व्यसन मुक्ती
व्यसन मुक्ती
1 min
320
मरणाची जणू लागली ही घाई
आज व्यसनात बुडाली ही तरुणाई...!!
म्हणती पिऊन बघूया थोडी
पिता पिता लागली तिचीच गोडी...!!
चटक लागली व्यसनाची
बाटली सोबत चकण्याची...!!
व्यसनामुळेच होतो आयुष्याचा घात
व्यसनामुळेच नवीन पिढी होत चाललीय बरबाद...!!
व्यसन आहे विषाचा प्याला
व्यसनाला आता तरी आवर घाला...!!
व्यसनामुळे येतेय नशा
व्यसनामुळे झालेय घराची दूर-दशा...!!
व्यसन करून करतोय आयुष्यात मौजमजा
व्यसन करून देतोय आयुष्याला सजा...!!
स्वतःला ठेवूया व्यसनापासून लांब
बस झालं दादा आता तरी थांब....!!
