Nilesh Bamne

Others

3  

Nilesh Bamne

Others

जाणीव

जाणीव

4 mins
1.8K


सकाळी सकाळी बाबांचा प्रश्न तुझ्याकडे चार - पाच हजार आहेत का ? मी नाही म्हणताच त्यांचा पारा चढला ! तुझ्याकडे कधीच पैसे नसतात मग कामाला का जातोस ? मी कामाला का जातो हा प्रश्न खरं म्हणजे मलाही कालचपडला होता एक परप्रांतीय मला बसटॉपवर भेटला माझ्याशी बोलता- बोलता त्याने मला माझ्या कामाविषयी विचारले मी त्याला उडवाउडवीची उत्तरे दिली मुंबईत अनोळखी माणसाला आपली खरी माहिती द्यायची नाही हे मीस्वतःच स्वतःला घातलेले बंधन ! पण माझ्याकडे मात्र पोपट बोलतो तो ही बोलला पोपटासारखा तो महिन्यापुर्वीच मुंबईत आला होता फार शिकलेला नसताना एका कार्यालयात दहा हजार महिना कमावत होता आणिरविवारी पार्ट टाईम करून आणखी दोन हजार म्हणजे बारा हजार मी त्याला मी महिन्याला वीस हजार कमावतो हे खोटेच सांगितले तरी त्याला ते वीस हजार कमी वाटले तो मला म्हणाला इसमे भी क्या होता है ? मी मनातम्हणालो मुर्खा ! मला वीस हजार पगार असता तर मी या बस - स्टॉपच्या रांगेत नसतो स्वतःच्या गाडीत असतो ! पण मला प्रश्न पडला हा परप्रांतीय आमच्या राज्यात येऊन सहज पैसे कमावतोय आणि आम्ही मात्र संघर्षकरतोय ! इतके दिवस मी माझ्या बापाला दोष देत होतो पण आता स्वतःला दोषी मानू लागलो होतो . आमचे बोलणे आमच्या बाजूला उभी असणारी आधुनिक सुंदर तरुणी ऐकत होती तिला माझे बोलणे आवडले की माझ्यापगाराचा आकडा ती माझ्याकडे पाहून गोड हसली. हसली म्हणजे फसली हेे सूत्र मला लागू होत नाही कारण माझ्याकडे पाहून हसणाऱ्या मुलींची कमी नाही कारण त्यातल्या काही प्रेमाने , काही उत्सुकतेने, काही फक्त त्यामला ओळखतात हे दाखविण्यासाठी हसतात तर काही चक्क माझ्या मूर्खपणावर हसत असतात. अशीच एका मूर्ख मुलीच्या मी प्रेमात पडलो होतो तिला उगाच वाटत होते मी तिच्यासाठी बदलेन म्हणजे पैशाच्या मागे धावेनवगैरे पण मी तिलाच बदलले ! तिने माझा नाद सोडला. तो परप्रांतीय निघून गेल्यावर ती तरुणी मला म्हणाली , " तुम्हाला खरच वीस हजार रुपये पगार आहे ? त्यावर मी तिला म्हणालो तुला खरंच असं वाटत का ? की मलावीस हजार पगार असता तर या बसच्या रांगेत असतो ? त्यावर ती म्हणाली, तुम्हाला लाख रुपये पगार असता तरी तुम्ही याच बसच्या रांगेत असता ? मला आश्चर्याचा धक्का बसला मी सावरत तिला प्रश्न केला की का ? माझ्या माहितीप्रमाणे तुमच्याकडे गाडी आहे ? बाईक तुम्ही कधीही घेऊ शकता पगार तुम्हाला मिळतच नाही कारण तुम्ही समाजसेवक आहात ! तुमचा खर्च भागेल इतकेच तुम्ही कमावता ! म्हणूनच तुम्ही अविवाहित राहिलात कित्येक तरुणी तुमच्यावर मरत असताना ! आता मात्र मी सावध झालो आणि तिला म्हणालो, तु मला ओळखातेस ? मी तुम्हाला ओळखत नाही तर जाणते ! तुम्हाला जग ओळखते पण मी जाणते, जगाच्या दृष्टीने भले तुम्ही मूर्ख असाल पण माझ्या नजरेत तुम्ही एक असामान्य पुरुष आहात तुमच्या कार्याची किंमत पैशात होऊच शकत नाही करोडपती लोक तुम्हाला भेटायला तुमच्याशी बोलायला उत्सुक असतात ते तुमचा आदरकरतात. पैशाच्या मागे असतात तर आता परदेशात असता आणि सर्व सुखे तुमच्या पायात लोळण घेत असती. त्यावर मी म्हणालो पण आता खरंच वाटू लागलंय ही समाजसेवा आता माझा जीव घेईल ? कविता , कथा अथवालेख लिहून पोट भरत नाही ! त्यावर ती म्हणाली, तुम्ही पोटाची काळजी करू नका ? तुमचे कार्य इतके मोठे आहे की तुमच्यावर उपाशी राहण्याची वेळ कधीच नाही येणार आणि आलीच तर मला हाक मारा ! मी विनोदानेम्हणालो तुला हाक मारायला मला तुझं नाव तरी माहीत आहे का ? माझे नाव आणि मोबाईल नंबर तुमच्या मोबाईलमध्ये आहे आज सकाळीच मी तुम्हाला तुमचा लेख वाचून फोन केला होता आपण बराच वेळ चर्चा केलीहोती! अहो ! तुमचं फक्त नाव सांगून हजारोंची कामे मोफत होतात आणि भविष्यात तुमच्या कामाची किंमत लागली तर ती करोडो रुपये असेल ! विषय बदलत मी म्हणालो अच्छा ! म्हणजे तू यामिनी जाधव ! पण मुंबईतमराठी माणसाची काळजी घ्यावी म्हणजे फक्त मराठी माणसासाठी त्याच्या हितासाठी काहीतरी तळमळीने करण्याची वेळ आता जवळ आली आहे त्यावर ती म्हणाली त्याची सुरुवात माला खात्री आहे आता तुम्हीच करणारआणि मी तुम्हाला साथ देणार आयुष्यभर !!! तीच बोलणं मी फार मनावर घेतलं नाही रात्री माझ्या आईने एक फोटो दाखविला लग्नासाठी तो फोटो यामिनीचा होता आई म्हणाली , तिला फक्त तुझ्याशी लग्न करायचं आहे बाकी काही नको आपल्या आमदार साहेबांची मुलगी आहे ! तिचा फोटो माझ्या हातात असताना तिचा फोन आला ती म्हणाली तुम्हाला बसच्या रांगेत पाहिले आणि मी गाडीतून उतरून तेथे आले तुम्ही खरचं खूप विचित्रआहात तुमचा हा विचित्रपणा पाहून मी तुमच्या प्रेमातच पडले तुम्ही कराल ना माझ्याशी लग्न नाहीतर माझी खरी ओळख कळल्यावर नाही म्हणाल ! त्यावर मी म्हणालो मी तुझ्याशी नाही तू माझ्याशी लग्न करत आहेस तूमाझ्यातील जाणिवेला जाणलेस मी तुझ्यातील प्रेमाला नाही जाणणार! मी तुला गाडीतून उतरताना पाहिले होते आणि मी तुला ओळखत होतो म्हणूनच माझ्यातील पोपट बोलला नाही ! त्यावर ती विनोदाने म्हणाली, लग्न झाल्यावर माझ्यातील मैनाही पाहाल...


Rate this content
Log in