STORYMIRROR

Vishakha Tatwadi

Others

2  

Vishakha Tatwadi

Others

आध्यात्मिक संत महिला

आध्यात्मिक संत महिला

2 mins
193

महाराष्ट्रातील पूर्वी बऱ्याच वारकरी संत महिला झाल्यात. त्यांनी बरेच साहित्य लिहिले. त्यातील काही स्त्री संत पाहू.


महाराष्ट्राची भूमी संतांची आहे. त्यात धार्मिक, सामाजिक बाबींवर संत बहिणाबाई, संत महदंबा, संत जनाबाई, संत सोयराबाई, संत कान्होपात्रा, संत वीणाताई या झाल्यात. संत बहिणाबाईने सामाजिक, धार्मिक लेखन करून समाजप्रबोधन अभंगातून केले. त्या विठ्ठलभक्त होत्या. समाजातील अ्निष्ट परंपरा नाहीशा करण्याचा प्रयत्न अभंगातून केला. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस हे अभंग.


महदंबा. देवभक्ती तल्लीन. समाजात एकसूत्रीपणा व स्त्रियांच्या अधोगतीला आळा घालण्यासाठी प्रयत्न केले. षटविकाराला आळा घातला भजन कीर्तन कविता करुन समाजकार्य केले. त्यांचे नाव आज अग्रस्थानी आहे.


संत जनाबाई लहानपणापासून नामदेवांचे अभंग वाचत. त्या प्रेरणेतून लिहू लागल्या. परमार्थ साधला.

डोईचा पदर आला खांद्यावर। झाडलोट करी जनी थोर चक्रपाणी।। अशा अभंगातून पर्यायी विचार समोर ठेवले.


संत सोयराबाई. स्त्री शक्ती नामसंकीर्तन, अभंग, कविता, लिहून केले. क्षुद्र कुळात जन्म पण परखड विचार मांडलेली. विटाळ का तुम्ही तेथून जन्म घेतला भर जातीयवादावर दिला. सडेतोड उत्तर देत असत


देहाचे विकार म्हणती सकळ। आतल्या तो शिकारी का होत असे।


कान्होपात्रा. विठ्ठलभक्ती. दिसण्यास सुंदर. १५ व्या वर्षी विठ्ठलभक्ती. शील न जाऊ देता २५ व्या वर्षी वैराग्य पत्करून पंढरपूर मंदिरात स्थान घेतले.


नको देवराया, अंत अता पाहू। प्राण हा सर्वथा जाऊ पाहे।। असे अभंग लिहून उंच झाल्या.


संत विणाबाई. ९ व्या वर्षी १५ व्या वर्षाच्या तरुणाशी लग्न. पुढे लवकर पती निधन. रामदासांचे कीर्तन ऐकून काव्यलेखन केले. फ्रेंच शिकले. परमार्थ साधून काम करता येते हे दाखवले. लिखाणात संस्कृत लिहीत.


आज पूर्वीप्रमाणेच स्त्रियांनी संसार सांभाळून पुढे नेता येतो हे स्त्रियांनी दाखवले आहे. निर्माता सारख्या इतरही स्त्रियांना न्याय मिळाला पाहिजे. आपले गुण घरापुरते न ठेवता त्यांना वाव देवून मरणोत्तर किर्ती रूपाने उरावे.


Rate this content
Log in