वेश्या..
वेश्या..


तीच जिण ठरलेल
कमरे खाली डोकावणाऱ्या
गिऱ्हाईकाच्या भरोवशावर...
अस कुणालाही उरावर घेण
प्रणय सुखासाठी नसतच,
भुकेल बाळ रडत असत कुठे तरी
चार भिंतीच्या चिंधी आड..!!
त्याच चार भिंतीआड कमी
म्हणून की काय?,बाहेरही
वासनांध नजरेने तिच्या
शरीराची होणारी गाळण,
तीच गाळण घेऊन फिरायचं
आयुष्यभर स्त्री जन्माचं
मातेर गाळत,कधी तरी
स्वच्छ निर्मळ नजरेस पडाव म्हणून..!!
हे पुरुषी गीऱ्हाइक
छातीवर लोंबकळणाऱ्या
मासाच्या गोळ्यावर तुटून
पडतात,मर्दमुकि गाजवल्यागत,
अन सगळ कस गलितगात्र
होऊन जात शरिर,
प्रत्येक नकोशे स्पर्श झेलताना.
तिच्या काही सांसारिक
मैत्रिणीच नटणं हिच्यापेक्षा जरा
वेगळंच असत,त्यांचा केसात माळलेला
गजरा फुलेला असतो नेहमी,
ही नटते कुणी तरी भावनाशून्य
होऊन, तिला ओरबाडण्यासाठी,
आणि पडून असतो कुचकरलेला
गजरा पलंगाखाली..
मादक तारुण्याच्या ऐन
भरात,भावही तसे चढेच
भल्यामोठ्या रांगेसवे
तिच्यावर चढण्यासाठी,
आता मात्र दोन पायातील
फटितल्या या खेळाचा
शेवट जवळ येऊ लागला
ओसरनाऱ्या तारुण्यासोबत..
जिथे ठेवली होती स्वताची
स्वप्ने गहाण अन त्यांच्या सोबत
जागून काढल्या कित्येक नग्न रात्री,
ती स्वप्ने परत सोडवता
आलीच नाही कारण?
तिच्या शरीरावर वीर्य
सांडणाऱ्यांनी आता मात्र
दूसरीकडे ओलांडला होता उंबरठा..