Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Siddhi Chavan

Others


3  

Siddhi Chavan

Others


बंदिश

बंदिश

4 mins 787 4 mins 787

" निघालास ? " ..... गेटच्या दिशेने चालत जाणार्‍या अविनाशला विभा विचारत होती.


" हो ! " .... त्याने मागे वळून न पहाताच उत्तर दिले.


ती पुन्हा... " का ? आणि न भेटताच ? "


" तो येतोय ना ! " परत त्याने मागे न पहाताच उत्तर दिले


" जसा तू यायचास तो नसताना , तसाच तो येतोय पण तू असताना ! "... विभा हसत म्हणाली.


" विभा हे शक्य नाही. "


" अरे पण का ? "


" वेड्यासारखी वागू नकोस. दोन्ही समतुल्य नाती संभाळणे तुला जमेल का ? "


" म्हणुन तू जाणार आहेस का रे ? " ..... विभा काकुळतीला येऊन म्हणाली.


" हो. तो आता परत येतोय तर मी इथे थांबने योग्य नाही वाटत. "


" मग तो गेला तेव्हा त्याने विचार केला का माझा ? "...ती ने परत प्रश्न केला.


" त्याच्याकडे पर्याय नव्हता ग, आणि तुच त्याला तुझ्या पासून दुर ठेवलेलस ना. स्वतःहून . "


"तेव्हा माझ्याकडेही पर्याय नव्हता, पण आता आहे. ".... विभाने एका झटक्यात उत्तर दिले.


" म्हणजे ? "... अविनाश ने विचारले.


" अवी, तू कुठेही जात नाहीयेस. "... विभा त्याचा जवळ येत म्हणाली.


" तुला जमेल का ग अशी दोन नाती जपायला ? कात्रीत सापडशील. आणि मला ते पहावनार नाही. निघतो मी "


काहीतरी धडपडण्याचा आवाजाने तो सरकन मागे वळतो....

" तुझी व्हिलचेअर कुठे आहे ? आणि हे काय , तू आता आधाराने उभी राहु शकतेस . " (तो आश्चर्य आणि आंनदाने)

ती धडपडत... " हो . गेले काही दिवस काठीच्या आधाराने चालते मी . मग धाप लागली की अशीच कोसळते . मग स्वत:ची स्वत:च उठून बसते. '

" आधी का सांगीतले नाहीस ? "... अविने तीला आधार देत परत प्रश्न केला.


" गेले काही दिवस तू आलाच नाहीस . कस सांगणार ? एक सांगू .... तुझी बंदिश मनात एवढी रेंगाळत रहाते की , तू नसतानाही असल्याचा आभास होतो. सवय झाली आहे मला आता याची. बरेच दिवस तू आला नाहीस. मी वाट बघुन-बघुन तुझीच कॅसेट टाकुन म्युझीक प्लेअर ऑन केला . पण त्याची वायर माझ्या व्हिलचेअरला अडकली आणि खाली पडला तो . कॅसेट आतल्याआत अडकली. आतडी पिळवटावी तस वाटल मला.... क्षाणात बंद पडला होता तो म्युझीक प्लेअर ..... आणि जणु माझा श्वासच कुणी बंद करत आहे अस वाटले . " ..... बोलता बोलता तीला धाप लागली.


" शांत हो "...दोन्ही हातानी उचलून आपल्या जवळ घेत तो तीला घेऊन समोरच्या बाकडावर बसला तो म्हणाला.

एकटक त्याचाकडे बघत तीने परत बोलायला सुरुवात केली..... " त्या दिवशी मला माझ्या व्हिलचेअरचा खुप राग आला होता . होती नव्हती तेवढी शक्ती एकवटुन उठले. सरकत जमीनीवर कोसळले आणि भिरकावुन दिली ती चेअर.... खुप दुर.... कायमचीच.... मग उठवा येईना की हलता येईना, बसल्या जागी कळा यायला लागल्या, खुप त्रास झाला. पण मी तीला परत हातच लागला नाही . आता अशीच चालते ... कधी लहान मुला सारखी रांगत तर कधी फरपटत . पण ज्या तुझ्या बंदिशीचा मी राग-राग करायची, तीच एखादी बंदिश ऐकल्या शीवाय आता मला झोप येत नाही. सार कस क्षाणात बदलत ना रे ! "


" तुला आरामाची गरज आहे. तू आतमध्ये चल. मला निघायला हव "... अविनाशने तीला उठवण्याचा प्रयन्त केला.


" नको थांब अवि , ही बघ ? " .... ती एक छोटीशी खड्याची अंगठी त्याच्यासमोर धरत ती .


" ही ही अंगठी अजुन तुझ्याकडे आहे . "


" हो "


" पण अमु परत येतोय . दोन नाती संभाळण सोप नाही आहे. जमेल तुला ? "


" नाही जमनार. म्हणुन एक नात मी कायमचच पुसून टाकनार आहे."


तो चमकून... " कोणत ?"


" आपल मैत्रीच नात संपणार. आणि अमुला सांगुन टाकणार आहे मी की, तुच त्याचा बाप आहेस.... आपणच त्याचे आई वडील आहोत. पण

बीना लग्नाचे . "


तो बॅग उचलत ... " इतक्या वर्षानंतर.... हे नात जर त्याने स्विकारलच नाही तर ? नकोच ते प्रश्न... मला निघावच लागेल. तेच योग्य आहे "


" खुप मोठा झालाय आता तो. समजुदार ही.... त्याला याचा स्विकार करावाच लागेल. न स्विकारुन सत्य बदलनार आहे का?

अजुन एक.... आपल हे मैत्रीच नात संपल आता... मग या नविन नात्याला नविन नाव द्याव लागेल ना ? काय म्हणतोस ? "... तीने अनपेक्षित प्रश्न केला.

तो परत चमकुन.... " तुझी कोडी संपत नाहीत. विभा तुला नक्की काय म्हणायच आहे ? "


तीने हात पुढे केला.... " घालतोस ना अंगठी ? "


थोडस हसु आणि साठलेले आसु सावरत तो बाकावर बसला तिच्या शेजारी.... बोटामध्ये अंगठी सरकवत त्याने तीला ह्रदयाशी धरल. डोक्यावरील कुंदीची चार शिळी फुले टपटप गळून त्याच्या अंगावर पडली....जशी अल्हाददायक वार्‍याच्या एका झुळूकी सरशी वर्षानुवर्षाची बंधने गळून पडावी.

ती त्याच्या छातीवर डोक ठेवत... " तुझ्या बंदिशने या बंदिस्त जिवनातुन मला मुक्ती दिली. जरी अमूच्या वेळेस माझ्या कठीण काळात मला तू सोडुन गेला असलास तरी या कठीण काळात जेव्हा माझ्या जवळ कोणीही नव्हत. तेव्हा तू होतास. म्हणुन मी त्या जुन्या कटू आठवणी पुन्हा उगाळत बसायच नाही अस ठरवलय. नव्याने सुरुवात करु. "


त्याने दोन्ही हातांचा वेढा घालत तीला अजूनच जवळ घेतल . ज्या बंदिशीचा प्रेमापोटी त्याने विभाला दुर लोटल होत. तीच त्याची एक अव्यक्त बंदिश आज पुन्हा एकदा बंदिस्त झाली होती . अगदी अविभाज्य..... त्याच्यापासून पुन्हा कधीही विलग न होण्यासाठी.


(माझे कोणतेही लिखाण इतरस्त्र कोठेही पोस्ट करताना या नावासकट टाकावे ही विनंती - सिद्धि चव्हाण - https://siddhic.blogspot.com)


Rate this content
Log in