरीही ड्युटी म्हणून तिने विजयला बॉसचा निरोप कसाबसा दिला तिला वाटले होते, तिने त्याला या वेशात त्याला पाहिले म्हणून तो बावचलेलं पण तसे काहीच झाले नव्हते. तिच्या अपेक्षेप्रमाणे तो तिच्या सोबत ते कपडे न बदलताच गेला आणि संगणकातील बिघाड दुरुस्त करून माघारी आला. जुईला हे कळत नव्हते," एवढ्या हुशार माणसाला इतकं सगळं येत असताना त्या यंत्रांवर काम करायची काय गरज ? ते ही इतके अस्वच्छ कपडे अंगावर चढवून आणि त्याचे त्याला काही वाटतही नाही".  त्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा कार्यालयात दोघे एकत्र बसलेले असताना बोलता - बोलता ती विजयला म्हणाली, सर ! ...तिला विजयला सर बोलणे क्रमप्राप्तच होते कारण तिचा बॉसही त्याला सर बोलतो !!! तुम्हाला संगणका बद्दल इतके ज्ञान असताना तुम्ही ते मशीनवर काम का करता ? त्यावर विजयने तिला प्रतिप्रश्न केला , का त्यात काय वाईट आहे ? लाखो लोक ते काम करतातच ना ? ? त्यावर ती म्हणाली , तुम्हाला इतर अनेक कामे येत असताना का ? उगाच कशाला त्या मळकट कळकट कपड्यात वावरायचे हे असे एसी कार्यालयात थंड हवा खात आराम खुर्चीत बसून संगणकावर आरामात काम करून चांगला पगार मिळू शकत असताना ? त्यावर विजय त्याच्या गालात गोड हसला ! तितक्यात तिचा बॉस तेथे आला आणि त्याने विजयसोबत एक नवीन यंत्र बनविण्याबाबत बोलणी सुरू केली . त्यातील काहीही जुईला कळत नव्हते कारण तिचा एकाच यंत्राशी सबंध आला होता. एक दिवस पुन्हा कोणत्यातरी कामासाठी ती विजयला बोलवायला त्याच्या करखान्यात गेली तर तो कारखान्यात चक्क झाडू मारत होता. ते पाहून तर जुई आणखीनच विचारात पडली , खरं म्हणजे तिची सटकली ! दुसऱ्या दिवशी न राहून ती विजयला म्हणालीच , सर तुम्ही झाडू पण मारता तुमच्या कारखान्यात ? त्यावर विजय तिला म्हणाला, तुझ्या घरात झाडू कोण मारतो ? त्यावर ती म्हणाली, पण सर ! हे तुमचे घर नाही ना ? त्यावर विजय म्हणाला, माझ्या घरात मी कधीच झाडू मारत नाही ! पण येथे आनंदाने मारतो कारण माझ्या कामाची सुरुवात झाडू मारण्यापासूनच झाली होती. ज्याच्या कामाची सुरुवात झाडू मारण्यापासून झालेली असते तेच खूप पुढे जातात ? आमच्या कारखान्यात एक वेळ झाडू मारायला कधी कधी मी कंटाळा करतो पण आमचे मालक करत नाहीत...त्यांच्याकडूनच मी हा धडा घेतला आहे की कोणतेच काम हलके नसते आणि माणूस मोठा त्याच्या हुद्याने नाही तर तो समाजाला काय देतो त्यामुळे ठरत असतो...झाडू मारण्यापासून सुरुवात करून मी अनेक यंत्रांवर स्वार झालो...मला ती यंत्रे माझ्या खूप जवळची वाटतात त्यांच्या सानिध्यात राहायला मला आवडते, कारण त्यामुळे काहीतरी नवीन निर्माण केल्याचं समाधान मला त्यामुळे मिळतं. रोज तेच तेच काम करण्याचा मला कंटाळा येतो. मला काहीतरी नवीन निर्माण केल्यावर प्रचंड आनंद होतो. करोडो लोकांचं आयुष्य एकच काम करण्यात संपून जात. आज मला इतकं काही करता येत की त्यातील एक कामही मला माझा उदरनिर्वाह करायला आयुष्यभर पुरं पडू शकतो.

