STORYMIRROR

संजय रोंघे

Others

3  

संजय रोंघे

Others

वारी निघाली पंढरपूरा

वारी निघाली पंढरपूरा

1 min
391

निघाली पंढरपुरास माऊलीची वारी।

दुमदुमला आवाज, मुखी विठ्ठल विठ्ठल, जय हरी।


नाद चिपळ्यांचा संगे भगवी पताका खांद्यावरी।

मनी भाव भक्तीचा पावले पंढरीच्या वाटेवरी।


ओढ लागली दर्शनाची विठ्ठल उभा कर कटावरी।

माय रुकमाई मागे उभी लोटला जन इंद्रायणी तीरी।


अवघा आनंद ओसंडला विठ्ठलमय झाली पंढरी।

विठ्ठल विठ्ठल, माझा विठ्ठल दिसे मजला तो दिशा चारी।


जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल।

विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल।


साहित्याला गुण द्या
लॉग इन