घुंगरू भाग - 4
घुंगरू भाग - 4
माई समोर मालती दिसत होती, आतून पोटात गोळा यायचा, पोटुशी सून अश्या लोकांकड का गेली असेल....... विचारांच थैमान चालू होत,विचारात गाव कधी आलं अन वाडा कधी आला हेच समजल नाही...... दार ढकलून माई आत गेल्या, रांजनावरल मडक घेऊन गार पाणी घशाखाली उतरवल पण घसा कोरडाच वाटत होता माईला.... दिवसभर माई दारातच बसून राहिल्या, न्याहरी,दुपारी एक घास पोटात गेला नव्हता, ,, दिवस मावळतीला गेला तस माईच काळीज धडधडू लागल...... मालती आल्यावर तिला ईचारु का नग, दुसरच काय केल असल तर? ,, तेवढ्यात बापू आणि मालती दोघ सोबत येताना माईला दिसली... बापूकडे बघून त्यांना जास्तच काळजी वाटू लागली,मालती गेली होती हे बापूला माहीत असेल का? ..
मालतीन दारात येताच विचारलं आव माई दारात कशापायी बसलात, गारठा सुटलाय,,,... माईंनी मालूकडे बघितल, माईच्या नजरेत आज वेगळच काही आहे हे मालतीला ओळखायला वेळ लागला नाही.. मालतीने लगेच विचारले... माई काय झाल, दुखतय का काय? अस तिन्हीसांजला आज दारात बसलात, काय झालय?...माईंनी नुसतीच नकारात्मक मान डोलावली आणि उठून वाड्याच्या ढाळजात जाऊन बसल्या.......... बापू हात पाय धुऊन माईजवळ येऊन बसले, काय माई रानात काय बी खर नाही बघ,,, हिरीतल पाणी आटत चाललय,,,, ... जवाऱ्या भिजवणीतच पाणी आटल बघ,,, पण माई बापूच्या संगण्याला काहीच प्रत्युत्तर देत नव्हत्या,,,... तोपर्यंत मालती दोघांचा चहा घेऊन आली, माई म्हणाल्या मला नग च्या...... आग माई घे की, गारव्याच बर वाटत..माई म्हणाल्या तुला माले नग म्हणल्याल समजत नाय का?.. माई एवढ्या रागात कधीच बोलत नसत, मालतीला काहीच कळेना, मालती म्हणाली का माई? माझ काय चुकल का? माई रागात म्हणाल्या नाय ग माझच चुकल, अस म्हणून रागात परसदारी जाऊन बसल्या, मनात असंख्य प्रश्न होते......... विचारू कस? हा एकच प्रश्न माईला सतावत होता...
रात्रीच्या जेवणापर्यंत माई परसदारी बसून होत्या, बापूला वाटल बिनसल असल सासु सूनमध्ये काही...... ते दोघीत कधी लक्ष देत नसत, बापू बाहेरून आल्यावर माईकडे गेले, का ग माई अस काय म्हणली मालू? मला नसत सांग तू मी चांगल कान उघडतो तीच, त्यावर माई म्हणाल्या नाय र बापू आस काय बी झाल नाय आमच्यात..... आग मंग उदास रागात का हायस? काय नाय ... तेवढ्यात मालतीने हाक दिली जेवान तयार हाय चला दोघबी जेवायला..... घरात तिघेच असल्यामुळे सगळे सोबतच जेवत, मालतीने ताट वाढून घेतली , माई अन बापू जेवायला येऊन बसले, माईच्या घशाखाली घास उतरेना, बळेच अर्धी भाकर खाऊन हात जोडल आन ताटावरून उठल्या......... तस बापू मालतीला म्हणाले काय ग मालू आज माईच आन तुझं भांडण झाल का? त्यावर मालती म्हणाली... नाय व आस काय बी झाल नाय, मी सकाळी शेतावर येताना तर चांगल्या होत्या पूना काय बिनसल काय माहीत........ बापू म्हणाले बर तू काय बी बोलू नगस, सकाळ मी बोलतो तिला,,,,,अस म्हणून सगळे झोपायला गेले,, माईंना काही केल्या झोप येईना.. थोडा वेळ झाला मनाशी विचार केला मालती माझ्यापासून काय लपवणार नाय, बघते थोड दिवस...... मग हे नित्याचच झालं,काम आवरून मालतीने माळावर जाऊन मग पुढे जायचं आणि माईन तिच्यावर लक्ष ठेवायचं.....
