Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Sanjay Ronghe

Others


4.0  

Sanjay Ronghe

Others


" गावाकडच्या गोष्टी "

" गावाकडच्या गोष्टी "

3 mins 171 3 mins 171

महादेव आज जरा घाईतच दिसत होता. थो रामाच्या घरापुढे येताच त्यानं रामाले आवाज देल्ला. हाये का गा रामा घरी ? रामाची बायको महादेवचा आवाज आयकून भायर आली. काऊनजी काय झालं. थे आताच तं इथंच होते. गेले असन तिकडं आबाजी च्या घराकडं . या ना येईन वापस थोड्या येळात. बसा तवरीक. मी चा ठिवतो. तसा महादेव बोलला, आवो सूनते म्या कालच त सांगून ठिवलं होतं रामाले, का आज यवतमाळले जाच हाये मुन. कोठी गेला आता येळवर ह्या मानुस. मांड तू चा मांड, येईन तवरीक थो. अस म्हनुन महादेवने घराच्या ओट्यावरच बैठक ठोकली. तशी सुनीता चा करा साठी घरात गेली. तितक्यात रामही वापस आला. तो तोंडाने काहीतरी पुटपुटतच होता. महादेवनेच त्याला भानावर आणले. काऊन गा का झालं , तू अजून तयार न्हाई झाला का. येळ पाय बरं घड्याळात आठ वाजून रायले ना. तसा रामा भानावर आला. काई नाई गा, आबाजी कड गेलतो. जा साठी पैसे न्हाई लागन का. मनल मांगाव आबाजीले, तेयच्या कडच माहे दोन हजार रुपये हाये. मुन गेलतो. पन काय मानुस होय थो. पैशेच न्हाई म्हनते. आता येळवर मी कोठून आणू सांग. थांब तू सूनते पाशी काहिक असन त पायतो.

तशी सुनीता चा चे दोन कप घिऊन आली. दोघायन सूनती पासून चा चा कप हातात घेतला. तसा रामा सूनतीले बोलला हाये का वो तुयापाशी पाचकशे रुपये. तशी सुनीता एकदम भडकली. कालच त म्या तुमाले शंभरीच्या चार नोटा देल्या, काय केलं तुम्ही. थे असन ना तुमच्या पाशी. आता न्हाई मा पाशी काई. तसा रामा शांत झाला. त्याले काय बोलाव समजेच न्हाई. त्यानं खिशात हात घातला त चार नोटा तशाच खिशात पडून होत्या. काल सूनती कुन घेतलेले पैसे थो इसरूनच गेला होता. पाय बरं खिशातच थ हाये. कहाले ओरडून रायली. मी काई दारू पेतो का का करतो. इसरलो होतो मी. काल तू हाये न्हाई हाये न्हाई मने का नाई. मंग तुनच त खिशात टाकून देलते. मुन मी इसरून गेलतो. आन आज बहिन त्या आबाजी कड गेलतो त्यायले मांगाव मुन. पर त्यायन बी न्हाई देल्ले. तशी सुनीता बोलली , थे कुठून देईन जी. बुढी बिमार हाये. तिच्यानं कापसाले कुठी जानं होते. आन आबाजीचा कापूस अजून घरातच पडला हाये. सी सी आय ले टाकतो म्हने पर गाडी वाला लय पैसे मागून रायला. त म्याच मानलं आमचा बी कापूस धाडाचा हाये. एकाच गाडीत धाडू चार दिसान. म्हून थे बी थांबून हाये. दोघायचा मीयुन होतेच किती , त्यायचा सात किंटल न आपला नऊ किंटल, सोया किंटल एकाच गाडीत जाते ना. मुन थेबी थांबून हाये. चारशात होते ना तुमचं जानं यन . थांबा शंभर अजून ठिवा खिशात. खर्च नका करजा. पर रहाऊ द्या अडी अडचणीले. असे म्हणून सूनती घरातून एक शंभराची नोट घिऊन आली. आन रामाच्या हातात देली. तसा महादेव बोलला चाल गा मंग. झालं ना तुय. सूनती हाये मुन तुय बरं हाये. न्हाई त कठीणच होतं गा तुय बी. चाल आता. तशी सुनीता बोलली . लोकर लोकर जा आन झाक पडाच्या आदी वापस या. दुपारची न्याहरी हाये या थैलीत. दोघबी येळवर खाऊन घेजा.

तशे दोघेही बस स्टॉप कडे निघाले. दोघेही दिसेनासे होई पावत सुनीती त्यायले पाहात रायली.Rate this content
Log in