Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Meena Mahindrakar

Children Stories


3.1  

Meena Mahindrakar

Children Stories


दंतकथा-शूर राक्षसी

दंतकथा-शूर राक्षसी

2 mins 186 2 mins 186

ग्रीक दंतकथेत एक अक्राळविक्राळ आणि भयानक पण थोडी विचित्र राक्षसी होऊन गेली. तिचे वैशिष्ट्य म्हणजे डोके माणसाचे तर शरीर सिंहाचे होते. तिने मानव व प्राणी या दोन्ही ठिकाणी आपला दरारा निर्माण केला होता. सर्वजण तिला भीत होते.

     

ही राक्षस विद्यानिपुण होती, त्याबद्दल तिला खूप गर्व होता. आपल्याला वाद-विवादात कोणीही धरू शकणार नाही, असे तिला वाटायचे. स्वतःबद्दल तिला खूप अभिमान होता.

     

या विद्यानिपुण राक्षसीला उगाचच लोकांना मृत्युमुखी पाडून त्यांचे मांस खावे हे मान्य नव्हते, तिला ते पटतही नव्हते. पण पोटाची भूक भागवायलाच हवी, तेव्हा तिने एक युक्ती शोधून काढली, त्यानुसार येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक वाटसरूला एक प्रश्न विचारायची, तिचे प्रश्न खूप अवघड असायचे त्या प्रश्नाचे उत्तर देणार नाही, त्यांना ती खाऊन टाकायची.

      

एक दिवस तिला शेरास सव्वाशेर असा 'एडीपस' भेटला. तिने त्याला अडविले व म्हटले, मी तुला एक प्रश्न विचारणार त्याचे तू उत्तर दिले नाही तर मी तुला खाऊन टाकीन.

       

एडीपस हसला व म्हणाला, मला तुझी अट मान्य आहे पण जर मी तुला प्रश्नाचे उत्तर दिले तर?

   

राक्षसीला विश्वास होता तिच्या प्रश्नाचे उत्तर कोणीच देऊ शकत नाही, ती म्हणाली, तसे जर झाले तर मी माझा प्राण देईल. एवढे बोलून तिने एडीपसला एक प्रश्न विचारला. कसलाही विलंब न लावता एडीपसने त्याचे उत्तर दिले.

      

राक्षसीला दुःख व आनंद दोन्ही झाले. आपण हरलो याबद्दलचे दुःख तर आपल्या प्रश्नाचे अचूक उत्तर देणारा कोणीतरी आहे याचा आनंद होत होता. तिने दिलेल्या शब्दाप्रमाणे स्वतःचा प्राण दिला. अशा प्रकारे एडीपसने इतर मानव व प्राणी यांची प्राणहानी वाचवली.


तात्पर्य - स्वतःबद्दल जास्त अभिमान बाळगू नये.


Rate this content
Log in