योगी वृक्ष
योगी वृक्ष
1 min
13.7K
हे वृक्षराज तुझ्यासम नसे योगी आज
देण्याशिवाय दुसरे माहीत नसे काज
सतत उनवाऱ्याचा रवावून मारा
सर्वांना देतोस तृप्ती आणि निवारा
तुझ्या अस्तित्वाने सृष्टीची वाढते शोभा
तू आळवितोस वर्षण्यासाठी नभा
पर्यावरणाचा तू आहेस गाभा
जणू प्राणी मात्रासाठी देवच उभा
पशूपक्षांनाही तुझाच मोठा आसरा
त्यांच्या परिवाराचा सांभाळतो पसारा
मानवानी कितीही केली दैना आणि घाण
प्राणवायूनी आरोग्य सांभाळून ताठ ठेवतोस मान
अंतिही आम्हांला तूच देतो दहन
कितीही सेवा! किती करतोस सहन
वर्षानुवर्षापासून देणेच शिकवतो खास
पण घेण्यासाठीच पुढे असतात माणसाचे हात
न मिळाल्यास बळकावण्याची वाटत नाही लाज
घेण्याच्या सवईने भ्रष्टाचाराच्या दलदलीत फसलो आज
सद्बुद्धी देवून त्यातून काढ आम्हांस
हे वृक्षराज तुझ्यासम नसे दुजा योगी आज
✍___पुष्पाताई हागे पाटील
