आपुली मराठी भाषा
आपुली मराठी भाषा
मराठी भाषा अमुची स्वर व्यंजनाने
नटलेली लक्ष्मी असे मानाची.
मराठी मातीत लावा ललाटीचा
टिळा,तिच्या संगे वाढवू ज्ञानाचा झरा.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुुुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा दिवस म्हणुन गौरवाने साजरा करण्यात येतो.संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरानी मराठीच कौतुक करताना म्हटलं आहे. माझी मराठीची बोलु कौतुके. सावरकरांना मराठी राष्ट्राचा अस्मितेचा राष्ट्रीय घटक म्हणुन अभिमान होता.त्याना मराठीवर कुणी आक्रमण केले तर सहन होत नसे. अर्थपूर्ण शब्द दिले. कुसुमाग्रज, साने गुरूजीना मराठीचा अभिमान होता. आज मराठीची लाज वाटते, मराठी शाळा बंद पडताना दिसतात व इंग्रजी शाळेत मुलांना घालण्यात पालकांचा ओढा वाढला पण इतर भाषा शिकून एक ना धड भाराभार चिंध्या होतात. तसेच मराठी लोकांना मराठी लिहिता वाचता येत नाही, मराठीत मुलं नापास होतात हे विचार करण्यासारखे आहे. मराठीची हेळसांड हेतुपुरस्सर होते हे पटत नाही. शिक्षणात मराठीचे अध्ययन व अध्यापन याकडे लक्ष दिले पाहिजे.
मराठी भाषा इतकी साथ सृंगाराने नटलेली आहे.मराठी व्याकरण शीकुन मराठीत उच्च पद गाठता येईल कान्हा मात्रा वेलांटीने नटलेली आहे. आज सरकारने. मराठी त पाटल्या लावण्यास सांगितले यांचा अर्थ दुसर्या भाषेला कमी लेखण्याचा नाही पण. पुर्वीपासून ऋषी मुनी मराठी ला महत्त्व आहे. आपुली माय मराठीचे गोडवे आपण घालुन मानाचे स्थान द्यायला हवे.
माझी मराठी वर कविता.
माझी माय मराठी
माय भाषा मराठी आहे अमुची,
स्वर व्यंजनाने नटलेली
लक्ष्मी असे ती साहित्याची
कुंकू लेखी अनुस्वाराचे ललाटी
लहान मोठ्या वेलांटीचा भरजरी पदर खांद्यावरी दिसे लक्ष्मी साजरी
स्वल्प विराणी नाकामद्धे नथनी खुलुन दिसे.
कानी प्रश्नचिन्ह डुलत असे.
मात्राच्या गजर्याने वेणी खुलुन दिसे.
उपकार लावुन सुंदर बोले लटकून मान गडे.
उदगाराचा लटका राग दाखवी कबंर फिरवूनी.
झुमक झुणक पैंजण आवाज मराठीचा करीत भाषा मिरवी
चोहीकडे.
शेवटास दिसे पुर्णविरामी समजुन लक्ष्मी महाराष्टाची शान.
अशी मराठी शृंगार वाढवी अभिजात मराठी मान.
हीच प्रार्थना कुसुमाग्रजांना देवू
वाढवू सारे मिळोनी मराठीचा मान.
