यंदा कर्तव्य आहे
यंदा कर्तव्य आहे

1 min

23.8K
जाणार तू सासरी
ठेवून मागे असंख्य आठवणी
सध्या घरी लगबग
मेहेंदी , हळद , पैठणी ...
अजूनही आमच्या डोळ्यात
तू एवढीशी चिमुकली
खेळत बसायची एकटी
घेऊन बाहुली आणि भातुकली ...
घेऊन शिक्षण तू गाठलेस
यशाचे उंच शिखर
पाणावले आईबाबांचे डोळे
जेव्हा सांभाळलेस सारे घर ...
तुझ्या आयुष्यातले हे
नवीन सोनेरी पर्व आहे
कारण ,
यंदा कर्तव्य आहे !