शब्दांची गुंफण
शब्दांची गुंफण
1 min
381
अ - अंधारातून प्रकाशाकडे मार्ग दाखवी चंद्र,.
ध्या- ध्यास ठेऊनी कास धरा , जीवन जगा स्वच्छंद
प- पळवाटा काढू नका, निसर्ग आहे सोबतीला
क-. करून पहा आरती ज्ञानाची, रात्र आहे सोबतीला
प,-. पसरवा सुगंध ज्ञानाचा, स्वप्न पहा भविष्याचे
द,-. दलदल निर्माण करू नका भान ठेवा कस्तुरीचा
वि-. विद्येचा आनंद घ्या, सावली मिळेल ज्ञानाची
का-. कार्य अविरत सुरू असू द्या, माया असेल आईची
अ-. असून बुध्दी !तुम्ही संकेत निर्बुधाचा का देता?
भ्या-. भ्याड ,अज्ञानी,लोकासंम भिऊन मागे का सरता?
स-. संधी मिळाली शिक्षणाची आळस असा का? करता?
क्र-. क्रम लावा प्रगतीचा,जोड अज्ञानाची का घेता?
म-. मन करण्या प्रसन्न, ज्ञानाई आहे का विसरता?