मालतीला चौथा महिना लागला, पोट दिसू लागलं, एक दिवस माई म्हणाल्या, मालू आता तरी नगस जाऊ शेतावर, पोट घेऊन चालत जायाचा दिसभर मजुरांसंग काम करायच, काय अडल व्हय तुझ्यावाचन??.... मालती म्हणाली ,,तस नाही माई पर तेवढच फिरून आल्यावर बर वाटत, आन म्या एकटी कुठं असते ही असत्यात की सोबतीला दिसभर...... मालती ऐकणार नाही हे माईंना माहीत होतं...माई खुश पण होत्या बऱ्याच वर्ष्यानी घरात पाळणा हलणार म्हणून आणि एकीकडे काळजी होती की मालतीच नेमकं काय चालय.....मालतीला बघता बघता सातवा महिना लागला, माई म्हणाल्या पाहिलं पोर हाय साता नवसान राहिलंय डोहाळ जेवाण करायचं, अगोदर मालतीने नाही म्हणून आढेवेढे घेतले , पण नंतर तयार झाली,...... माईनि ब्राम्हणकडून मुहूर्त काढून आणला, चांगली वेळ बघू कार्यक्रमाची तयारी सुरू केली.... ... मालतीच्या माहेरच्यांना माईन आमंत्रण दिल, शेजारच्या बायकांना सांगितलं, मालतीला म्हणाल्या अजून कुणी राहील असलं तर ध्यानात आणून सांग बाई...... तेवढ्यात मालती म्हणाली माई आपल्या शेताच्या वाटवर जाताना माळ हाय न तिथली काय लोक माझ्या वळखीची झाली हायत बुलवू का त्यांला....माई कसतरी विसर पाडत होत्या पण मालतीने आज स्वतःहून नाव काढल तस माईच्या अंगावर शहारे उभे राहिले, घाम फुटला पण जवळ बापू असल्यामुळे काहीच बोल्या नाहीत, मान हलवून हो बोलव अस सांगितलं.......
पुन्हा माईच विचारचक्र चालू झाला.. आता काय करू म्या? ती लोक घरी आली आन काय बर वाईट झालं तर ????तोपर्यंत मालती शेताच्या वाटेवर गेली सुद्धा होती,,,,,,त्या दिवशी बापुना माईकडे बघून चिंतेच कारण विचारलं,, का ग माई कसला ईच्यार करतीस? माईन न राहूऊन बापूला म्हणाल्या, बापू तुझी बायकू कायबी ऐकत नाही बघ,,,बापू म्हणाले आग आता काय झालं ??..... आर बापू झालं कायबी नाय, पर ते आपल्या शेताच्या वाटवर किन्नराची वस्ती हाय नव्ह?हा हाय की........ मालती त्या किन्नरासनी डोहाळजेवणच सांगाय गेली बघ,,,, ती लोक लई वंगाळ हायत, चेटूक भानामती करत्यात,,, त्यावर बापू म्हणाले, आग माई आस काय बी नसत, .... अन तूच म्हणलीस न मालूच सगळं लाड पूरवायच ,,मंग आता काय झालं,,,, आर पर असली लोक चांगल्या येळला असत्यात का कुठं????? त्यावर बापू म्हणाले, आग पोर झाल्यावर बोलीवत्यात की त्यासणी.......... बापूला समजावून माई थकून गेल्या काहीच फरक पडला नाही........ मालती सांगून परत आली, खूप खुश दिसत होती..........
(क्रमशः)
