आयुष्याचा रंगमंच
आयुष्याचा रंगमंच
आयुष्याच्या रंगमंचावर जीवन जगत असतांना रोज काहीतरी नवीन पात्र निभवायच असतं की, जे विधात्याच्या हातात असतं.
कधी सुख दुःख तर कधी आशा निराशा कधी समाधान ,अनेक संकटांना माणूस तोंड देत पुढे जात असतो.
प्रत्येकवेळेस आपल्या मनासारखे घडलंच अस नसतं.कधी कधी सापशिडीसारखं जीवन असतं अगदी एकदम वरच्या टोकाला जाऊन सरकन खाली याव लागतं तेंव्हा मन नाराज होत वरच्या टोकाला झालेला आनंद होत असतांनाच आपण जोरात वेगाने खाली येतो.
तसेच आयुष्यात चढऊतार चालू असतात.म्हणून काही जगणं थांबत नसत .जे काही समोर येईल त्याला हिंमतीने तोंड देत जीवन जगायच असत.
आयुष्याच्या रंगमंचावर ऊन्हानंतर सावली सावलीनंतर ऊन हे जीवनचक्र चालूच असतं .
कधी हसत कधी रडत, कधी सुखदुःख आशा निराशा या सगळ्या गोष्टीचा सामना करत जगायच असतं.
आयुष्याच्या रंगमंचावर जगत असतांना विधाता जो पात्र देत असतो ते आपण त्याच्या सहाय्याने निभावतअसतो.
दुःख देतो तो आपल्याला शहाणपण येण्यासाठी, प्रत्येक गोष्टीतून आपल्याला अनुभव मिळावा म्हणून प्रत्येकाला सुख दुःखाचे पात्र देत असतो .
आणि त्या अनुभवातून आपल्याला बरेच काही शिकवून देतो.
आपण रेल्वेत प्रवास करतो तेंव्हा अनेक माणसं आपल्याला भेटतात.कोणी गाणं गाणार, तर कोणी कर्म कहाणी सांगणार , कोणी रडवणार तर कोणी हसवणार प्रत्येक दिलेलं पात्र माणूस प्रामाणिकपणाने निभावत असतो.
परंतु त्याच्या थांबा आला की, तो त्या फलाटावर उतरून जातो.
त्याच फलाटावरुन दुसरा कोणीतरी नवीन पात्र घेऊन प्रवासी चढत असतो.आणि नव्याने देवाने दिलेल्या पात्राला आयुष्याच्या रंगमंचावर प्रामाणिकपणे जीव ओतून निभावत असतो.
हाच खरा आयुष्याचा रंगमंच असतो की, जेथे आपल्याला माहित नसते आज नाटकाचे कोणते पात्र मिळणार?आणि आपण ते कसे पार पडणार?
बरोबर बर ना?असाच आहे ना आयुष्याचा रंगमंच