      तुला काय वाटतं ? हे सगळे लोक मला सर का म्हणतात ? त्यावर जुईने का ? असा प्रश्न केल्यावर विजय म्हणाला , मी जो त्याग केला आहे , करतो आहे, तो हे कधीच करू शकत नाहीत म्हणून ! मी ते काम करतो कारण ते मला आवडते ! पैसेच कमवायचे असतील तर ते मी काय एका जागेवर बसूनही कमवू शकतो अगदी सहज !!! मी जर हे काम केले नाही तर हा कारखाना कदाचित बंदही होईल ! मला ते होऊ द्यायचे नाही !!! या कारखान्याचे मालक त्यांच्यासोबत असणारे माझे जिव्हाळ्याचे संबंध ते माझ्यासाठी पैशापेक्षाही महत्वाचे आहेत. मला घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. मी या कारखान्यात कामाला राहिलो नसतो तर कदाचित मीही एका चौकटीतील स्वार्थी जीवन जगत असतो तुझ्यासारखा ! मला एक सांग जुई तू आतापर्यत समाजासाठी काय केलंस ? तू स्वच्छतेच्या बाबतीत इतकी आग्रही आहेस पण तू नक्कीच तुझे एक दोन वेळा वापरलेले नवीन कपडे कधीतरी तू किंवा तुझ्या आईने दान दिले असतीलच ना ? ते कोणीतरी वापरले असतीलच ना ?? आज मी मनात आणलं तर सुट-बुटातही वावरू शकतो पण मला ते आठवते की मी कित्येक वर्षे दोन जोड कपड्यात घालविली होती. तेव्हा माझ्या जवळच्या नातेवाईकाने मला त्याचे वापरलेले कपडे घालायला दिले होते मी ते तेव्हाची गरज म्हणून स्वीकारले पण स्वतःला सांगितले आपली ओळख कपड्यांमुळे नाही तर आपल्या कार्यामुळे जगाला व्हायला हवी ! त्यामुळे मी कपड्यांच्या बाबतीत फार जागरूक नाही कारण मी आज फटके कपडे घातले तरी माझी किंमत कमी होत नाही. पण माझ्या विचारांशी मी तडजोड करत नाही. कोणावरही झालेला अन्याय मला सहन होत नाही. चूक करणारा मग तो कोणीही असो माझ्या कुटुंबातील असला तरी मी त्याची बाजू घेत नाहीत ! सर तुम्ही तर आता एखाद्या पत्रकारासारखे बोलायला लागलात, जुई विनोदाने म्हणाली. तितक्यात विजयला त्याच्या मोबाईलवर कोणाचातरी फोन आला. त्यावर बोलायला सुरुवात करताच विजय म्हणाला , हो ! मी पत्रकार विजय जाधव बोलतोय ! जुई त्याच्याकडे एक टक पाहत राहिली. विजयने त्याच्या पाकिटातील त्याचे विझिटिंग कार्ड तिच्या हातात दिले त्यावर विजयचा उल्लेख एका मासिकाचा संपादक असा होता. त्यावर जुई त्याला म्हणाली, इतक्या अनेक गोष्टींचं ज्ञान असणारा माणूस यंत्रात गुंतून पडलेला मी पहिल्यांदा पाहतेय. त्यावर विजय विनोदाने म्हणाला, त्यामुळेच माझी एक ना धड भराभर चिंद्या अशी परिस्थिती झाली आहे. जो कोणी ज्या स्वरूपाची माझ्याकडे मदत मागतो ती करणे मला शक्य असेल तर मी करतो ! कोणी माझ्याकडे पैशाची मदत मागितली तर ती मी नाही करू शकत कारण मी माझा खर्च भागावा इतकेच पैसे कमावतो. लोक मला कित्येकदा स्वतःसोबत काम करण्यासाठी जास्तीच्या पैशाचे आमिष दाखवतात. कारण त्यांना माझ्या ज्ञानाचं भांडवल करून पैसे कमवायचे असतात. पण मी त्यांना भीक घालत नाही. मी अती श्रीमंत आणि अती गरीब दोन्ही प्रकारच्या लोकांत वावरतो. मला गरिबांची वेदना आणि श्रीमंतांची जगात दुर्लक्षित असणारी दुःखे ही माहीत आहेत. जुई तू वरवर खूप आंनदी दिसतेस पण तुला तुझ्या विधवा आईची आणि लहान भावाची खूप काळजी आहे. छोटी मोठी कामे करून तू आपलं शिक्षण पूर्ण केलंस आज तू ह्या योग्य झाली आहेस की तू तुझी तुझ्या कुटुंबाची सगळी स्वप्ने पूर्ण करू शकतेस. त्यावर जुई त्याच्याकडे एक टक पाहत राहिली ! त्यावर विजय तिला म्हणाला, असं काय पाहतेस माझ्यातील पत्रकार सतत जागा असतो. त्यावर जुई गालात हसली आणि म्हणाली आता हे म्हणू नका की तुम्ही कविताही लिहिता ! त्यावर विजयने त्याचा प्रकाशित झालेला एक प्रेमकवितांचा कवितासंग्रह सही करून तिच्या हातात ठेवला . त्या पुस्तकावरील मुखपृष्ठही त्यानेच रंग भरला होता. दुसऱ्या दिवशी जुई विजयला म्हणाली , तुम्ही किती छान प्रेम कविता लिहिता ? कोण होती ती जिच्यावर ह्या कविता लिहिल्या ? त्यावर विजय म्हणाला, ती कोणी एक नव्हती त्या असंख्य होत्या ! कोणी माझी बालपणीची मैत्रीण होती, कोणी शाळेतील, कोणी कॉलेजातील, कोणी प्रवासातील, कोणी मित्राची बहीण , कोणी मित्राची प्रेयसी, कोणी अशीच सहज भेटलेली. कोणी माझ्यावर प्रेम करणारी... त्यावर तिने हळूच विजयला प्रश्न विचारला सर ! तुम्ही लग्न का केलं नाही ? त्यावर विजय हसून म्हणाला, माझ्या प्रेमकविता वाचून माझा प्रेमभंग वगैरे झाला असले म्हणून मी लग्न केलं नाही. असं तुला वाटत असेल तर तो तुझा गैरसमज आहे ! मी कसे गरिबीत दिवस काढले , कोणते हाल - अपेष्टा सहन करून स्वतःला घडवलं याच भांडवल करून मला मोठेपणा मिळविण्यात अजिबात रस नाही. मला वाटत की मी माझ्या आयुष्यात काहीतरी भरीव कार्य करावं जेणे करून मी गेल्या नंतरही समाजाला माझ्या त्या कार्याचा उपयोग होईल. त्यासाठी मला ठरवून राजकारणी व्हायचे नाही ! समाजकारण करायला राजकारणाची गरज आहेच असे नाही. हे माझे स्पष्ट मत आहे. प्रत्येकाने आपल्या कुवतीप्रमाणे आपल्याला झेपेल तेवढी जरी समाजसेवा केली तर समाजाच खूप भलं होईल. मी कोणालाच समाज सेवा करण्याचा सल्ला देत नाही कारण ती कर्णयची प्रबळ इच्छा आतून निर्माण व्हायला हवी. माझ्या समाजसेवेसाठी मी कोणाकडून पैशाच्या मदतीची अपेक्षाही करत नाही. मी माझ्या मी कमावलेल्या पैशातूनच समाजसेवा करतो. खरं म्हणजे जे जगणं माझ्या वाट्याला आलं होतं ते पाहता मी पैशाच्या मागे धावायला हवे होते . खरं म्हणजे मी सुरुवात तरी तशीच केली होती पण एक दिवस मी काही स्वाध्यायी तरुणांच्या संपर्कात आलो. मी त्यांच्यातील एक झालो नाही पण त्याच्याकडून मी बोध नक्कीच घेतला. जे मिळेल ते वाचून मोकळं व्हायचं हा माझा स्वभाव त्यामुळे मी अनेक विषय आत्मसात केले. अगदी अलीकडे मी ज्योतिष्य हा विषयही हाताळला. मी सामान्य नाहीच पण सामान्य माणसातील एक होऊन राहायला मला आवडत ! जुई लगेच म्हणाली, जर मी इकडे कामाला राहिली नसते तर तुम्हाला भेटू शकले नसते. त्यावर विजय म्हणाला, नाही तसे नाही तू मला भेटणे आणि माझ्याशी बोलणे हे तुझ्या प्रारब्धात होते. मला रोज शेकडो लोक भेटतात पण माझ्याशी बोलण्याचे भाग्य काही मोजक्याच लोकांना लाभत. नाहीतर माझ्या घरातल्या लोकांशीही मी फार बोलत नाही. त्यावर जुई म्हणाली, सर ! एक दिवस तुम्ही खूप मोठे व्हाल तेव्हा मी तुम्हाला भेटले तर ओळख दाखवाल ना ? त्यावर विजय म्हणाला, एक वेळ तू मला विसरशील पण मी तुला विसरणार नाही त्यावर का ? असा जुईने प्रतिप्रश्न करताच विजय म्हणाला , कारण मी माझं हृदय पहिल्यांदा कोणा तरुणीसमोर मोकळे केले आहे. त्यावर जुई गालात गोड हसून म्हणाली , मला त्या हृदयात आयुष्यभर राहायला आवडेल...यावर विजय म्हणाला, ते येणारा कालच ठरवेल कारण मी तुला कळलोय त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक कळायचोय ! ते ऐकून जुई म्हणाली, तुम्हाला समजून घेण्यातच आयुष्य गेलं तर माझं आयुष्य किती सुखा समाधानाचं असेल...त्यावर विजय म्हणाला , सुख समाधान असेल की नाही ते माहीत नाही पण तुला पूर्ण स्वतंत्र नक्की मिळेल. जे आजही जगातला कोणताच पुरुष स्त्रीला द्यायला सहज तयार होत नाही...त्यावर जुई म्हणाली , मी असंख्य पुरुष पाहिले. पण तुमच्या सारखा जगावेगळा पुरुष पहिल्यांदा पाहते आहे. तुम्ही आहात तसेच रहा मी रस्त्यावरही तुमच्यासोबत संसार थाटायला तयार आहे ? जुईचे हे शब्द ऐकताच विजय म्हणाला ... तशी वेळच येणार नाही म्हणजे तू येऊ देणार नाहीस याची मला खात्री आहे आणि मी माझ्या कोणत्याच जबाबदारीत कधीच कमी पडत नाही ! पण तू हे बोलण्याची हिंमत दाखवलीस इतके पुरेसे आहे मला तुझ्या प्रेमात पडायला ! आता तू एकदिवस या जगात माझ्यापेक्षाही महान ठरशील याची मला खात्री आहे...त्यावर दोघेही गालात गोड हसले...


Rate this content
Log in