STORYMIRROR

Kalpesh Shimpi

Romance

3  

Kalpesh Shimpi

Romance

तू येशील ना...

तू येशील ना...

1 min
327

तू येशील ना.. तू येशील ना...।।

माझ्या मनातल्या वेलीवर 

तू फुल म्हणून येशील ना....।।


माझ्या शब्दात, माझ्या वाक्यात,

तू स्वर म्हणून येशील ना....।।

जीवनाच्या प्रत्येक कसोटीत,

साथ माझी देशील ना....।।


आयुष्यात जर हरवलो मी,

शोधुन मला आणशील ना...।।

जगण्याच्या चार गोष्टी,

परत मला शिकवशील ना...।।


माझ्याकडून झालेल्या चुका,

तू समजून घेशील ना...।।

प्रेमाच्या मऊ गादीवर,

परत मला झोपवशील ना...।।


नाही करणार मी पुन्हा चूक,

पण मला माफ करशील ना...।।

माझ्या चुकांवर प्रेमाची शाल पांघरुन,

परत तूझ्या मिठीत घेशील ना....।।


तू येशील ना..तू येशील ना...।।

माझ्या मनातल्या वेलीवर 

तू फुल म्हणून येशील ना....।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance