आई
आई
जन्म दिला तू जग दाखविले
जगण्या आम्हा तू पंख दिले.
आई !आठवतात त्या पाऊल खुणा.
चालताना त्या पावलास तू बळ दिलेस आईं! आठवते ती ओठांची भाषा.
बोबड्या बोलातून मज शब्दालंकार दिलेस. आई ! इवले इवले हात ग.
हातात घेऊन बळकटी दिली मनगटाला . आज बलशाली बाहु माझे .
समर्थ झाले देश रक्षणाला
आई! इतुकले पितुकले डोळे मिचकावत. चालायचा खेळ बाहुल्यांचा.
तेच डोळे शोध घेत आहेत आई.
तुझ्या नि माझ्या ममात्वाचा
चुकलो तर आई कान पिळायचीस.
घालवण्या वाईट!
आता तुझी हाक मला ऐकु येईल का ग नीट. एक रपका बसला की फुगवायचो नाक.
आज स्वानाप्रमाने हुंकारतो तुझी हाक. पाऊलखुणा तुझ्या सत्य वाट चालण्या. बळकट बाहु दिले भूमी रक्षण करण्या.
चपल नयन दिलेस सुखद क्षण टिपण्या.
सुरेल नाष्य दिले प्राणवायू घेण्या.
मधुर मुखकमल सुरेल वाणी करण्या.
आणि एक सुंदर हृदय दिलेस.
सारे विश्व समावण्या.
आई थोर तुझे उपकार या भुवर मी जन्मण्या.
