दक्षता घेऊ या पसरलाय करोना...
दक्षता घेऊ या पसरलाय करोना...
1 min
11.7K
जिकडे तिकडे रंगली आहे एकच चर्चा
प्रत्येक व्यक्तीच्या मुखात नाव फक्त करोना
संसर्गजन्य असा हा आजार सर्वत्र पसरला
करु नका कसलीच चिंता, थोडा धीर धराना.....!!
स्वच्छ हात धुवून तोंडाला बांधूया रुमाल
पसरलाय चहूकडे भयंकर करोना आजार
स्वतःची आणि परिवाराची घ्यावी काळजी
भीतीने घाबरून नका जाऊ, घेऊ नका माघार.....!!
नेहमी पिऊया उकळून गरम करून पाणी
मरून जाऊ देत पाण्यातील सूक्ष्म जीवजंतू
सुरू आहेत साऱ्यांचे वैद्यकीय उपचारासाठी प्रयत्न
घ्या वेळेस करून तपासणी, नका करू किंतु परंतु.....!!
जरी झाला असेल कुणाला हा करोना आजार
नका खचून जाऊ त्यांना देऊ या त्यांना आधार
वेळच्या वेळी घेऊ या सारी औषधे वेळेवरती
दूर करू या मिळुनी सारे करोना जीवघेणा आजार.....!!
