STORYMIRROR

Sachin Kotulkar

Others

4  

Sachin Kotulkar

Others

विकृत मनोवृत्ती

विकृत मनोवृत्ती

1 min
42.3K


विकृत मनोवृत्ती, असते सगळ्यात वाईट..

आणि अश्या वृत्तीनी, उगाच वातावरण होतं टाईट..

दुसऱ्याचं दुःख पाहुन, हिला सुख मिळतं..

आणि दुसरा सुखी झाला, की हिला खुप खलतं..

सगळ्यांच्या सुखात, ही विनाकारण आणते रोडा..

अरे अशा विकृत मनोवृत्तीला, मुळापासून खोडा..

विकृत मनोवृत्ती असते, सुखीसंसाराला घातक..

दुःखाची वाट ती अशी पाहते, जशी पावसाची चातक..

दुसऱ्याचं कौतुक ऐकायला, हिला नाही कधी आवडत..

पण सगळ्यांसमोर मिरवल्याशिवाय, हिला नाही राहवत.

ही विकृत मनोवृत्ती, उभ्या जन्मात नाही कधी सुधारणार..

आणि एकदा का ही माणसात आली, तर माणुसकीच नाही उरणार..

अश्या विकृत मनोवृत्तीला शिकवा चांगला धडा..

आणि फोडा तिच्या पापाचा तो भरलेला घडा..


Rate this content
Log in