विद्यार्थी घडवणारा शिल्पकार
विद्यार्थी घडवणारा शिल्पकार
1 min
264
विद्या दान देवून आम्हाला तुम्ही,
दिला मातीच्या गोळ्याला आकार
हातात वेताची छडी घेऊन शिकविले
तुम्हीच विद्यार्थी घडविणारे शिल्पकार
रोज प्रोत्साहन देत गेले आम्हाला
आमचा अभ्यास घेतला करून
उत्साहाने शिकत गेलो आम्ही
विद्येची देवता सरस्वती मातेला स्मरून
सर, तुमची वेताची छडी
आजूनही मला रोज आठवते
पाढे, सूत्र, व्याकरण पाठांतर
आठवणीने डोळ्यात पाणी साठवते