STORYMIRROR

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Others

4.8  

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Others

वेड वाचनाचे

वेड वाचनाचे

1 min
23.1K


कधी लागले हे वेड वाचनाचे

कळले ना कधी मला ते

पाहुन त्या काचेच्या कपाटात रचलेले

हाती ते घ्यायची लागायची चढाओढ


नजरेनेच जडायच एखाद्या पुस्तकावर मन

आसुसले असायचे हात ते घेण्या

हळुवार हात मायेने त्यावर फिरायचा

वाचून पूर्ण झाल्या शिवाय बैचेन


आठवणींचे गुंफन विणत गेले बघता

पुस्तकांच्या अवती भवती न कळता

वाचतांना ते पुस्तक कधी झाले

माझे मित्र, गरू मार्गदर्शक जीवनाचे


विकत घेतले अनेक पुस्तके वाचन्या

तर कधी वाचनालयात बसुन वाचले

न समजलेल्या भाषेची पुस्तकातील चित्र

पाहात ते वाचनाचा प्रयत्न ही केला


पुस्तक अवती भोवती असता माझ्या

नसतो एकटा 'मी' कधी कुणा

सोबत असता अनेक सोबती कल्पनेत

वेडा खुळा बनुन मी आनंदी

मी आनंदी!!!


Rate this content
Log in