हरवलेली माणुसकी
हरवलेली माणुसकी
1 min
164
हरवलेली माणुसकी आता
सापडेल का कधीतरी
जे ते आपल्यात दंग असे
स्वार्थी सगळी दुनियादारी
मदतीचा हात देण्यासाठी
आता नसते तयार कोणी
मोबाईलच्या दुनियेत सगळे
करत असतात मनमानी
खेड्यातल्या लोकांमध्ये
माणुसकी आजुन सापडते
कोणी नवीन भेटले की,
विचारपूस चहा , पाणी असते
माणसाने माणसाशी नेहमी
माणसासारखे वागावे
माणुसकी हारवू देवू नये
मदत करत एकमेकांना आनंदात जगावे