वासना
वासना
1 min
303
आई बापाची लेक लाडाची
तेवत ठेवी ज्योत दोन्ही कुटुंबाची
अनंत काळाची माता, क्षणाची भार्या तू
रणरागिनी, विलासित क्षोभिणी तू
दिसता लावण्य तुझे, मम लाड माता पित्याचा
लाभे असे प्रेम, मिळे सहवास गोड मनाचा
पण नकळत तेच लवण्य ठाव घेई क्रूर नियतीचा
कुरूप, कलंक स्थान मिळे वासनांध प्रवृत्तीचा
निस्तेज, निरस, रूप येई, राख रांगोळी होई
रूप तुझे, देह तुझे, नेस्तनाबूत होई
कोमल मन, सुंदर तन काळरात्र येई
नराधमाला काय कळे! हीच जगाची आई
आई, ताई, काकू, वहिनी रूप एकाच स्त्रीचे!
तरी का? उग्र रूप वासनांधतेचे?
