ग्रीक दंत कथा
ग्रीक दंत कथा


देवांचा राजा झ्युस याला सुंदर स्त्रियांचे खूप आकर्षण होते. त्याची पत्नी हेरा स्री जीवन व विवाह यांची अधिष्ठाती देवता होती. ती पतिच्या या सवयीमुळे सारखे चिंतित असायची झ्युस ने एकनिष्ठ राहावे, म्हणून ती त्याची खुप समजूत काढायची पण त्याचा काही परिणाम होत नव्हता. प्रत्येक वेळी मी यापुढे असं काही करणार नाही, अशी आश्वासने देऊन तो सर्वकाही विसरून जायचा.
एकदा झ्युस राजाची नजर आईओ नावाच्या गरीब पण सुंदर स्त्री वर गेली. तिच्या सौंदर्याने राजा बेभान झाला, कोणत्याही परिस्थितीत आईओ आपल्याला मिळायलाच हवी अशी अभिलाषा राजाच्या मनात निर्माण झाली. ती कशाप्रकारे प्राप्त होईल हा विचार तो सारखा करायचा.
इकडे हेराचे आपल्या पतीकडे लक्ष होते. राजाच्या मनात उलाढाल होत आहे व तो आपल्यापासून काहीतरी लपवत आहे हे तिने ओळखले. राजाच्या प्रत्येक कृतीवर तिचे लक्ष होते, थोड्याच दिवसात तिच्या असे लक्षात आले की झ्युसने आईओ बरोबर गपचूप लग्न केले आहे. हे पाहून हेरा संतापली तिने आईओ ला नष्ट करण्याचे ठरवले.
झ्युसला राणीचा स्वभाव माहीत होता. तो आईओ ला खूप जपत होता. झ्युस पासून आईओ ला 'एपपस' नावाचा मुलगा झाला. राणी पासून तिचे रक्षण करण्यासाठी झ्युस ने आईओ चे गायीत रूपांतर केले.
काही दिवसानंतर हेराला ही गोष्ट कळाली की आईओ गायीच्या रुपात वावरत आहे. तिला नष्ट करण्याच्या हेतूने हेरा तिच्या मागे लागली, आईओ जीव मुठीत घेऊन धावू लागली, नाईल नदीच्या काठावर आल्यावर आईओ ला पूर्वीचे रूप प्राप्त झाले. तिने हेरा ला जीवदान मागितले तिची दया येऊन हेराने तिला क्षमा केली.
आईओ चा मुलगा 'एपपस' हा राजा झाला. तो खूप शूर होता. त्याने आपल्या आईचे दुःखी जीवन पाहिले होते. आपल्या पराक्रमाने ते दुःख दूर करून तिला सुखी बनवले.
तात्पर्य -- दुःखाचे रूपांतर काळानुसार सुखात होऊ शकते.