STORYMIRROR

Vanita Bhogil

Others

3  

Vanita Bhogil

Others

घुंगरू - भाग 2

घुंगरू - भाग 2

3 mins
311

मालतीला दिवस गेले ही तर चांगली गोष्ट आहे ,,,मग अस का वाटतंय काहीतरी चुकतंय..... नाही काहीही चुकत नाही,,,, पण आजच का अस घडतय,,, जाऊ दे असेल काही ..... अस मनाशीच कुजबुजत माई तशाच निघून गेल्या, घरात सगळं आनंदच वातावरण होत...बापुनी तर सगळ्या शेतातील मजुराला पेढ वाटून वर जास्तीचे पैसे पण ठरवले,,, कारणच तेवढं मोठं होत न..नवस सायास करून पण पोटी पोर होत नव्हतं आणि आता होणार आहे या आनंदात बापूला काय करू अन काय नाही असं वाटत होतं.....


सगळे आनंदात होते पण मालती मात्र चिंतेत होती...... रात्री माईंनी गोडधोडाच जेवण केल.... वाड्यावर येणारे सगळे गडी बाया वाड्यावरच जेवू घातले, मनाशीच म्हणाल्या तेवढंच अन्नदानाच पुण्य माझ्या नातवंडाला लागल.... रात्री बापू त्यांच्या खोलीत आले, मालती अंथरून नीट करतच होती... बापुनी मागून येऊन मालतीला मिठीत घेतल... तस मालती लाजून म्हणाली अहो आता हे काय नवीनच?

 आग मालती मी बाप होणार हे नवच नाही का? आज किती आनंदाचा दिवस हाय. पण मालू हे सगळं तुझ्यामुळे होतय पण मला एक सांग तू उदास का दिसती? आग अस राहिलिस तर आपलं बाळबी असच दिसलं अन मला आपल बाळ हसर पाहिजे बघ.... मालतीन फक्त हुंकार देऊन अंथरुणात पाठ टाकली... बापू म्हणाले झोप तू दिसभर गोंधळात थकून गेली असशील. मी येतो गावतन फेरफटका मारून.... मालतीचा काही डोळा लागत नव्हता, या कुशिवरून त्या कुशीवर पडून विचारात मग्न होती.......

..... 

  विचारात कधी डोळा लागला तीच तिलाच कळलं नाही.. पहाट झाली, कोंबडं आरवल तस मालती उठून बसली, शेजारी बापू झोपलेलं होत, कधी आले गावातून तिला माहीत नव्हतं... अस पण बापुच हे नेहमीच असे... रोजच्यासारखी उठून झाडलोट करायला अंगणात गेली तर माई आगोदरच सगळं करून बंबात पाणी ओतत होत्या.... हे सगळं मालती बघून म्हणाली,, आव माई हे काय करता तुमि, मी हाय न ?

  गारठ्याच बाहेर निघायची घाई कशापायी?

  तस माई म्हणाल्या,, तू आत जाऊन बैठ काम कर मी बघते बाहेरच सगळं.


मालती आत आली, रोजच्या कामाला सुरुवात झाली,,, माई म्हणाल्या आजपासून तू शेतावर जायच नाही.... बापू बघल सगळं ... तस मालती लगेच म्हणाली ,, नाही माई मी जाते ... घरी राहून काय करू दिसभर.... आणि आता कुठं दुसरा महिना हाय, मग आतापासून घरी राहून काय करू...

 त्यावर माई म्हणाल्या ते मला काय माहीत नाय तू जायचं नाय म्हंजी नाय.........

 

मालतीला नाईलाज झाला,, मन बेचैन झालं, आजचा दिवस कसाबसा घालवला, पण मनाशी ठरवलं उद्यापासून नक्की शेतावर जायचं... दुसऱ्या दिवशी मालती उठली घाईतच सगळी काम करू लागली, माई उठून बाहेर आल्या तर ही परसदारी झाडलोट करत होती... तशा माई ओरडायला लागल्या माले., तुला नीट संगीतल्याल समजत नाय का? मालतीच्या हातातली केरसुणी तशीच खाली पडली, आव माई बसून लई कंटाळा येतोय मनुन सकाळच्याला थोडी हालचाल करावं म्हणलं.. आग पण.... तुला कळत नाय का? एवढ्या दिसान पोर राहील त्याला जपाव मनुन... लहान नायस आता, तस मालतीन माईच्या जवळ जाऊन हाताला धरून बाजूला ओट्यावर बसवलं... माई कश्याला काळजी करता इव्हडी, काय नाय व्हाच मला, इवढुश्या कामान.. तुमि किती दगदग करणार, वय हाय का? माई म्हणाल्या मला काय व्हायचं नाय, नातवंड खेळवायचंय त्याला मोठं करायचय, ते सगळ राहू दे तू शेतावर नाय जायचं


 मालतीला काही कळेना... उदास झाली, आजबी जायला नाही भेटत वाटत.. काय कराव? माई घरात जाताना मालतीकडे बघून मनाशीच विचार करत होत्या, शेतावर जायची का हिला घाई हाय? काय तरी हाय,, पण ही मला सांगत नाय... मालतीला शेतावर का जायचय हे माईंना कळेना... पण मालतीकडे पाहून ती चिंतेत असल्याचं जाणवत होतं.. माईंनी ठरवल मालतीला आज जाऊ देते ,, तिच्या मागावर मी जाते ,, तशी मालती समजदार हाय पण काय कमी जास्ती झालं तर म्या असले तर बर...माई वळून मालतीला म्हणाल्या...माले, तुला जायचय शेतावर तर जा पर सांच्याला लवकर घरला ये.

 

  मालतीला खूप आनंद झाला, तिनं भराभर कामं करायला घेतली. माईनं ओळखलं नक्की काय तरी हाय....

(क्रमशः)


Rate this content
Log in