STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Others

3  

akshata alias shubhada Tirodkar

Others

बँडमिंटन

बँडमिंटन

2 mins
262

मिस्टर फेर्नांडिस ह्याचा बंगला बंगल्याच्या हॉल मध्ये राजे महाराजे जसे आपली शान वाढवण्यासाठी जसे तलवारी भितींवर लटकवत तसेच हयांच्या भिंतीवर बेंडमिंटन रॅकेट लटकवली होती मिस्टर फेर्नांडिस ऐका काळचे गाजलेले बँडमिंटन पटू पण वयामुळे त्यांनी सगळे सोडले होते ते आणि त्यांची पत्नी दोघेचआणि देखभाल करण्यसाठी एक नोकर असे तिघे घरात राहत होते त्याचा मुलगा लंडनला स्थायिक होता खूप वेळा त्याने मिस्टर फेर्नांडिस याना तिथे कायमचे येण्याचे सुचवले पण त्यांनी कानाडोळा गेला .


"किती दिवस झाले ना आपल्याला असे लटकून "

"हो रे कंटाळा आलाय"

"काय ते  दिवस होते जेव्हा सकाळ संध्यकाळ आपण शटरकॉक ला फटके देत असू "

"त्याला देताना कधी कधी आपण हि गळून पडू "

"हो रे कधी कधी वाटायचं पुरे आता "

"पण आता वाटत मारावा शटरकॉक वर असा फटका कि परत टाळ्यांचा कडकडाट ऐकू येई"

"गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी"

" हो ना भिंतीवर लटकन आपल्या नशिबी" 

"मिस्टर फेर्नांडिस चे जीव होतो आपण पण त्याचा वयामुळे त्यांनी आमच्या कडे पाठ फिरवली "

"हो ना "

असेच दिवस जात होते मिस्टर फेर्नांडिस ह्यची प्रकृती खालावत होती त्यामुळे कायमचे त्या दोघाना लंडनला नेण्याचे असे त्याच्या मुलाने ठरवले आणि इथले घर एका बिल्डरला विकले घरात असलेले सामान काही विकले तर काही भंगारात विकले त्यात बेंडमिंटन रॅकेट हि भंगाराच्या अड्ड्यात पोहोचली 

"अरे आपण कुठे आलो '?

"हो रे आता हे आपले तुकडे करणार' 

"नको एक वेळ भिंतीवर लटकन परवडलं पण हि यातना नको" तेवढ्यात तिथे काम करता असलेल्या मुलाने ती रॅकेट आपल्या पिशवीत ठेवली संध्यकाळी आपल्या लहान भावंडांच्या हातात ठेवली त्याना झालेला आनंद पाहून 

'चला कोणाच्यातरी आनंदाचा आपण भाग झालो "

"हो रे आता आपले हे नवीन जग '

मिस्टर फेर्नांडिस लंडनला पोहोचले बँडमिंटनवर त्याचे खूप प्रेम होते पण वयाच्या आजारपणाने त्याचे ते प्रेम त्यांना आठवत नव्हते. 



Rate this content
Log in