उन - एक सोनेरी किरण
उन - एक सोनेरी किरण

1 min

43
उन अशी असते
जनु आपल्यावरची एक छत,
दिवसा असते टिकून,
पण रात्री नाहीशी होते..
कोणी बरोबर असत किंवा नसत,
मात्र उन सदैव सोबत असत...
कधी चंद्राच्या सावलीने लपते,
तर कधी ढगांची चादर ओढते,
मात्र उन सदैव सोबत असते...
घरात वीज असते किंवा नसते,
पण सूर्याचा प्रकाश सदैव असते...
कधी घाम येतो, तर कधी गर्मी होते,
कधी शरीर लाल होते, तर कधी भाजते,
पण हिवाळयातला थंडपणा जणू नाहीसे करते,
झाडांच्या हिरव्या पानांना सोनेरी करते,
मानवाला तर 'ड' हे जीवनसत्व पुरवते,
म्हणूनच उन सदैव सोबत असते...