युद्ध नको बुद्ध हवा
युद्ध नको बुद्ध हवा

1 min

23.2K
हाव ती नको || मानवा तु थांब ||
मोह ठेव लांब ||संयमी तू |
परित्याग केला || शाक्य सम्राटाने ||
महा मानवाने ||तुझ्या साठी |
उतावीळ नरा|| पाप फार केले ||
अनावर झाले || आघात हे |
ध्यान व साधना ||कल्याण मानवा||
शोधून पहावा ||बुद्ध जरा |
शांती नि संयम ||बुद्धा सम हवा||
शत्रू ही हरावा ||ममतेने |
युद्ध नको आता ||जर बुद्ध. हवा||
मंगलता ठेवा||दुनियेत |
जगी शांती दूत ||सिद्धार्थ गौतम ||
लाभला हा धम्म ||तुझ्या मुळे|