Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Pradip Joshi

Others


1  

Pradip Joshi

Others


गुजरातची भ्रमंती आनंददायी

गुजरातची भ्रमंती आनंददायी

3 mins 1.1K 3 mins 1.1K

गुजरातमधील सिल्वासा, खानवेल, वासोना, सातमलिया, दुधनी, उभारत बीच हा परिसर अतिशय प्रेक्षणीय आहे. गुजरात विषयी आम्ही बरेच काही वाचले होते, ऐकले होते त्यामुळे हा परिसर एकदा नजरेखालून घालावा अशी आमची इच्छा होती. त्यास अचानक मूर्त स्वरूप लाभले. सुरतला साड्या चांगल्या मिळतात असे आम्हाला सांगितले गेले, चला साड्या खरेदी बरोबर गुजरातचा काही भाग तरी पाहता येईल म्हणून आम्ही ही ट्रिप आखली. त्याला बराच कालावधी लोटला असला तरी आजही त्याच्या स्मृती आमच्या मनात ताज्या आहेत.

तीन दिवसांचा हा दौरा होता. त्या रात्री आम्ही पुणे सोडले. द्रुतगती मार्गाला येताच मुसळधार पावसाने आम्हाला गाठले. जावयांची स्वतःची चार चाकी गाडी असली तरी पावसात एकट्याने ड्रायव्हिंग करून थेट सुरत गाठणे जरा कठीणच होते म्हणून आम्ही पनवेलला मुक्काम केला. सकाळी लवकर पुढच्या प्रवासाला सुरवात केली. सुरतला पोहचताच आम्ही चाळीस किमी अंतरावर असलेल्या उभारत बीचवर गेलो. गाडी पार्क करण्यासाठी 50 रुपये व समुद्राच्या काठाला बैठक व्यवस्थेसाठी 50 रुपये द्यावे लागले. हा बीच तसा धोकादायक वाटला. येथे दहा ते पंधरा तात्पुरती स्वरूपाची उभारलेली घरे आहेत. तेथील बायका येणाऱ्या पर्यटकांना सर्व सुविधा पुरवतात. दारूबंदी असून देखील बियरच्या टिन ओढणीत लपवून त्याची 200 रुपयास एक या दराने विक्री केली जाते. मक्याचे कणीस 20 रुपये तर पाण्याची बाटली 30 रुपयास मिळते. हा व्यवसाय करणारी मंडळी जागेच्या भाड्यापोटी वर्षाला 2 हजार रुपये देतात. येणाऱ्या पर्यटकांना गाडी पार्किंग व बसण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे, त्यांना खाद्यपदार्थ पुरवणे हाच या लोकांचा प्रमुख व्यवसाय. सीझनमध्ये ही मंडळी येथेच मुक्कामास असतात. पर्यटक पोहण्याचा व उंट सवारीचा आनंद लुटतात.

रात्री आम्ही सिल्वासा येथे मुक्कामास गेलो. हा परिसर खूपच सुंदर आहे. सह्याद्री पर्वत रांगेत दादर हवेली व नगर हवेलीचा हा परिसर आहे. 2011 च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या 9 लाख 42 हजार 853 आहे. जून ते ऑक्टोबर हा पर्यटकांसाठी सर्वात चांगला कालावधी. दादरा व नगर हवेलीचा 203.21 चौरस कि. मी. चा भाग वन विभागाच्या ताब्यात आहे. येथील पाऊसमान साधारणपणे 2000 ते 2500 मिमी आहे. 

2 ते 8 ऑक्टोबर हा वन्य प्राणी सप्ताह असल्याने या काळात येथे पर्यटनास गेल्यास पर्यटकाना कोणतेही प्रवेश शुल्क द्यावे लागत नाही. वासोना येथील लायन सफारी साठी 3 ते 12 वर्षांपर्यंत च्या मुलांना 10 रुपये, त्यापुढील वयोगटासाठी प्रत्येकी 25 रुपये, परदेशी व्यक्तीसाठी 100 रुपये शुल्क आहे. व्हिडीओ शूटिंगसाठी 100 रुपये मोजावे लागतात.

आम्ही वासोना येथील लायन सफारीचा आनंद लुटला. जाळीच्या गाडीतून वाईल्ड लाईफ एरियातून आम्ही जवळ जवळ तासभर फिरलो. चित्ता, सिंह, बिबट्या अगदी जवळून पाहता आला. खुल्या जागेत हे सर्वजण पहुडलेले होते. आम्ही मोबाईलद्वारा त्यांची छायाचित्रे घेतली. एका वेळी एकच गाडी या एका गाडीत पंधरा जण अशी योजना होती. खिडकीपाशी जागा मिळविण्यासाठी जो तो धडपडत होता. 

वासोना येथील लायन सफारी पाहून आम्ही सातमलिया येथील अभयारण्य पाहण्यासाठी आलो. येथे प्रवेश करताच पर्यटकांसाठी असलेला सूचना फलक दृष्टीस पडला. प्राण्यांना त्रास देऊ नये. त्यांचा पाठलाग करू नये. त्यांना उचलू नये. प्लास्टिक इतस्ततः टाकू नये. शांतता राखावी आशा सूचना त्यावर होत्या. पर्यटकांना ने आण करण्यासाठी छोट्या गाड्या होत्या. प्राणी जवळून पाहण्यासाठी त्या संथ गतीने जात होत्या तर कळप दिसले की थांबत होत्या. त्यामुळे पर्यटकांना पाहिजे त्या पोझमध्ये फोटोग्राफी करता येत होती. येथे नीलगाय-26, सांबर- 199, चितळ- 153, बदक- 10, साळींदर- 02, मोर- 12 अशी त्यांची वर्गवारी होती. 

तेथून आम्ही खानवेल या ठिकाणी गेलो. प्रकृती परिचय केंद्र पाहिले. नगर हवेली प्रशासनाने 3 एप्रिल 2013 ला त्याची उभारणी केली. विविध प्रकारच्या फुलझाडांनी हा परिसर नटलेला आहे. जवळच फुलपाखरू उद्यान आहे. फुलपाखरांच्या विविध प्रजातीची चित्रे व माहिती येथे आहे. 19 जून 2011 ला त्याची निर्मिती करण्यात आली आहे. 

एकूणच हा सम्पूर्ण परिसर प्रेक्षणीय आहे. 


Rate this content
Log in