ग्रीक दंतकथा
ग्रीक दंतकथा


एकदा देवांची राणी हेरा आपल्या सख्यां सोबत वनविहार करत होती. तेव्हा वनदेवता एको चे तिच्याकडे लक्ष गेले. हेरा क्रोधी होती. तिला चिडवण्याचा हेतूने एको ने मोठे वादळ निर्माण केले. झाडे खळाखळा हलू लागली, पालापाचोळा उडू लागला. हेरा ला चालणे जमेनासे झाले. अंगावरील वस्त्रे उडत होती. डोळ्यात धूळ जाऊन अश्रू वाहत होते. अगतिक होऊन राणी एका जागी बसली.
राणी हेरा ची ही स्थिती पाहून एको हसू लागली. ही चेष्टा ऐको ने केली आहे, हे कळताच हेरा संतप्त झाली. ती एको वर खूप रागावली. हेरा चा रुद्र अवतार पाहून अपराध कबूल करण्याची एको ला भीती वाटू लागली. माझा यात काही दोष नाही असे ती म्हणू लागली.
एको धडधडीत खोटे बोलत आहे हे पाहून रानीच्या संतापात आणखी भर पडली खोटे बोलण्याची शिक्षा म्हणून तिने एको ची वाचा च काढून घेतली. तिला फक्त कोणी बोलेल त्याचे शेवटचे शब्द बोलता येत असे.
एको खूप दुःखी झाली ती एकाकी पडली. तिला कोणासोबत बोलूनही आपले मन हलके करता येईना. पण एको ला दुःखी पाहून सर्वजण तिला विचारत, वनराणी तू दुःखी का? राणी त्या प्रश्नाचे उत्तर देई , का. तिला शेवटच्या शब्दा शिवाय काहीच बोलता येत नव्हते.
ह्या जीवनाला ती कंटाळली.हेराला खूश करून आपली वाचा परत मिळवायचीच असे तिने ठरवले. एको च्या लक्षात आले हेरा चा पती झ्युस हा एका स्त्रीच्या प्रेमात गुंतलेला आहे. ही गोष्ट हेराच्या लक्षात आणून द्यावी असे तिला वाटत होते पण पुरावा हाती लागत नव्हता.
एकदा राजा झ्युस व त्याची प्रेयसी वनविहार करीत होती ते एको ने पाहिले ती हेरा कडे गेली. पण आपण पाहिलेले तिला काहीच सांगता येत नव्हते, अखेर तिनेच हवेचे रूप घेऊन हेरा समवेत झ्युस असलेल्या ठिकाण पर्यंत उड्डान केले. हेरा प्रथम रागावली, पण तिचा उद्देश कळल्यावर एको वरचा राग मावळला.
एको मुळे हेरा झ्युसला पकडू शकली होती. एकोच्या ह्या कामगिरीवर खुश होऊन तिने एकोची वाचा परत केली.
एको ने ही खोटे न बोलण्याचे आश्वासन देऊन हेरा चे आभार मानले अशा रीतीने चतुराईने एको ने आपली गेलेली वाचा परत मिळवली.
तात्पर्य--१) कधीही कुणाची चेष्टा करू नये.
२) झालेली चूक कबूल करावी, खोटे बोलू नये